नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, गुरुचरित्र आणि गुरुलीलामृत हे दोन्ही ग्रंथ दत्तसंप्रदायात पूर्वार्ध आणि उत्तरार्ध म्हणून गणले जातात. त्यांचे पारायणही उपासना म्हणून केले जाते. पारायणाचे वेळी सप्ताहाचे बंधन असण्याने अर्थ-चिंतन करायला अवसर नसतो.
म्हणून उपासनेचाच एक भाग या दृष्टिकोनातून ग्रंथाचा अभ्यासही करायला हवा. श्रीपादश्रीवल्लभ, श्रीनृसिंहसरस्वती, श्रीस्वामी समर्थ या दत्तावतारी-सत्पुरुषांनी भक्तांवर कृपादृष्टी टाकून त्यांच्या पाठीमागे कृपाशक्तीही उभी केली.
तिला चमत्कार असे म्हटले गेले आहे. पण हे चमत्कार श्रद्धेच्या वाढीसाठी असून त्यायोगे भक्तांची मनोकामना पूर्ण होते
आपल्यातील अनेक लोक गरिबी दुर करण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेत असतात आणि त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती समृद्धी यावी म्हणून तसेच घरामध्ये पैसा यावा म्हणून आणि घरामध्ये वादविवाद होऊ नये म्हणून श्री स्वामी समर्थांची विशेष पूजा अर्चना आणि त्याचे नाव जप करत असतात.
अनेक वेगवेगळे उपाय करत असतात. परंतु काही लोकांच्या समस्या कधी संपतच नाही, कारण या लोकांना त्यांचे नशिबाची साथ कधी मिळतच नसते.
परंतु आपण स्वामी समर्थांची अशी एक विशेष सेवा पाहणार आहोत ज्यामुळे आपले नशीब देखील आपल्याला साथ द्यायला सुरुवात करेल आणि आपल्या जीवनातील सगळ्या अडचणी दूर होतील.
तर ही स्वामी समर्थांची अनेक सेवेकरी श्री स्वामी समर्थ यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि त्यांची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून मी रोज सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून आपल्या देवघरामध्ये जाऊन देवाची पूजा करून झाल्यानंतर स्वामी समर्थांची विशेष पूजा करत असतात.
सकाळी लवकर उठावे गोमुत्र टाकून स्नान करावे. सुर्यांस अर्ध द्यावे तुळशीस पाणी घालावे नैमित्तिक देवपुजा करावी. मोठ्या मंडळीनां नमस्कार करावा. नियोजीत जागेवर चौरंग ठेवावा त्यावर लाल वस्त्र टाकावे.
त्यावर श्री नावानाथांचा फोटो ठेवावा समोर तांदुळ याची रास मांडावी त्याराशित एक नाणे ठेवावे त्यावर रिकामा ताब्या ठेवावा ताब्यात पाणी घालावे व पाण्यात हळद, कुंकुं, अक्षदा,
एक नाणे, एक सुपारी टाकावी 5 विड्याची ची पाने लावावी. त्यावर श्रीफळ ठेवावे. तांब्यास अष्टगंधाची 5 बोटे ओढावीत स्वस्तिक, त्रिशूल काढावे श्रीफळावर ओम काढावा. कलशाच्या उजव्या बाजुस विड्याची 2 पाने एक मेकावर ठेवावी.
त्यावर तांदुळाचीची रास मांडावी राशीत एक नाणे ठेवावे एक सुपारी पंचामृत, गुलाब पाणी शुध्दपाण्याने धुऊन पुसुन त्यावर ठेवावी.
(गणपतीचे नामस्मरण 11 वेळ करुन) हलद कुंकुं अक्षदा अत्तर गंध फुले वाहावी. मागे एका सरळ रेषेत तांदळाच्या 3 राशी माडाव्या अशा ३ ओळी माडाव्या समोर एक राश माडावी प्रत्येक राशीत एक एक नाणे ठेवावे.
एक एक सुपारी घेऊन पंचामृत गुलाब पाणी व शुध्द पाण्याने स्वछं धुऊन पुसुन घ्यावे प्रत्येक राशीवर थोडे भस्म टाकावे व एक एक सुपारी राशीवर ठेवत जावी सर्व सुपारी ठेऊन झाल्यावर अत्तर लावावे.
प्रत्येक सुपारीस गंधफुल वाहावे एक एक सुपारीस स्पर्श करुन गायत्री मंत्राचा 11 वेळ जप करावा फुले वाहावी व परत समोरील सुपारीस फुले तुळस पत्रे किंवा बेलपाने वाहत 11 वेळ……
“ओम चैतन्य दत्तात्रयाय नम:” जप करावा व प्रत्येक सुपारीस अशीच पुजा करावी नवनाथांच्या नावाचा जप करा फुले तुळस, बेलपाने वाहावी.
ओम चैतन्य मच्छिंद्रनाथाय नम:।। ओम चैतन्य गोरक्षनाथाय नम:।। ओम चैतन्य गहिनीनाथाय नम:।। ओम चैतन्य जालिंदरनाथाय नम:।। ओम चैतन्य कानिफनाथाय नमः।। ओम चैतन्य भर्तरीनाथाय नम:।। ओम चैतन्य रेवननाथाय नम:।।ओम चैतन्य वटसिध्द नागनाथाय नम: ओम चैतन्य चर्पटीनाथाय नम:।।
अशा प्रकारे मंत्र म्हणत फुले अक्षदा तुळस, बेलपाने वाहावी. अशी 21 आर्वतने करावी, गुरुनीं दिलेल्या मंत्राचा एक माळ जप करावा. या चौरंगा समोर दुसरा चौरंग माडावा त्यावर लाल वस्त्र टाकावे श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथ ठेवावा ग्रंथाचे पुजन करावे फुले वहावी चौरंगा भोवती रांगोळी काढावी.
उजव्या बाजुस समई ठेऊन पेटवावी समई कायम तेवत ठेवावी ऊद जाळ।वा अगरबत्ती धुप पेटवावा नमस्कार करावा. महाराजांच्या फोटोला हार घालावा.
हातात पाणी घेऊन 3 , 5 , 7 , 9 , 41दिवसांचा संकल्प करावा हातातील पाणी जमीनीवर सोडावे. कापुर पेटवून श्री दत्त महाराजांची आरती करावी.
“दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा” हा जप करावा व हळुवार पणे ‘श्री नवनाथ भक्तिसार’ ग्रंथ वाचण्यास प्रारंभ करावा. अगदी शांततेने व एकाग्रतेने वाचन करावे वाचन झाल्यावर निरंजन लावून श्री नवनाथ महाराजांची आरती करावी. सर्वांना प्रसाद द्यावा.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments