नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,श्रावण महिना सुरू झाला आहे. हा महिना भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे. शिवभक्त विशेषत: या महिन्याची प्रतीक्षा करतात. श्रावण महिना 14 जुलै 2022 पासून म्हणजेच आजपासून सुरू झाला आहे आणि 12 ऑगस्ट 2022 रोजी संपेल.
या महिन्यात भगवान शंकराची विशेष पूजा केल्यास विशेष फल प्राप्त होते. भोलेनाथांना श्रावण महिना अतिशय प्रिय आहे. या महिन्यात त्यांना प्रसन्न करणे खूप सोपे आहे. असे मानले जाते की या महिन्यात भोलेनाथ कैलास पर्वत सोडून पृथ्वीवर फिरायला येतात.
श्रावण महिन्यात अशा काही गोष्टी आहेत ज्या विसरूनही करू नयेत. या कामांबद्दल जाणून घेऊया..
श्रावण महिन्यात कांदा, लसूण आणि मांसाचे सेवन करू नये. याशिवाय श्रावण महिन्यात वांग्याचे सेवन करणे वर्ज्य मानले जाते. श्रावण महिन्यात सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत.
संपूर्ण श्रावणभर भोलेनाथाला पाणी आणि बेलची पाने अर्पण केल्यास बरे होईल. श्रावण महिना तपश्चर्या आणि ध्यानाचा महिना आहे, त्यामुळे जीवनात चैनीपासून दूर राहावे. श्रावणमध्ये गादीवर झोपू नये अशी श्रद्धा आहे. या दरम्यान जमिनीवर झोपावे.
श्रावण महिन्यात केस आणि दाढी कापू नयेत. तसेच यावेळी नखे कापू नयेत. तसेच याशिवाय, श्रावण महिना हा पावसाळा ह्या ऋतूत येतो. श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे.
या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे.पावसाळ्यातील वातावरण हे दमट, ओलसर असते. या काळात रस्त्यावरचे खाद्यपदार्थ खाण्यास आपण मज्जाव करतो ते ह्याच खराब वातावरणाच्या कारणामुळे.
हेच कारण धर्मशास्त्रांनी देखील दिले आहे. पावसाळी वातावरणात मांसावरील बॅक्टेरिया वेगाने वाढतात. उन्हाळ्यात उष्णता, सूर्यप्रकाश यामुळे बॅक्टेरिय़ा वाढू शकत नाही. मात्र पावसाळ्यात हे जीवाणू आणि विषाणू वेगाने वाढतात.
त्यामुळे पावसाळ्यातला म्हणजेच श्रावणातला मांसाहार हा अनेक रोगांना आमंत्रण देणारा ठरू शकतो. त्यामुळे महिन्यात मांसाहार केल्यास वेगवेगळ्या व्याधी जडू शकतात. अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात.
श्रावण महिना हा प्रेम आणि प्रजनन काळ मानला जातो. ह्या काळात मासे तसेच इतर पशु, पक्ष्यांमध्ये गर्भधारणेची संभावना असते. कुठल्याही गर्भवतीची हत्या करणे हे हिंदू धर्मात पाप मानले जाते.
तसेच कुठल्याही गर्भवती जीवाला खाल्ल्याने मानवाच्या शरीरात काही हार्मोनल समस्या देखील उद्भवू शकतात. याचबरोबर, तसेच ह्या काळात मासे प्रजनन करत असल्याने जर मासे खाणं चालू ठेवले तर माशांच्या प्रजाती संपून जाण्याची देखील भीती असते.
त्यामुळे वर्षभर खाण्यासाठी नवे मासे जन्मावेत, यासाठी श्रावणात मासे खाणं वर्ज्य मानले जाते. पावसाळ्यात शरीराचे तापमान वाढणे शरीरासाठी खूप घातक ठरू शकते.
त्यामुळे पचनात व्यत्यय येऊ शकतो, हृदया संबंधी आजार होऊ शकतात, शारीरिक दुखणे उद्भवू शकते. त्यामुळे ह्या महिन्यात मद्यपान करणे वर्ज्य मानले जाते.
भांडने प्रत्येकच्या घरात होत असतात., जर तुम्ही सोमवारी महादेवाची पुजा करताना घरात शांती ठेवावी. ज्या घरात भांडण तंटा असेल त्या घरी महादेव निवास करत नाहीत.
त्याना जनावरे खूप प्रिय आहेत त्यामुळे महादेवाच्या पुजेत नंदिला पण पुजावे. सोमवारी सर्प दिसलास त्याला मारू नये. सजन व्यक्ती ,साधु-संत यांचा कधीच अपमान करु नये.
श्रावण सोमवारी घरी आलेला अतिथी किंवा भिकारी यांना कधीही उपासी परत पाठवू नये. महादेवन पांढरा रंग खुप आवडतो त्यामुळे त्याना पांढरी फुले वाहिली जातात पण केतकीच्या फुल पांढरे असूनही कधी वाहु नये.
कधी शंखाचा वापर पुजेत करू नये कारण महादेवांनी शंकेश्वर नावाच्या राक्षसाचा नाश केला होता. पण तुम्ही त्याचा वापर शंकनाद करण्यासाठी करू शकता.
कधी महादेवन तुटलेले तांदुळ अर्पण करू नये .आणि हळद, कुंकू या स्त्री समंदित वस्थु कधी वाहु नये .महादेवाना नारळ ,वाळलेले फुले कधी अर्पण करू नये. शिवलिंग वर तुळस वाहू नाय किंवा त्याचे पाणी तुळशीत टाकु नये.
श्रावण सोमवारी महादेव मंदिरात तुपाचा दिवा लाववा .जर मंदिरात जाणे शक्य नसेल तर आपल्या घराच्या ईशान्य कोप्यात हा दिवा लावावा.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments