नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, उद्या कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेला अंघोळीच्या पाण्यात टाका या 5 पैकी, एक वस्तू कार्तिक स्नान केल्याचं पुण्य मिळेल..
अनेक प्रकारचे तांत्रिक प्रयोग केले जातात, त्यामुळे आपण काळजी घेणे आवश्यक आहे. काही गोष्टी लक्षात ठेवले पाहिजेत. जर तुम्हाला सतत नजरदोष होत असेल किंवा नकारात्मक शक्ती लगेच आकर्षित करतात, अशा लोकांसाठी त्रासदायक ठरू शकते.
तसेच खूप साऱ्या स्किन प्रॉब्लेमसाठी देखील हळदीचा वापर केला जातो आणि सौंदर्य उपचार करण्यासाठी देखील हळदीचा वापर वर्षानुवर्ष होत आला आहे ज्योतिष शास्त्रानुसार कितीतरी उपायांसाठी हळदीचा वापर केला जातो,
हळदीचा पिवळा रंगाला गुरु ग्रहाशी जोडले जाते म्हणून एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत जर गुरु ग्रह कमजोर असेल, तर त्याला हळदीचा प्रयोग करण्याचा सल्ला दिला जातो.
यामुळे त्याचा गुरु ग्रह मजबूत होतो. यासाठी हळदीचा कसा वापर करावा हे आपण जाणून घेऊया एक हळकुंड घेऊन ते पिवळ्या रंगाच्या दोऱ्यात बांधावे व तो दोरा हातात किया गळ्यात धारण करावा.
हा उपाय तुम्हाला गुरुवारी करायचा आहे, यामुळे आपल्याला त्याचे संपूर्ण फळ मिळेल. हळद म्हटली की, आपल्याला पिवळा रंग आठवतो. परंतु हळद तीन रंगांची असते. पिवळी हळद काळी हळद
व नारंगी हळद यातील पिवळी हळद गुरु गृहासाठी काळी हळद शनी देवांसाठी तर नारंगी हळद ही मंगळ ग्रहासाठी वापरली जाते. ज्यांना पाठदुखीचा त्रास असेल खूप उपचार करून देखील आराम मिळत नसेल.
त्यांनी हळदीचे दान करावे. ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे. त्यांनी स्वतः ला दर गुरुवारी गरजू व्यक्तींना हळदीचे दान करावे. दररोज सकाळी स्नान झाल्यानंतर श्रीहरी विष्णु भगवंतांचे पूजन करून त्यांना हळदीचा ठिपका लावावा
व आपण काही कामानिमित्त घराबाहेर पडताना श्रीहरी विष्णूच्या कपाळावर लावलेली हळद घेऊन आपल्या कपाळावर लावावी. यामुळे आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ भेटते आणि आपल्या कामात आपल्याला यश मिळते जर कोणाचे लग्न जमत नसेल. लग्नामध्ये अडथळे येत असते.
लग्न जमून वारवार मोडत असेल किंवा वैवाहिक जीवनात काही अडचणी येत असतील. त्यांनी दररोज सकाळी अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकावी व त्या पाण्याने अंघोळ करावी. आघोळीनंतर एका ताब्याच्या ताब्यात शुद्ध पाणी घेऊन
त्यात एक चिमूटभर हळद टाकून ते पाणी सुर्यदेवाना अर्पण करावे. यानंतर त्यात ताब्याला लागलेली हळद आपल्या कपाळाला तसेच गळ्याला लावून प्यावी या उपायामुळे तुम्हाला एकाच महिन्यात फरक जाणवेल.
जर तुम्हाला नोकरी व्यवसायामध्ये काही अडचण येत असेल वारंवार नोकरी सोडावी लागत असेल व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल तर दररोज सकाळी स्नानानंतर एका तांब्याच्या ताब्यात शुद्ध पाणी ठेवून त्यात एक चिमूट हळद व एक चिमूट साखर टाकावी,
तसेच एक लाल फुल टाकावे व हे पाणी सूर्य देवांना अर्पण करून आपल्या नौकरी व्यवसायात प्रगती होण्यासाठी प्रार्थना करावी.
या उपायांमुळे तुम्हाला तुमच्या मनासारखी नोकरी मिळेलच. तुमच्या व्यवसायात भरभराट येईल. ज्योतिष शास्त्राशिवाय वास्तुशास्त्रात ही हळदीचा वापर करून आपण काही प्रयोग करू शकतो.
आपल्या घरातील नकारात्मक शक्ती पालवण्याचे काम आपण हळदीने करू शकतो. आपण सकाळी ज्यावेळी देव पूजा करतो. त्यापूर्वी एक तांब्याचा तांब्या घेऊन त्यात शुद्ध पाणी भरावे त्यात थोडेसे गंगाजल टाकावे व चिमूटभर हळद टाकावी
आणि हा देवघरात ठेवून द्यावा. यानंतर देव पूजा करावी देवपूजा झाल्यानंतर या ताब्यातील पाणी संपूर्ण घरात व घरातील सर्व सदस्यांवर शिंपडावे. यामुळे तुमच्या घरातील व तुमच्या वरील सर्व नकारात्मकता निघून जाईल.
हा उपाय आठवड्यातून एक दिवस जरूर करावा आता आपण हळद व तांदळाचा उपाय जाणून घेऊया यासाठी अर्धी वाटी तांदूळ घेऊन त्यात पाणी टाकावे व रात्रभर ते तांदूळ तसेच ठेवावे सकाळी त्या तांदळाची मिक्सरमध्ये पेस्ट करावी.
त्या मिश्रणामध्ये चिमूटभर हळद टाकावी म्हणजे ते मिश्रण थोडे होईल आणि या मिश्रणाने आपल्या घराच्या मुख्य द्वारावर स्वस्तिक काढावे तांदूळ हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे.
तर हळद हे श्रीहरी विष्णूचे प्रतिक आहे आणि जर आपल्या दारावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी एकत्रित वास्तव्य करत असतील. तर अशा घरामध्ये धनाचा ओघ नेहमी राहतो घरात नेहमी कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसा येऊ लागतो.
आपल्या सर्व आर्थिक अडचणीपासून आपली सुटका होते. या छोटया-छोटया उपायांचा वापर करून आपण आपल्या जीवनात धन सुख वैभव यांची प्राप्ती करू शकतो.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments