नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, 14 ऑक्टोबर सर्वपित्री अमावस्या घरावरून ओवाळून ही 1 वस्तू इथे टाका..
हिंदू दिनदर्शिकेनुसार भाद्रपदाच्या अमावस्याला कुशाग्रहणी अमावस्या आणि पिठोरी अमावस्या म्हणतात. पिठोरी अमावस्येला देवी दुर्गासह 64 देवींच्या मूर्ती बनवून त्यांची पिठापासून पूजा करण्याची परंपरा आहे.
पिठोरीमध्ये पिठ या शब्दाचा अर्थ पीठ असा होतो, त्यामुळे याला पिठोरी अमावस्या असेही म्हणतात.
तसेच याशिवाय जर पितृपक्षात जर तुम्हाला गोमेतेला ही एक एक वस्तू खाऊ घातली, तर तुमच्या सर्व अडचणी किंवा दुःख सर्व संकट आणि समस्या दूर होण्यास सुरुवात होईल.
कारण हिंदु धर्मानुसार,जितके महत्व पितृपक्षामध्ये कावळ्याचे आहे, तेवढेच गायीचे महत्त्व असल्याचे सांगितले जाते.त्यामुळे गाईला जर आपण एक वस्तू खाऊ घातली, तर आपल्या घरातल्या सर्व अडचणी निघून जातात.
मात्र हा उपाय,तोडगा तुम्हाला फक्त पितृपक्षात करायचा आहे.कारण या पितृपक्षाचे पंधरा दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात. या पंधरा दिवसांमध्ये आपण पितरांची सेवा केली गेली पाहिजे,
पितरांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केले गेले पाहिजे, यासाठी हा एक उपाय आहे. त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्कीच केला पाहिजे.
या चमत्कारिक उपायासाठी तुम्हाला फक्त एकाच वस्तूची गरज लागणार आणि ती वस्तू म्हणजेच, तुमच्या घरात असलेले गहू होय. तुम्हाला एक मूठभर घ्यायचे आहे.मग त्यानंतर हे गहू घेतल्यानंतर,
ते गहू तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर घेऊन जायचे आहे. म्हणजे मुख्य दाराच्या बाहेर जाऊन,तुम्हाला ते गहू आपल्या मुख्य दारावर ओवाळण्याचे आहे.
जसे घड्याळातील काटे फिरतात, त्याचप्रमाणे हे गहू तुम्हाला तीन वेळेस फिरवायचे आहेत.मग हे गहू तीन वेळा मुख्य दाराच्या वरपासून खालपर्यंत गोल फिरवून झाल्यानंतर ते गहू तुम्हाला गाईला खाऊ घालायचे आहे.
परंतु जर तुमच्याकडे गाई नसेल,तर त्यावेळी तुम्ही ते उपायासाठी वापरलेले गहू समुद्रात किंवा नदीमध्ये किंवा तलावात विसर्जित करू शकतात. मात्र प्रथम गाईला प्राधान्य दिले पाहिजे.जेव्हा गाय मिळतच नसेल,
तेव्हा पाण्यात विसर्जित करू शकतात. घरावरून ओवाळून म्हणजे मुख्य दारावरून ओवाळून, हे गहू विसर्जन करावे.
तुम्हाला तुमच्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी हा उपाय येत्या पितृपक्षामध्ये आवश्यक केला पाहिजे.तसेच याशिवाय पितृ दोष काढण्यासाठी श्राद्ध पक्षात पंचबली भोग अर्पण करावा.
गाय, कावळा, कुत्रा, देव आणि मुंगी पंचबली भोगामध्ये येतात. एवढेच नाही तर कावळ्याला 15 दिवस सतत भोजन दिले पाहिजे. यानंतर ब्राह्मणांनाही खायला द्यावे.
पितृ दोषापासून मुक्त होण्यासाठी ब्राह्मण किंवा गरजूंना पितृपक्षाच्या काळात अन्न दान आवश्यक करा आणि त्यांना आदरपूर्वक दान, दक्षिणा देऊन निरोप द्यावा. ब्राह्मणांना भोजन देताना लक्षात ठेवा की ते पूर्वजांच्या आवडीचे असावे
आणि तुम्ही स्वत:च्या हातांनी बनवलेले असावे.पितृ पक्षात कुत्रा, गाय, कावळा, पक्षी इत्यादींना पोळी किंवा भाकरी खाऊ घालावी.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments