नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,गुरुंची आराधना करून त्यांचे आशीर्वाद मिळावेत यासाठी गुरुपौर्णिमा हा सण बुधवार, 13 जुलै रोजी साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी वेदांचे निर्माते महर्षी व्यास यांचा जन्म झाला असे मानले जाते.
गुरु पौर्णिमा 2022 ही व्यास जयंती म्हणूनही साजरी केली जाते. या संपूर्ण सृष्टीत गुरुंचे स्थान सर्वात मोठे आहे. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी कोणताही निश्चित दिवस नाही. कोणत्याही दिवशी तुम्हाला तुमच्या वडिलांकडून, तुमच्या शिक्षकांकडून आशीर्वाद मिळू शकतात.
पण गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंची आराधना करून त्यांचे आशीर्वाद प्राप्त केल्यास तुमचे जीवन आनंदी होते. ज्ञानाचे डोळे उघडणाऱ्या गुरूची कृपा प्राप्त करण्यासाठी 2022 च्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंची विधिवत पूजा करावी.
या वेळी, बुधवार, 13 जुलै रोजी येणारी गुरु पौर्णिमा 2022 खूप महत्त्वाची आहे. कारण यावेळी अनेक राजयोग तयार होत आहेत. यावेळी रुचक, भद्रा, हंस आणि शश नावाचे चार राजयोग तयार होत आहेत.
बुध ग्रहाच्या अनुकूल स्थितीमुळे बुधादित्य योगही आहे. दैत्यांचे गुरु शुक्राचार्य आपल्या मित्र ग्रहासोबत बसले आहेत. हा काळही खूप लाभदायक आणि अनुकूल आहे. 2022 मध्ये गुरुपौर्णिमेच्या दिवशी तयार झालेल्या विशेष योगामुळे या वेळी त्याचे महत्त्व अनेक पटींनी वाढते.
यामध्ये घेतलेल्या गुरु दीक्षा किंवा गुरु मंत्राने जीवन यशस्वी होऊ शकते. श्री स्वामी समर्थ, 13 जुलै बुधवारच्या दिवशी गुरुपौर्णिमा आहे. हा गुरूंच्या दिवस आणि त्यांच्या शिष्यांच्या दिवस होय.
आपले गुरू स्वामी महाराज आहेत आणि आपण त्यांचे सेवेकरी त्यांचे भक्त त्यांचे शिष्य आहोत. या दिवशी आपण त्यांची विशेष सेवा करायला पाहिजे म्हणून तुम्ही लक्षात ठेवा.
13 जुलै बुधवारच्या दिवशी गुरुपौर्णिमा आहे. आपल्यासाठी खूप विशेष दिवस, या दिवशी तुम्ही स्वामींना गुरु करू शकता अथवा स्वामी तुमचे गुरु आहेत तुम्ही त्यांची सेवा करा.
गुरु करणे महत्त्वाचे राहत नाही तर सेवा करणे महत्त्वाचे राहते. आपण त्यांना कसे प्रसन्न होते महत्वाचे राहते, म्हणून या दिवशी तरी तुम्ही त्यांचा विशेष जप करा. विशेष सेवा करा आणि विशेष आरती करा आणि त्यासोबतच विशेष त्यांच्या आवडीच्या नैवेद्य दाखवा.
तर आज आम्ही तुम्हाला एक विशेष नैवेद्य सांगणार आहे जो तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामीला दाखवू शकतात. मग तो सकाळी दाखला म्हणजे अर्थात दुपारी दाखवला किंवा मग रात्रीच्या जेवणाच्या वेळी दाखवला तरी चालतो.
परंतु नैवेद्य दिवसभरात दाखवायला आपल्याला अजिबात विसरू नका. स्वामींच्या नैवेद्य कोणत्या स्वरूपाचा दाखवायचा, तर सगळ्यांना माहीत आहे किंवा काहींना माहीत नसतात की, स्वामींचे काही आवडीचे पदार्थ आहेत.
ते पदार्थ तुम्ही करायचे, तुमच्या हातून करायचे. मात्र बाहेरून आणून दाखवायचे नाहीत. आपल्या हातातून जे केलं ते स्वामी आवडीने खातात. तर आपल्याला या दिवशी स्वामींच्या आवडीची पुरणपोळी करायचे आहे.
पुरणपोळी स्वामींना अत्यंत आवडते, त्या सोबत तुम्ही खीर करू शकतात. दुधाची खीर केली तरी चालते किंवा फक्त एक वाटी दूध त्यामध्ये चिमूटभर साखर टाकून ठेवलं तरी चालतं.
त्या सोबत तुम्ही आमटी आणि भात करू शकतात आणि सगळ आवडीचे स्वामींना म्हणजे कांदा-भजी ती तुम्ही करू शकता, मग अशा रीतीने संपूर्ण ताठ तयार करून त्यावर एक तुळशीपत्र ठेवून स्वामींसमोर तुम्ही स्वामींना नेवेद्य दाखवु शकतो.
पण पुरणपोळी आणि खीर आमटी भात कांदा भजी करायला विसरू नका. मात्र खीर जमत नसल्यास दूध ठेवलं तरी चालतं. तसेच जर पुरणपोळी जमत नसेल तर करायलाच पाहिजे असे नाही.
तुम्ही साधी चपाती एका वाटीत दूध चिमूटभर साखर जरी स्वामींना प्रेमाने आपुलकीने दाखवलं तरी स्वामी ते ग्रहण करतात, म्हणून काही गोष्टी करायलाच पाहिजे असं नसत. त्यामुळे आपल्या परिस्थिती बघून आपण ते करायला पाहिजे.
चपाती दिली तरी चालतं ते आपण करू जे आपण आपण स्वतःसाठी जेवणाला करू हे तुम्ही सगळ्यात आधी स्वामींना दाखवा, मग आपण खावे.
त्यामुळे जमत असेल तरच तुम्ही पुरणपोळी, आमटी, भात आणि कांदा भजी करा ते स्वामींच्या अत्यंत आवडीचे आहेत आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा…
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments