नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, हनुमान चालीसा वाचल्यास मिळतात हे फायदे!!
तुमच्या आयुष्यात बऱ्याच अडचणी येत आहे का? मग या सगळ्या समस्यांवर एकच उपाय आहे ते म्हणजे हनुमान चालीसा होय. अगदी बरोबर ऐकलं, हिंदू धर्म ग्रंथानुसार कोणत्या देवतेला प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या मंत्राचा जप आणि चालीसाचे पठण हा अत्यंत प्रभावी उपाय मानला जातो.
असे म्हणतात यामुळे देवता लवकर प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात. प्रत्येक चालीसा ही 40 दिवस सतत पाठ केल्याने जीवनातील अनेक अडचणी संपतात. दुःख नाहीसे होतात आणि अनेक संकटातून मुक्ती सुद्धा मिळते. तसेच आयुष्यातील अडचणी संपत नसतील तर हनुमान चालीसाचे उपाय कराच.
हनुमान चालीसाचे पठण केल्याने तिचा आत्मविश्वास वाढतो. जर तुम्हाला तुमचा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर हनुमान चालीसा जप केल्यास फायदा होईल आणि तुमच्या प्रत्येक कामात याचा फायदा नक्कीच होईल. हनुमान चालीसाचे पठण केल्याने व्यक्तीची आर्थिक समस्या दूर होते, असे म्हटले जाते.
तुम्हालाही तुमच्या आयुष्यात आर्थिक समस्या येत असतील तर सकाळी लवकर त्यानंतर एकदा हनुमान चालीसाचे वाचन करावे त्यामुळे आर्थिक समस्यांपासून सुटका मिळते आणि पैसा टिकून राहतो. हनुमान चालीसाचे पठण केल्याने भीती दूर होते असे म्हणतात.
त्या वेळी कोणत्याही प्रकारची भीती आणि शत्रूची भीती टाळण्यासाठी हनुमान चालीसाचे पठण केल्यास काळी जादू, चेटूक आणि भूत कोणतीही दुर्घटना आणि अकाली मृत्यूची भीती दूर होते.
हनुमान चालीसा ही शत्रूंपासून रक्षण करते. हनुमान चालीसाचे नियमित पठण केले असते व्यक्तीला अनिष्ट शत्रूपासून मुक्ती मिळते. वाईट करणाऱ्या लोकांना चांगलीच अद्दल घडू शकते. कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी हनुमान चालीसाचे पठण करावे.
जर तुम्हाला वारंवार दुखापत होत असेल किंवा अपघाताचे बळी ठरत असाल तर हनुमान चालीसा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. हनुमान चालीसा पाठ केल्याने बरेच दुर्घटना टळतात. हनुमान चालीसाचा उपाय मंगळवारी सुरू करणे हे फायदेशीर ठरते.
विशेषत मंगळवारी हनुमान चालीसाचे पठण केल्यास हनुमान जी प्रसन्न होतात, तसेच कुंडलीतील मंगळाची स्थिती मजबूत होते आणि यामुळे प्रत्येक चांगल्या कामात यश मिळते.
ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ दोष असेल तर त्याला लाख प्रयत्न करूनही यश मिळत नाही. सदर त्याला अपयश मिळते, अशा परिस्थितीत मंगळवारी हा उपाय केल्याने खूप प्रभावी ठरतो.
मंगळवारी एक नारळ घ्यायचा आहे सोबतच एक लाल रंगाचा कापड घ्यायचा आहे ते नारळ त्या लाल रंगाच्या कपड्यात बांधायचे आहेत आणि नंतर हनुमान मंदिरात नारळ अर्पण करायचा आहे किंवा तुम्ही वाहत्या नदीत सुद्धा ते नारळ अर्पण करू शकता.
हा उपाय तुम्हाला साथ मंगळवार करायचा आहे, यामुळे तुमचा पत्रिकेतील मंगळ दोष दूर होईल. घरांत सुख शांती आणि समृद्धी मिळवायची असेल जीवनात प्रगती करायची असेल तर मंगळवारी हनुमान जी च्या मंदिरात जाऊन त्यांची पूजा आणि त्यांना गुळ, हरभरा अर्पण करावे.
नंतर माकडांना गूळ आणि हरभरा खाऊ घालेल देखील अत्यंत शुभ मानले जाते. हा उपाय तुम्हाला 21 मंगळवार पर्यंत करायचा आहे. यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल.
तुमच्या घरात पैसा कायम टिकून राहील आणि हनुमानजीचा आशीर्वाद आमच्यावर कायम राहील. मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा आणि त्यामध्ये फक्त लाल रंगाची वात वापरावी.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments