नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,आज 3 जुलै रविवार आहे. रविवारचा दिवस हा भगवान सूर्याला समर्पित असत या दिवशी विधीवत भगवान सूर्याची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. सूर्य मंत्राचा जप केल्याने जन्मकुंडलीतील सूर्याची स्थिती बळकट होते.
या दिवशी पूजा-अर्चना केल्याने एखाद्या व्यक्तीला अनेक दुःखातून मुक्तता मिळते. मान्यता आहे की, भगवान सूर्याची पूजा केल्याने घरात यश, सुख, समृद्धी आणि संपत्ती येते. परंतु तुम्हाला माहिती आहे काय की भगवान सूर्यला अर्घ्य अर्पण करताना काय सावधगिरी बाळगली पाहिजे.
भगवान सूर्याला अर्घ्य अर्पण करण्याचे हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. ही परंपरा वर्षानुवर्षे सुरु आहे. सकाळी स्नान केल्यानंतर भक्त सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करतात आणि प्रार्थना करतात.
सूर्यदेवाला नेहमी तांब्याच्या कलशातून अर्घ्य द्या. भगवान सूर्यला कधीही स्टील, प्लास्टिक किंवा काचेच्या बाटलीतून अर्घ्य अर्पण करु नये.
अर्घ्य अर्पण करताना भांडे दोन्ही हातांनी धरुन डोक्याच्या वर पकडून जल अर्पण करावे. यामुळे सूर्याची किरणे डोक्यावर पडतात. भगवान सूर्याला अर्घ्य अर्पण करताना कलशात अक्षता आणि लाल फुले ठेवणे शुभ मानले जाते.
मान्यता आहे की जल अर्पण करताना त्याचे शिंतोडे तुमच्या पायावर पडल्यास तुमची पूजा अपूर्ण मानली जाते. सूर्यदेवाला अर्घ्य देताना आपला चेहरा पूर्व दिशेने असावा.
तांब्याचा कलश दोन्ही हातांनी धरुन ठेवा आणि नंतर भगवान सूर्याला जल अर्पण करा.
हे लक्षात ठेवावे की अर्घ्य देताना सूर्याची किरणे त्या प्रवाहात दिसतील. यामुळे नवग्रह मजबूत होतात. सूर्य देवाला अर्घ्य देताना सूर्यमंत्रांचा जप करावा.
स्मरामि खलु तत्सवितुर्वरेण्यम् रूपं हि मण्डलमृचोथ तनुर्यजूंषि।सामानि यस्य किरणा: प्रभवादिहेतुं ब्रह्माहरात्मकमलक्ष्यमचिन्त्यरूपम्।।
सूर्याला दररोज अर्घ्य करण्याचे फायदे म्हणजे, भगवान सूर्याला जल अर्पण केल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते. मान्यता आहे की भगवान सूर्याला अर्घ्य अर्पण करताना पाण्याचा प्रवाह आणि त्यावर पडणारी किरणे पाहून मनात सकारात्मक ऊर्जा संचाकते.
धर्मग्रंथानुसार दररोज भगवान सूर्याला अर्घ्य अर्पण केल्याने कुटुंबातील सदस्य निरोगी राहतात. या व्यतिरिक्त, कुंडलीतील सूर्य दोषांशी संबंधित समस्या दूर केल्या होतात.
याशिवाय, सूर्याला जल अर्पण करताना आपला चेहरा पूर्व दिशेकडे असावा. पूर्व दिशेला सूर्य दिसत नसेल तर अशा स्थितीत त्याच दिशेला चेहरा ठेऊन जल अर्पण करावे.
लाल वस्त्र परिधान करून सूर्याला पाणी देणे अधिक शुभ मानले जाते.
जल अर्पण केल्यानंतर धूप, अगरबत्ती लावून पूजा देखील करावी.सूर्याला जल अर्पण करण्यापूर्वी पाण्यात रोली किंवा लाल चंदन घालावे, तसेच लाल फुलांसह जल अर्पण करावे. जल अर्पण करताना आपले दोन्ही हात डोक्याच्या वर असले पाहिजे.
असे केल्याने सूर्याची किरणे संपूर्ण शरीरावर पडतात. सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने नवग्रहाचे आशीर्वादही प्राप्त होतात.
तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सूर्याकडे बघत अर्घ्य द्यावे. याने डोळ्याची ज्योत वाढते तसेच शरीरात ऊर्जा निर्माण होते. अर्घ्य देताना सूर्य मंत्राचा जप करावा. कोणत्याही कारणाने सूर्य दिसत नसेल तरी पूर्व दिशेकडे तोंड करून अर्घ्य द्यावे.
अर्घ्य देत असलेले पाणी जमिनीवर पडू नये याची काळजी घ्यावी. झाडाजवळ अर्घ्य द्यावे किंवा खाली कुंडा असावा ज्यात पाणी पडेल. अर्घ्य दिल्यावर बोटाने पाणी चारीकडे शिंपडावे नंतर आपल्या मस्तक आणि डोळ्यावर लावावे.
अर्घ्य दिल्यावर तीनदा प्रदक्षिणा घालावी. कुटुंबातील मुखिया अर्घ्य देत असेल तर कुटुंबातील सर्व सदस्यांना शुभ फळ प्राप्त होतं.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments