नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, भाग्य म्हणजेच नशीब, हे आपल्याला काही वेळा साथ देत नसते आणि हेच नशीब साथ न दिल्यामुळे आपल्या जीवनात अनेक समस्या किंवा दोष निर्माण होतात.
त्यामुळे ह्या नशिबाची साथ हवी असेल तर यासाठी हा एक प्रभावी उपाय केल्यास आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील,तसेच आपल्याला नशिबाची साथ मिळू लागते.
हा उपाय आपल्या आंघोळ करताना करायचा आहे.
अंघोळ करतांना जर आपण हे 3 शब्दाचा मंत्र बोलल्यास, कितीही मोठा रोग किंवा कितीही मोठा शत्रू असो किंवा कितीही मोठं संकट सर्व दूर होईल.यासाठी आपल्याला फक्त आंघोळ करत असताना हे 3 शब्द म्हणायचे आहेत.
अगदी दररोज नित्य नियमाने लहान मुले असतील, तर त्यासाठी तुम्ही हा शब्द हा मंत्र तुम्ही नक्की बोलला पाहिजे.
त्यानंतर स्नान करा.त्यामुळे तुमचे जीवनात सर्व प्रकारचे आजार, रोग किंवा ते एखादं मोठं संकट किंवा एखादी विनाकारण त्रास देत असेल तसेच कोणी तुमचा शत्रू असल्यास,
या सर्वांपासून आपल्याला मुक्ती मिळेल.सर्व रोग ,संकटे दुर होण्यास मदत होईल. हा चमत्कारिक मंत्राचा जप तुम्हाला सकाळी अंघोळ करतेवेळी करायचा आहे.
हा मंत्र देवाधिदेव महादेव यांचा मंत्र आहे.
ज्या व्यक्तींवर भगवान शंकर प्रसन्न होतात, त्या व्यक्तीवर कोणत्याही प्रकारचे समस्या येत नाहीत.तसेच तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या शारीरिक व्याधींपासून मुक्ती हवी असेल, तर आपण या मंत्राचा जप सकाळी नक्कीच केला पाहिजे.
हा जो मंत्र आंघोळ करण्यापूर्वी म्हणायचा मंत्र म्हणजे, महामृत्युंजय मंत्र आहे. आपल्यापैकी अनेकांना हा मंत्र माहितीच आहे. मात्र त्याची विधी केल्याशिवाय हा मंत्राचा जप करू नये.
त्यामुळे याचा विधी केल्यावर या मंत्राचा जितक्या जास्त वेळा जप कराल, तितक्या तुमच्या शरीर जास्त निरोगी आणि व्याधीमुक्त राहण्यास मदत होईल.
त्यामुळे अंघोळीला जाताना आपण ज्या मगचा वापर करतो ते मगभर पाणी घेवुन किंवा तांब्याभर पाणी घेवून, त्यामध्ये आपली उजव्या हाताची करंगळी आपल्याला हा मंत्राचा जप करायचा आहे. हा मंत्र म्हणजे
“ॐ हौं जूं स:,ॐ हौं जूं स:” आपल्याला या मंत्राचा जप अठरा वेळा करायचा आहे.मग त्यानंतर या मंत्राने सिद्ध झालेले भरलेले जल आपल्याला आपल्या डोक्यावरती टाकायचे आहे.
ते पाणी डोक्यावर टाकून आपण स्नान करायचे आहे. महिलांच्या बाबतीत पाणी दररोज डोक्यावर घेण्याची गरज नाही, आपण आपल्या अंगावरती हे पाणी घेतलं तरी चालेल.
लहान मुलांच्या बाबतीत यांचे आई-वडील त्यांचे पालक यांच्यासाठी या मंत्राचा जप करून या लहान बालकाला स्नान घालू शकता. हा मंत्र आपल्या शरीर रक्षण करतो, एक प्रकारचे रक्षाकवच तो आपल्या शरीराभोवती निर्माण करतो.
तुमच्या जीवनात खूप शत्रू निर्माण झाले असतील, तर शत्रु भय नष्ट होईल. शत्रूची कोणत्याही प्रकारची चालाकी तुमच्यांवर चालणार नाही. संकटांपासून तुमचे रक्षण होईल.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments