नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, गुरुपौर्णिमेपर्यत करा 11 दिवसांची स्वामीसेवा, प्रत्येक स्वामीभक्तांला स्वामी दर्शन देतील..
श्री स्वामी समर्थ, स्वामी तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण करू दे आणि नेहमी तुम्हाला आनंदात सुखात आणि हसत खेळत ठेवते हीच स्वामी चरणी प्रार्थना. तुमच्या प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी आणि तुमचे अशक्यही काम शक्य करण्यासाठी गुरु पौर्णिमेपर्यंत एक छोटीशी करायची सेवा आज तुम्हाला सांगणार आहे.
गुरूंच्या उपकार यांनी आपले मन कृतज्ञतेने भरून येते, तेव्हा आपल्या तोंडून श्लोक बाहेर पडतो. ” गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा” “गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः”
आषाढ शुद्ध पौर्णिमा हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून स्वीकारला आहे, त्यानिमित्त महर्षी व्यासांनी वेदांचे 4 भाग, 6 शास्त्रे आणि 18 पुराणांची रचना करून मानवी जीवनाला संपन्न केले आहे. या सर्वातून भगवंताचे गुणगान करून मनुष्याला जीवन जगण्याचे मार्गदर्शन केले आहे.
भारतीय पूर्वसुरींनी व्यासांचे पूजन यादीने केल्यामुळे या दिवसाला व्यास पौर्णिमा अथवा गुरु पौर्णिमा म्हणतात. गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर होय. जलाशयात पाणी आहे परंतु घटाने आणि घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही, त्याचप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही. हे सर्वांनी लक्षात ठेवावे.
ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे. त्यांच्याएवढे श्रेष्ठ गुरुजी, आचार्य अद्याप झालेले नाहीत, अशी आपली श्रद्धा आहे. अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात कथन केले आहे.
एवढेच नव्हे तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जात. ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे, असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला. ज्ञानियांचा राजा म्हणून ज्याला मानतात, त्या ज्ञानदेवांनीसुध्दा ज्ञानेश्वरी लिहिताना ‘व्यासांचा मागोवा घेतू’ असे म्हणून सुरुवात केली.
व्यासपौर्णिमेच्या दिवशी ‘ओम नमोस्तुते व्यास, विशाल बुद्धे’ अशी प्रार्थना करून, त्यांना प्रथम वंदन करण्याचा प्रघात आहे, परंपरा आहे. आपल्या देशात रामायण-महाभारत काळापासून गुरु-शिष्य परंपरा चालत आली आहे. आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो,
त्याच विद्येच्या बळावर आपण सर्वांचा उद्धार करीत असतो. अशा या गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य होय. महर्षी व्यासांपासून अशी प्रथा रूढ झाली, ती आजमितीपर्यंत.
तर या पवित्र दिवशी तुम्हाला एका ठिकाणी एक दिवा लावायचा आहे.त्यामुळे तुमचे पितृ प्रसन्न होण्यास मदत होईल, याशिवाय तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील, पितृदोष तुम्हाला कधी होणार नाही.तसेच तुम्हाला पूर्वजांची छाया तुमच्यावर कधी बाधा म्हणून येणार नाही.
या शेवटच्या दिवशी तुम्ही सुद्धा घरात येथे एक दिवा लावाला पाहिजे. मग हा दिवा तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा अशा कोणत्याही प्रकारचा तुमच्या घरात तुम्ही दिवा लावू शकता. तसेच हा दिवा संध्याकाळी लावायचा आहे. जेव्हा आपण देव पूजा करतो,
त्या वेळेस तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. दिवा लावण्याआधी आपण सगळ्यात आधी आपले हात-पाय तोंड स्वच्छ धुऊन पवित्र झाल्यावर, मग त्यानंतरच दिवा बनवायचा आहे.मग त्यानंतर देवपूजा करताना, आपण आपल्या घरा बाहेर जायचं आहे,
आपल्या अंगणात किंवा आपल्या ओट्यावर जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण दिवा लावायचा आहे.
मात्र या दिव्याची ज्योत ही दक्षिण दिशेकडे असणे आवश्यक आहे. आपण दिवा कुठे हि ठेवा, फक दिव्याची ज्योत दक्षिण दिशेकडे करून तुम्हाला ठेवायचे आहे.मग तुम्ही दिवा उत्तर दिशेकडे ठेवावा. याची काळजी तुम्हाला घ्यायचे आहे.
दिव्याची ज्योत दक्षिण दिशेकडे असेल, तरच त्या दिव्याचा लाभ तुम्हाला मिळणार आहे. तर असा दिवा दक्षिण दिशेकडे ज्योत करून, गुरुपौर्णिमाच्या दिवशी नक्की घरात लावा..
या उपायामुळे,तुमच्या घरात लक्ष्मीचा वास तुमच्या घरात लक्ष्मी प्राप्ति होईल आणि बरकत राहील. सुख-समृद्धी राहील,पैसा कधीच कमी पडणार नाही.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.
Recent Comments