नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, दत्तजयंती विशेष सेवा 21 दिवसांची सेवा स्वामींची उच्च कोटीची सेवा.. ईच्छा सुधा पूर्ण होतील
श्री स्वामी समर्थ, आपण आपले आयुष्य जगत असताना आपल्या जीवनामध्ये काही लोक आपले मित्र बनतात तर काही लोक आपले शत्रू बनतात. कधी कधी आपण आयुष्य जगताना निर्माण झालेले शत्रू इतके बलवत्तर,
इतक शक्तिशाली बनत आहेत त्यांच्यापासून आपल्याला त्रास होऊ लागतो यालाच आपण शास्त्रांमध्ये शत्रुपीडा असे म्हणतो. जेव्हा तुम्ही काही चांगलं काम किंवा तुमची प्रगती होते.
मग तुमची प्रगती होऊ लागते तेव्हा तुमची होणारी प्रगती आहे अनेक लोकांच्या डोळ्यात खुपते त्यांना तुमची झालेली प्रगती आवडत नाही, ते त्याचा तिरस्कार करण्यास सुरुवात करतात आणि हेच लोक तुमचे शत्रू बनत असतात.
कधीतरी मित्रांनो तुमच्या जवळचे असणारे मित्र सुद्धा तुमच्या प्रगतीमुळे तुमचे शत्रू बनतात. तुमच्या नोकरीच्या ठिकाणी तुमच्या घराच्या शेजारच्या लोकांचा किंवा तुमच्या उद्योगजगतातील स्पर्धक आहे या सर्वांपासून जर तुम्हाला त्रास होत असेल यालाच आपण शत्रुपीडा असे म्हणतो.
तुमचे शत्रु आज सांगितलेल्या या उपायांनी कमी अथवा नष्ट होण्यास मदत होईल. याशिवाय त्यांचे बळ कमी होईल व त्यांच्या पेक्षा तुमचं बळ जास्त होईल.
आज आपण या लेखामध्ये शत्रुपीडावरचा एक उपाय सांगणार आहोत त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि तुमची शत्रुपीडा नाहीशी होईल. यासाठी आपण रोज देवपूजा करत असतो त्यामध्ये आपण दिवा तर नक्की लावत असाल देवपूजा करताना तुम्हाला दिवा लावायचा आहे
आणि तो दिवा लावल्यानंतर तुम्हाला एक छोटासा मंत्र म्हणायचा आहे. या मंत्राचे शब्द इतके सामर्थ्यवान आणि इतकी ताकदवर आहे की, तुमचे शत्रु या मंत्रात आणि या उपायापुढे नक्कीच गुडघे टेकले.
आपण जे रोज देव पूजा करतो, त्यावेळेस आपण दिवा नक्की लावत असाल. कारण देवासमोर दिवा लावण्याचे मुख्य कारण म्हणजे दिव्यामुळे शुभ आणि मंगल आपल्या घरामध्ये घडत असतात. देवी-देवता, भगवंत, स्वामी आपल्यावर प्रसन्न होत असतात.
खरंतर दिवा हा आपल्याला परमात्म्याशी, ईश्वराशी जोडत असतो आणि म्हणूनच कोणतेही मंगल कार्य, त्या मंगल कार्यामध्ये आपण हा दिवा नक्की लावत असतो. ज्या घरांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावला जातो.
त्या घरातील वातावरण पवित्र असते. तसेच घरांत सकरात्मक ऊर्जा भरली जाते. हा उपाय करताना आपल्याला काही नियमांचं पालन करायचे आहे.
पहिला नियम आहे हा दिवा लावताना स्त्री असेल तर स्त्रीने डोक्यावर पदर घेतला पाहिजे जर पुरुष हा दिवा लावत असेल तर त्या पुरुषाने आपल्या डोक्यावरची टोपी नक्की नक्की पाहिजे.
जर तुमच्याकडे टोपी नसेल तर तुम्ही डोक्यावर रुमाल देखील ठेवू शकता. मित्रांनो दुसरी गोष्ट आहे ती, म्हणजे आपण दिवा लावताना त्यात एखाद्या झाडाचे पान फूल किंवा तांदूळ, धनधान्य ठेवायचा आहे
आणि नंतर त्या धान्यावर त्या फुलावर त्या पानावर आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. कारण तसाच जमिनीवर ठेवायचा नाही. त्यामुळे यामधील कोणतीही वस्तू आपण दिव्याखाली नक्की ठेवायचे आहे.
कारण आपण दिव्याला प्रत्यक्ष भगवंता सारखं मानतो. परमेश्वराला आपण दिव्यामध्ये पाहत असतो, त्यामुळे त्या आधी एक गोष्ट नक्की ठेवायला पाहिजे. मित्रांनो आपण दिवा लावताना आपल्याला जे तेल वापरायचा आहे.
जर मोहरीचे तेलाचा वापर करायचा आहे व जर तुमच्याकडे मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही तुपाचा सुद्धा दिवा लावू शकता आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा दिवा लावल्यानंतर दिव्यामध्ये दोन लवंगा नक्की टाका.
कारण शास्त्रांमध्ये लवंग दिव्यामध्ये टाकल्याने खूपच चमत्कारिक फायदे होतात त्यामुळे आपली शत्रुपीडा नष्ट होते. तसेच लवंग टाकल्यानंतर आपण दिव्याची पूजा करायची आहे आणि देवी देवतांची पूजा करायची आहे.
याचबरोबर, श्री स्वामींची आणि भगवंताची हळदी-कुंकू लावून अक्षता वाहून पूजा करायची आहे. लक्षात ठेवा हा उपाय आपण शत्रुपीडा नष्ट होण्यासाठी करत आहोत. शत्रूपासून आपली मुक्त होण्यासाठी करत आहोत
आणि हा दिवा लावल्यानंतर आपल्याला त्या दिव्यासमोर, देवांसमोर, स्वामींसमोर भगवंता हा एक छोटासा मंत्र म्हणायचा आहे. असा आहे की,
शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा | शत्रुबुद्धि-विनाशाय दीपज्योती नमोस्तुते !! हा मंत्र म्हटल्यानंतर आपण भगवंत स्वामींना देवी-देवतांना नमस्कार करायचा आहे आणि एक गोष्ट सांगायची आहे की,
माझी शत्रूपासून मुक्तता होऊ दे आणि शत्रूंच्या त्रासातून मला मुक्त कर. त्यांच्या जाचातून मला मुक्त कर व माझ्या घरावर सदैव तुमची कृपादृष्टी राहू दे व आमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी, समाधान, आरोग्य सर्वकाही नांदूदे..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments