फक्त 1 स्वामी सेवा,10 मिनिटां मध्ये आनंदाच्या बातमीचा कॉल येईल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,  फक्त 1 स्वामी सेवा,10 मिनिटां मध्ये आनंदाच्या बातमीचा कॉल येईल…

ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थां महाराजांची सेवेकरांची श्री स्वामींवर अपार श्रद्धा आहे.कारण पूर्ण अंतकरणाने आणि निस्वार्थीपणे श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा केल्यास,

आपल्यातील नकारात्मकता दूर होण्यास सुरुवात होते.असाच काहीसा अनुभव परभणीत एका स्वामी सेवाकऱ्याला आला होता.

परभणी येथे राहणारे आदिनाथ मोरे या स्वामी सेवेकरीना आणि त्यांच्या वडिलांना आलेला स्वामींचा अनुभव सांगत होते. त्या स्वामी सेवेकऱ्यांनी सांगितले की,

माझे वडील स्वामी महाराजांची सेवा करतात, त्यांचे नाव भगवान मोरे.आम्ही सध्या परभणी राहतो आणि पेंटींग हा त्यांचा व्यवसाय आहे.हा प्रसंग मी जेव्हा लहान होतो, तेव्हाचा आहे.

वडिलांचा पेंटिंगचा व्यवसायात जेव्हा मंदी आलेली होती, त्या वेळी त्यांना समजत नव्हते कि,पुढे काय करावं आणि पैसे कुठून आणावे.

त्यांनी मला व माझ्या आईला मामाच्या घरी पाठवण्याचा निर्णय घेतला. ते दिवसभर पेंटींगच्या दुकानांमध्ये बसायचे, पण ग्राहक येत नव्हते. काही काळाने वडिलांना खूप टेन्शन आलं,

त्यांना वाटलं मी बायको आणि मुलांना सांभाळा काहीच करू शकत नाही. ते खूप नाराज झाले, जीवनाला कंटाळले होते मग शेवटी त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला, पण त्याआधी स्वामींचे नाव घ्यावे, अशी भावना त्यांच्या मनात आली.

मग त्यांनी डोळे मिटून स्वामींचे नाव घेतले, तर त्यांच्या डोळ्यासमोर साक्षात स्वामी होते. त्यावेळी स्वामी त्यांना म्हणाले की, मला काळजी आहे तुझी, मी बघेल काय करायचे, असे बोलून स्वामी अदृश्य झाले मग वडिलांनी डोळे उघडले.

कारण साक्षात स्वामींनी त्यांना दर्शन दिले होते,त्यामुळे वडिलांनी आत्महत्येचा विचार सोडला.

मग थोड्या दिवसानंतर माझ्या वडिलांना कॉलेजमध्ये एक शिक्षकांची नोकरी लागली. आता आमच्याकडे स्वतःघर आहे आणि गाडी सुटते आहे.त्या वेळी श्री स्वामी समर्थ महाराजानी मार्ग दाखवला आणि त्या मार्गावर चालण्याचे बळही त्यांनी दिले.मग काही काळात स्वामींच्या कृपेने आता सर्व सुरळीत सुरू आहे.

त्यामुळे स्वामी समर्थ महाराज हे अशा अनेक घटना, प्रसंगांतून समाजाला विविध बोध, शिकवण, उपदेश करत असत. स्वामींच्या लीला या अद्भूत आणि अचंबित करणाऱ्या आहेत. ज्या व्यक्तींना स्वामींचा अनुभव आला आहे, प्रचिती आली आहे; त्या व्यक्तींना याचा प्रत्यय अनुभवास येतो.

अक्कलकोट येथे स्वामी सुमारे बावीस वर्षे होते. या काळात त्यांनी हजारो आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू आणि मुमुक्षू यांच्या मनोकामना पूर्ण केल्या. अशा प्रकारे विस्कटलेली घडी पूर्ववत बसविण्यासाठी,

निष्ठावान भक्तांना आत्मानंदाची प्राप्ती करून देण्यासाठी आणि जगात सद्‌धर्म, सुसंस्कृती अन्‌ भक्तिप्रेमाची गुढी उभारण्यासाठी अनंत लीला केल्या, असे म्हटले जाते…

” श्री स्वामी समर्थ,जय जय स्वामी समर्थ”

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!