नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, हिंदू पंचगा नुसार सूर्यग्रहणाचे खूप महत्त्व आहे. असे मानले जाते की सूर्यग्रहण काळात कोणतेही शुभ कार्य करू नये आणि अशा स्थितीत देवाची पूजा देखील केली जात नाही.
सूर्यग्रहणाशी संबंधित ही एक धार्मिक श्रद्धा आहे, परंतु वैज्ञानिक दृष्टिकोनातून देखील सूर्यग्रहण ही एक महत्त्वाची आणि अद्वितीय खगोलीय घटना आहे.
ग्रहणाची घटना धार्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून खूप खास मानली जाते. ग्रहणाची घटना धार्मिक दृष्टिकोनातून शुभ मानली जात नाही, तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून ती केवळ खगोलीय घटना आहे.
हिंदू ज्योतिष शास्त्रानुसार, पहिले सूर्यग्रहण 30 एप्रिल 2022 रोजी होणार आहे. काही राशींना या सूर्यग्रहणामुळे अशुभ परिणाम मिळतील, तर अशा काही राशी आहेत ज्यांच्यासाठी हे ग्रहण आर्थिक लाभ देईल.
तर सर्वप्रथम या 6 राशीसाठी हे सूर्यग्रहण शुभ ठरणार आहे…
1. वृषभ राशी : या काळात लोकांसाठी सूर्यग्रहणाचा प्रभाव संमिश्र राहील. तब्येतीत चढ-उतार असतील. बिझनेस करणारी मंडळी मोठी कमाई करू शकतात पण अनुभवी लोकांचा सल्ला जरूर घ्या. नोकरीत धावपळीची परिस्थिती राहील. वेळेनुसार निर्णय घ्या. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा.
2. कर्क राशी : लोकांना सूर्यग्रहणाचा शुभ प्रभाव पाहायला मिळेल. रखडलेल्या कामांना गती मिळेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. पैशाशी संबंधित प्रकरणांमध्ये लाभ मिळण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्तीतूनही लाभ होण्याची शक्यता आहे. जुनाट आजारात आराम मिळेल. मुलांकडून आनंद मिळेल.
3. सिंह राशी : सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण देखील चांगले आहे. सिंह राशीच्या लोकांना कार्यक्षेत्रात आर्थिक प्रगती तर होईलच, पण पदोन्नतीचीही शक्यता आहे. या काळात सिंह राशीचे लोक गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करतील तसेच उत्पन्नाचे स्त्रोत वाढवतील.
4. कन्या राशी : या राशीच्या लोकांना लाभाच्या संधी मिळतील. काळ अनुकूल राहील. सरकारी कामात यश मिळण्याची शक्यता आहे. यावेळी नशीब तुमची साथ देत असल्याचे दिसते. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होईल. मुलांशी संबंधित चिंता दूर होतील
5. तुळ राशी : राशीच्या लोकांसाठी वर्षातील पहिले सूर्यग्रहण शुभ राहील . जुन्या योजना यावेळी पूर्ण होऊ शकतात आणि त्यात यश मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या राशीच्या लोकांना सामाजिक कार्यामुळे सन्मान मिळेल. प्रवासादरम्यान लाभदायक सौदा होऊ शकतो. वैवाहिक जीवनात गोडवा राहील.
6. कुंभ राशी : या काळात राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. नोकरीत चांगल्या संधी मिळू शकतात किंवा पदोन्नती देखील शक्य आहे. व्यापारात विचारापेक्षा जास्त नफा मिळाल्याने उत्साह राहील. जुन्या गुंतवणुकीचा लाभ यावेळी मिळू शकतो. परंतु आरोग्याबाबत घेतलेली निष्काळजीपणा तुम्हाला महागात पडू शकतो.
याशिवाय ज्योतिष शास्त्रानुसार, या राशींवर भगवान सुर्यदेवाची अशुभ दृष्टी पडण्याची शक्यता आहे….
1. मेष राशी : वर्षातील पहिले सूर्यग्रहण शनिश्चरी अमावस्येसोबत मेष राशीत होईल. त्यामुळे मेष राशीच्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी लागेल. ग्रहणाच्या प्रभावामुळे मेष राशीचे भाग्य साथ देणार नाही आणि त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागेल. या दिवशी व्यवहार करणे टाळावे.
2. वृश्चिक राशी : वृश्चिक राशीच्या लोकांना हे ग्रहण काही अडचणी आणू शकते. ग्रहण काळात घराबाहेर पडावे लागत असेल तर सावधपणे बाहेर पडा, अन्यथा नुकसान होऊ शकते. शक्य असल्यास, या दिवशी घरीच रहा किंवा किमान गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका.
3. धनु राशी : धनु राशीच्या लोकांसाठी हे सूर्यग्रहण वरदानापेक्षा कमी नाही. योजनांमध्ये यश मिळेल. मान-प्रतिष्ठेत वाढ होईल. प्रवासात तुम्हाला खूप फायदा होईल. धनलाभ होईल. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील.
4. मकर राशी : मकर राशीच्या लोकांसाठी वर्षातील पहिले सूर्यग्रहण चांगले राहणार नाही. मुलांच्या करिअर बद्दल तुम्ही चिंतेत राहू शकता. मेहनतीचे पूर्ण फळ मिळणार नाही. कोणालाही कर्ज देऊ नका. उष्ण-सर्दीमुळे खोकला-सर्दीच्या तक्रारी राहतील. करिअरमध्ये बदल करणे टाळा…..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा.
Recent Comments