नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, गणपतीत दुर्वांची ही 1 सेवा वर्षातून फक्त एकदाचं आईने मुलांसाठी नक्की करा…
प्रत्येक महिन्यांत ही भगवान गणेशाची चतुर्थी येत असते,मात्र जरी प्रत्येक महिन्याची चतुर्थी गणपतीला समर्पित असली तरी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाचे चतुर्थी ही तिथी सर्वात मोठी गणेश चतुर्थी मानली जाते.
असे सांगितले जाते की, या दिवशी गणपतीचा जन्म झाला होता, या दिवशी हिंदू धर्मातील प्रत्येक घरांत गणपती बाप्पाला स्थापना केली जाते आणि तेही दहा दिवसांसाठी त्याची पूजा करतात.
19 सप्टेंबर रोजी दिवशी श्री गणेश चतुर्थी आली आहे.या दिवशी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमन होईल. गणपतीची स्थापना, गणपतीची प्राणप्रतिष्ठा आपण याच दिवशी करीत असतो.
मात्र या कोरोनाच्या काळात तसेच इतर कारणामुळे जर भटजी उपलब्ध झाले नाहीत, तर घरच्या घरी गणपतीची स्थापना कशी करावी?,किंवा भगवान गणपतीची स्थापना, प्राणप्रतिष्ठा घरच्या घरी कशी करायची आहे?..
यासाठी आपल्याला सर्वप्रथम, भगवान गणेश घरी आणत असतांना, तेव्हा घरात प्रवेश करताना, पाणी ओवाळून आणि औक्षण करून गणपतीची मूर्ती घरात घ्यावी. तसेच तुम्हाला घरांत ज्या ठिकाणी गणपतीची स्थापना करायची आहे, ती जागाची साफ-सफाई आणि डेकोरेशन हे अगोदरच करून ठेवावी.
विड्याचे पान आणि फुल तसेच जानवी, सुपार्या आणि तांब्याचा कलश,समई तसेच नारळ हा सोलून घ्यावा. निरांजन ,घंटा आणि शंख या वस्तू स्वच्छ करून, पवित्र करून, पूजास्थानी ठेवून ठेवावे.
मग यानंतर चंदन उगाळून त्याचे गंध तसेच गुलाल, तांदूळ, कापसाचे वस्त्र एका स्वच्छ असलेल्या ताटात काढून ठेवावे.मग घरातील पुरुषांनी डोक्यावर टोपी घालून पूजेस बसावे.
सगळी पूजा विधी किंवा सगळ्या गोष्टी तुमच्या एका जागेवर व्यवस्थित ठेवाव्याव. ज्यामुळे पुजेत कोणताही त्रास होणार नाही. मग त्यानंतर तुम्हाला भगवान गणपतीची मूर्ती ही गणपतीच्या जागेवर थोडे तांदळाचे दाणे टाकून,ती मूर्ती त्या जागेवर स्थापन करावी.मग त्यानंतर पुढची पूजा करावी.
यामध्ये सर्वप्रथम कलश पूजन करावे, तांब्यात पाणी विड्याचे पान आणि पैसा सुपारी नारळ ठेवून, नारळावर आणि तांब्यावर कुंकवाने स्वस्तिक काढावे. कुंकू ओले करून, कलश स्थापना करावी.हा विधी करीत असतांना,
“हे देवा तुझ्यामध्ये विष्णू, लक्ष्मी, ब्रह्मा सावित्री, महादेव, पार्वती आणि मध्यभागी मातृगया, सागरात सप्तगन असणाऱ्या सप्त सरोवर,चारी वेद, गायत्री या सर्वांनी उपस्थित राहून या पूजेला प्रसन्न आणि पवित्र करावे, असे म्हणावे.”
त्यानंतर गहू किंवा तांदळाने अष्टकमळ काढून, त्यावर कलश स्थापना करावी. श्री महागणपतीच्या मूर्तीवर फुलाने पाणी शिंपडावे आणि तेच पाणी आपल्या डोळ्यात लावावे.
तसेच आपल्या घराच्या चारी दिशांना पाणी शिंपडावे. मूर्तीच्या हृदय स्थानावर आपला अंगठा ठेवून, महामृत्युंजय मंत्र म्हणावा, त्यामुळे भगवान गणेशच्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा होते.
मग त्यानंतर मूर्तीवर फुलाने पाणी शिंपडावे आणि चंदन तसेच गुलाल, अष्टगंध आणि अक्षदा लावाव्या. मूर्तीस जानवे घालावे. फुलांचा हार आणि 21 दुर्वा ,लाल फुल तसेच कापसाचे वस्त्र, अक्षदा वाहावे. 21 नावाच्या बाप्पाला आवडणाऱ्या नावांचा उल्लेख करावा.
ही 21 नावे अशी आहेत, गनंजय,गणपती महागणपती,हेरंब,धरनिधर, यक्ष, वरद, शिव कश्यप नंदन,शिव प्रसाधन, अमोग,अमित, मंत्र चिंतामणी, विधी, सुमंगल, बीच, आशापूरक,
वाकसिद्धी, सिद्धिविनायक, धुंडीविनायक या नावाचा जप करावा.मग भगवान गणपतीचीची मूर्ती जागेवर मूर्ती जागेवर बसवून, मोदकाचा नैवेद्य दाखवून आरती करावी.
अशा अत्यंत सोप्या रीतीने तुम्ही घरच्या घरी तुमच्यां गणपतीची प्राणप्रतिष्ठा करू शकतात.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments