उद्या सर्वपीत्री अमावस्या ठीक दुपारी 12 ते 3 च्या दरम्यान करा हा अचूक उपाय बघा काय घडते..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,  उद्या सर्वपीत्री अमावस्या ठीक दुपारी 12 ते 3 च्या दरम्यान करा हा अचूक उपाय बघा काय घडते..

पूर्वजांचे आभार मानण्याचा काळ म्हणजेच पितृपंधरवडा किंवा पितृपक्ष त्याचा समाप्तीचा दिवस असतो. सर्वपित्री अमावस्या भाद्रपद कृष्णपक्ष हा अनंतचतुर्दशी नंतर पंधरवडा पितृपक्ष म्हणून ओळखला जातो.

महालय असे सुद्धा म्हटल्या जातं, महालय शब्दाचा अपभ्रंश महाड असा झाला आहे. त्यामुळे या पंधरा दिवसात पितरांच्या तिथीनुसार श्राद्ध विधी केला जातो, परंतु आपल्या पिढीला आजोबा

आणि पणजोबा यांच्या आधी ते पूर्वज नावानिशी माहीत नसतात, तर त्यांची तिथे तरी कुठून माहित असणार.

त्यामुळे यावर तोडगा म्हणून ज्या पितरांची तिथी माहीत नसते, अशा सर्व पितरांचे श्राद्ध सर्वपित्री अमावस्येला केले जाते. आपण स्वतःला स्वयंभू समजत तरी, तो आपला भ्रम आहे. कारण आपल्या जडणघडणीत अनेक लोकांचा हात असतो.

कारण साधा प्रवास करत असताना सुद्धा आपल्याकडे जरी महागडी गाडी असली,तरी या प्रवासाचा रस्ता खाचखळग्यांनी भरलेला असेल तर प्रवासाचा आनंद घेता येणार नाही.

पण तेच जर एखादा रस्ता गुळगुळीत आणि चांगला असेल तर प्रवासाचा आनंद नक्कीच द्विगुणित होतो.

त्याचप्रमाणे आपल्या त्याची गाडी भरधाव वेगाने जावी, यासाठी आपल्या पूर्वजांनी तो मार्ग सुकर करून ठेवला आहे. त्यामुळे या प्रवासात त्यांची आठवण ठेवून, त्यांचे आभार मानायला हवेत.

म्हणून तर आपण अनेक वाहनांच्या मागे आई वडिलांची पुण्याई, दादाचा आशीर्वाद ,आजीची माया असे संदेश लिहिलेले पाहतो. पूर्वजांची स्मृती जागृत त्यांना आदरांजली वाहण्यासाठी धर्मशास्त्राने पितृपंधरवडाचा काळ निश्चित केला आहे.

हा काळ विधि आपल्या शास्त्रांमध्ये सांगितले आहेत, त्यातील प्रत्येक विधीला जास्त महत्त्व आहे ,विशिष्ट अर्थ आहे. गुरुजींना बोलावून मंत्र उच्चारांसह हे श्राद्ध कर्म केलं जातं. परंतु इतर काही कारणांमुळे अशा प्रकारे श्राद्ध करणे जमत नसेल,

तर विधी राहून जाईल याबद्दल वाईट वाटून न घेता विधी करणे शक्य नसले ,तरी सुद्धा साधा सात्त्विक स्वयंपाक करून कावळ्याला कुत्र्याला आणि गाईला तो श्रद्धेने खायला घालावा. तसेच पूर्वजांची स्मृती ठेवूनी यथाशक्ती अन्नदान तसेच वस्त्रदान सुद्धा करावे

किंवा आपापल्या ऐपतीप्रमाणे कोणत्याही स्वरूपात दान करावे, तरी देखील श्राद्धविधीचे फलप्राप्ती होण्यास मदत होते.

गरजवंताला मदतीचा हात देऊन पूर्वजांनी केलेल्या संस्कारांची जाणीव ठेवणं,हा हे कार्य करण्याचे गर्भितार्थ आहे.मात्र जर आपल्या मनात पूर्ण विश्वास आणि श्रद्धा असेल, तरच श्रद्धे होय.

सर्वपित्री अमावस्येला त्या समस्त आत्म्याचे मनापासून आभार मानावे आणि त्यांचे आशीर्वाद मागावेत. एखाद्या गोष्टी बद्दल क्षमा मागत असल्यास, ती सुद्धा मागावी कीव एखाद्या गोष्टीची कबुली द्यायची असल्यास,

ती सुद्धा द्यावी,कारण आपले पूर्वज मोठ्या अंतकरणाने आपल्याला क्षमा करतात आणि आशीर्वाद देतात, अशी श्रद्धा आहे.

कारण त्या पूर्वजांच्या आशीर्वादामुळेच आपल्या आयुष्यातली नकारात्मकता संपून जाते आणि आपल्या आयुष्यात सकारात्मक आणि आशावादी येतो. पूर्वज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्याला ही जगण्याची नवी प्रेरणा मिळते

त्यांच्याकडून कळत-नकळत घडलेल्या चुका टाळता येतात आणि आपला प्रवास आनंददायी होतो, असं अनेक धर्मग्रंथांमध्ये किंवा धर्मशास्त्रामध्ये नमूद केले गेले.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!