नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, यंदा उत्पत्ती एकादशीच्या दिवशी पाच शुभ योग तयार होत असल्याने या व्रताचे महत्त्व अधिकच वाढले आहे. उत्पत्ती एकादशीचे व्रत दरवर्षी कार्तिक कृष्ण पक्ष एकादशीला केले जाते.
या दिवशी भगवान विष्णू आणि एकादशी मातेची पूजा केली जाते. पौराणिक कथेनुसार, एकादशी माता उत्पत्ती एकादशीच्या तिथीला अवतरली होती, म्हणून या एकादशीला उत्पत्ती एकादशी व्रत म्हणतात.
कार्तिक कृष्ण पक्ष एकादशी 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 10:29 वाजता सुरू होते आणि 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 10:41 वाजता समाप्त होते. पंचांगात सूर्योदयापासून सूर्योदयापर्यंत तिथी मोजली जाते.
अशा स्थितीत उत्पत्ती एकादशी रविवार, 20 नोव्हेंबर रोजी आहे. 20 नोव्हेंबर रोजी उत्पत्ती एकादशीच्या दिवशी पाच शुभ योग तयार होत आहेत, ज्यात प्रीती योग, आयुष्मान योग, द्विपुष्कर योग, अमृत सिद्धी योग आणि सर्वार्थ सिद्धी योग यांचा समावेश आहे.
या एकादशीचा दिवशी आपण सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून, स्वच्छ वस्त्र परिधान करून, त्यानंतर नित्यनियमाप्रमाणे आपली देवपूजा करावी.तसेच भगवान श्रीहरी विष्णुची कोणत्याही रुपाची पूजा करावी.
तसेच ते शक्य नसल्यास बाळकृष्ण किंवा भगवान श्रीकृष्ण तसेच तिरुपती बालाजी याशिवाय अगदी प्रभू श्रीरामांचे किंवा भगवान श्रीहरी श्रीविष्णूच्या कोणत्याही एका रूपाची पूजा य दिवशी केल्यास आपल्याला पुण्य प्राप्त होते.
ही पूजा करत असताना सर्वात आधी एका तामनात विठ्ठलाची किंवा कोणत्याही रूपाची मूर्ती घेऊन, त्या मूर्तीला पाण्याने अभिषेक करावा.याशिवाय पंचामृत किंवा दुधाने आपण अभिषेक घालू शकतो.तसेच अभिषेक घालताना,
त्यामध्ये तुळशीची दोन-तीन पाने आपण टाकावीत.तसेच एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने कधीच तोडू नये. त्यामुळे ही माता तुळशीची पाने एक दिवस आधीच ही तोडून ठेवावी .
आणि जर तेही करणे शक्य नसेल किंवा नसतील पण त्या तुळशी च्या झाडाखाली सुकलेले पान पडली असतील, तरसुद्धा ती पाने चालतात,मात्र एकादशी तिथे चुकूनही तुळशीची पानं तोडू नका.
त्यानंतर आपण अभिषेक करताना असताना “विष्णवे नमः” तसेच “ओम नमो नारायणा”, “ओम नमो भगवते वासुदेवाय” यापैकी कोणत्याही मंत्राचा जप करावा.अशा देवाचा अभिषेक झाल्यानंतर आपण देवाची स्थापना आपल्या देवघरामध्ये त्या देवांची स्थापना देवघरात किंवा स्वतंत्र पाटावरती करून ,त्याना गंध किंवा काळा बुक्का लावावा.
याशिवाय चंदन अर्पण करून , हळदी कुंकू लावावं आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, दोन तुळशीची पानं पालते घालून ,श्रीहरी विष्णूना नैवेद्य दाखवावा. कारण भगवान श्रीहरी विष्णू तुळशी विवाह तुळशी पत्राशिवाय नैवेद्य पूर्ण होत नाही.त्यामुळेच तुळस ही विष्णुप्रिया म्हणून ओळखली जाते.
या पूजेमध्ये “ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय” या मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप करावा. तसेच हरिपाठ केला तरीही चालेल किंवा भगवान विष्णूच्या 1000 नावांचा समावेश असलेल्या “विष्णुसहस्त्रनाम” याचे वाचन करावे.
याशिवाय पूर्ण पुजा होईलपर्यत “ओम नमो नारायणा”,”ओम नमो नारायणा”, तसेच “राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी” अशा प्रकारच्या मंत्रांचा जप करावा.
त्यामुळेच आपली सर्व इच्छा ,मनोकामना भगवान विष्णूं पूर्ण करतील.तसेच या दिवशी दिवसभर “राम कृष्ण हरी”या पमंत्राचा जप करावा.त्यामुळे आत्मबळ वाढेल तसेच आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. पैशांच्या समस्या किंवा कोणत्याही समस्यापासून मुक्ती मिळेल.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments