24 ऑक्टोबर, विजयादशमी दसरा आपट्याच्या पानाचा प्रभावी तोडगा अखंड लक्ष्मी प्राप्ती होऊन प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला भरपूर यश मिळेल..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,  24 ऑक्टोबर, विजयादशमी दसरा आपट्याच्या पानाचा प्रभावी तोडगा अखंड लक्ष्मी प्राप्ती होऊन प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला भरपूर यश मिळेल..

श्री स्वामी समर्थ, सर्व मंगल मांगल्ए शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते..

संपूर्ण वर्षभर भगवान श्री हरीविष्णु आणि माता लक्ष्मीचा खूप आशीर्वाद मिळविण्यासाठी दसऱ्याच्या रात्री आपट्याच्या पानांचा हा छोटा टोटका आपण नक्की केला पाहिजे.. दसरा या वर्षी 24 ऑक्टोबर मंगळवारच्या दिवशी आहे

आणि या दसऱ्यानिमित्त आपण आपल्या देवघरातील सर्व देवी-देवतांना अर्पण करतो, तसेच सोबतच आपल्या ग्रामदैवतांना सुद्धा ही आपट्याची पाने मनोभावे चढवली जातात किंवा अर्पण केली जातात ..

तसेच मित्र-मंडळींना आपट्याची पाने सोनं म्हणून आपण वाटतो,तसेच एकमेकांना दसऱ्याच्या विजयादशमीच्या शुभेच्छा देतो. याशिवाय जे लोक आपल्यापेक्षा वयाने, नात्याने जेष्ठ असतात,

अशा ज्येष्ठ व्यक्तींची आपण आशीर्वाद आणि त्यांच्याकडून सुद्धा ही पाने देत असतो. त्यांनाही देतो,कारण या आपट्याच्या पानांचं आपल्या हिंदू धर्मशास्त्रात खूप मोठं महात्मे सांगितलेला आहे.तसेच या दिवशी एक चमत्कारिक मंत्राचा जप करायचा आहे..

कुठलेही काम करताना शुभमुहूर्त पाहिला जातो. मग ते घर घ्यायचे असो, एखादे शुभ कार्य असो किंवा एखादं काम करण्यासाठी देखील मुहूर्त पाहिला जातो पण ही सर्व कामे दसऱ्याला करायचे असेल,

तर त्यासाठी वेगळा मुहूर्त काढण्याची गरज नसते. कारण दसरा हा विना मुहूर्ताचा मुहूर्त आहे, म्हणजे कुठलाही काम दसऱ्याला करायचा असेल तर यासाठी मुहूर्त काढला जात नाही.

कारण शास्त्रानुसार हा दिवस शुभ आहे आणि पवित्र असल्याने या दिवशी कुठलेही काम केले, तर ते स्थिती म्हणजेच पूर्ण होते. त्या कार्यामध्ये तुम्हाला सफलता मिळते.

त्यामुळे अनेक लोक या दिवशी घराची वास्तुशांती नवीन बिजनेसची सुरुवात किंवा दुकानाचे यासारखी कार्य करतात. विजयादशमीच्या दिवशी विजय नामक मुहूर्त येतो. तो सायंकाळी सूर्य अस्त आणि ताऱ्याचा उदय होत असताना असतो,

या मुहूर्तावर तुम्ही जर मंत्र जप केल्यास तर तुम्हाला अध्यात्मिक आधिदैविक आणि त्याचबरोबर तुम्ही लौकिक सिद्धी देखील प्राप्त होईल. याशिवाय, हाती घेतलेलं काम पूर्ण होईल, त्यामुळे विजय मुहूर्त विजयादशमी सुद्धा म्हटलं जातं, म्हणजे तुम्ही जे काम हाती घ्याल त्यात तुमचा विजय होईल.

तुम्हाला सायंकाळच्या वेळी म्हणजे या विजय मुहूर्तावर एक मंत्र जप करायचा आहे. या दिवशी सायंकाळी सूर्य अस्त होत असताना आणि ताऱ्याचा उदय एक मंत्रजप करायचा आहे. या वेळी तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे,

“ओम अपराजिताय नमः, ओम अपराजितय नमः, ओम अपराजीतय नमः या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे, मग यानंतर हनुमान चालीसा मधील मंत्र जप करायचा आहे.

या मंत्राच्या जप केल्यास तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असाल, तिथे तुम्हाला यश मिळेल. तुमच्या कष्टाचे तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल. तुम्हाला वेळ त्याच दिवशी सायंकाळी फिरायला जातात किंवा नातेवाईकांना भेटायला जातात

पण तुम्हाला जायचे असेल तर तुम्ही हा मंत्र जप करून जा. या संधीचा या शुभमुहुर्ताचा लाभ अवश्य घ्यावा. ही संधी चुकवू नका तर तुम्हीदेखील दसऱ्याच्या दिवशी नक्की करा. तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर होतील..

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!