नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे. महाराष्ट्राच्या नववर्षाची सुरूवात गुढीपाडव्यापासून होते.
हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो.
या वर्षी 2 एप्रिल 2022 ला महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात मराठी नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं.
त्यामुळे पारंपरिक वेषभूषा करून, घरोघरी गुढी उभारून, गोडाधोडाचा स्वयंपाक करून, सार्वजनिक ठिकाणी गुढीपाडवा निमित्त रांगोळ्या, देखावे, शोभायात्रा काढून, एकमेकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतात आणि मराठी नववर्षाचं स्वागत केलं जातं.
तसेच गुढीपाडवा करण्यामागे पौराणिक कथा सांगितली जाते ती म्हणजे, शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने मातीचे सैन्य तयार केले आणि त्यावर पाणी शिंपडले, त्यांना जीवन दिले आणि प्रबळ शत्रूचा पराभव केला. त्याच्या विजयाच्या अपेक्षेने शालिवाहन शक सुरू झाला.
त्याच दिवशी या कथेचा मथितार्थ असा की, त्यावेळी संपूर्ण हिंदू समाज बेहोश झाला होता. गुलामगिरी इतकी मादक बनली होती की ती भूतकाळाची गोष्ट बनली होती.
समाजात क्षेत्रतेज संपले होते. शालिवाहनने आपल्या सामर्थ्याचा विसर पडलेल्या समाजात आत्मविश्वास आणि सशक्तीकरण निर्माण केले. त्याच दिवशी रामाने बळीचा पराभव करून दक्षिणेतील लोकांना शांत केले.
यावेळी सर्वांनी ध्वजारोहण करून आनंद साजरा केला. असेही मानले जाते की लंका जिंकून श्रीराम अयोध्येला परतले तेव्हा लोकांनी ध्वजारोहण करून त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.
त्यामुळे हिंदू धर्मात गुढीपाडवाला अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. हा दिवस नवीन वर्षाचा चैत्र महिन्याचा पहिला दिवस चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस असतो.
जर तुम्ही या दिवशी जर हा एक उपाय केला तर नक्कीच त्याचा लाभ तुम्हाला होईल आणि सगळं काही तुम्हाला मिळू लागेल आणि घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही.
तुम्हाला फक्त जेव्हाही तुम्ही गुढी उभाराल, तेव्हा गुढी उभारताना तुम्हाला एक सोपा उपाय करायचा आहे.
आपल्या प्रत्येकाच्या घरी गुढी उभारली जाते आणि गुढी उभारताना आपण साडी, तांब्या, साखरेचे कंगन, लिंबाचा पाला असं सगळं लावत असतो आणि ती गुढी घराच्या बाहेर दरवाजाकडे उभारत असतो.
तर गुढी उभारण्याचा आधी तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त 11 रुपये लागणार आहेत आणि एक छोटासा कापडाचा तुकडा लागणार आहे.
मग तो कोणत्याही रंगाचा असेल तरीही हरकत नाही. फक्त तुम्हाला एक छोटसं कापड किंवा रुमाल घ्यायचे आहे. मग त्या कापडामध्ये तुम्हालाही 11 रुपये बांधायचे आहेत, मग 11 रुपये बांधून झाले की तुम्ही गुढीला तांब्या लावायचा आहे.
मग त्या ताब्यामध्ये ते कापडात बांधलेली 11 रुपये तुम्ही टाकून द्यायचे आणि तो तांब्या तुम्ही गुढीवर गुढी उभारताना लावायचा आहे.
जेव्हा तुम्ही गुढी खाली उतरवलं सनी देवघरात त्याची पूजा करत असाल, तेव्हा तो ताब्यामध्ये ठेवलेले 11 रुपये त्या कापडात बांधले असू द्यायचे आणि ते बांधले 11 रुपये तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये जिथे तुम्ही पैसे ठेवतात तिथे ठेवायचे किंवा दुकानात गल्यात ठेवू शकता.
या उपायामुळे तुमच्या घरात दुकानात बरकत येईल, पैसा खर्च होणार नाही. पैसा येऊ लागेल, धन-वृद्धी आणि सुख-समृद्धी होईल, तर हा उपाय सोपा उपाय नक्की करा…
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा.
Recent Comments