नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, गुरूपौर्णिमा’ हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला गुरूपौर्णिमा साजरी केली जाते. भारतीय संस्कृतीत गुरूला देवाप्रमाणे मानले जाते. म्हणूनच गुरूपौर्णिमेला गुरूपूजनदेखील केले जाते.
भारतात अनेक शाळा, कॉलेज आणि संप्रदायांमध्ये गुरूपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जाते.हा सण गुरू आणि शिष्य यांच्यातील नाते अधिक घट्ट बांधून ठेवण्याचे काम करत असतो.
त्यामुळे गुरुपौर्णिमा हा दिवस गुरुचे पूजन करून, त्याचे गुरुपद घेतले जाते.परंतु गुरुप्राप्ती होणे सोपे नसल्याने, आपल्याला गुरुप्राप्ती झाल्यास ,गुरुपादुका मंत्र घेण्याचा प्रयत्न करावा.याशिवाय आपण गुरुपौर्णिमे दिवशी आपल्या गुरुपादुकाचे पूजन करावे
आणि त्याना नैवेद्य , कपडे भेट करून त्याच्या पुढे दक्षिणा ठेऊन,त्याची आरती करावी व त्यांच्या चरणी बसून त्यांची कृपा मिळवावी.
तसेच काही कारणामुळे ,आपल्याला गुरुजवळ जाण्याची संधी मिळत नसल्यास, पूर्ण श्रद्धेने त्यांच्या चित्र पादुका प्राप्त करून,त्याचे पूजन करावे.कारण असे म्हणतात की, गुरुमंत्र जपल्याने पुण्यप्राप्ती होते. गुरुपूजन यासाठी विचार मंत्र श्रेष्ठ आहे.यामधील
पहिला मंत्र:- ॐ गुरुभ्यो नम:। दुसरा मंत्र:- ॐ वेदाहि गुरु देवाय विद्महे परम गुरुवे धीमहि तन्नौ: गुरु: प्रचोदयात्। तिसरा मंत्र :-ॐ गुं गुरुभ्यो नम:। चौथा मंत्र:- ॐ परमतत्वाय नारायणाय गुरुभ्यो नम:।
या मंत्राचा जप गुरुपौर्णिमेच्या दिवशी नियमित करावा.याशिवाय हिंदु शास्त्रानुसार, आषाढातील शुक्र पक्ष पौर्णिमेला गुरुपौर्णिमा, असे म्हणतात.या दिवशी गुरूंची पूजा केली जाते,तसेच संपूर्ण देशात हा सण मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला जातो.प्राचीन काळात विद्यार्थी व श्रमात शिक्षण घेत असताना भावपूर्ण श्रद्धेने गुरूपूजा करून गुरूदक्षिणा घेत असत.
तसेच चारही वेदांवर पहिल्यांदा भाष्य करणाऱ्या व्यास ऋषिंची आजच्या दिवशी पूजा केली जाते, व्यासांनीच लोकांना वेदाचे ज्ञान दिले ,हे आपले आद्यगुरु असल्याने, गुरुपौर्णिमा व्यासपौर्णिमा ,असेही म्हटले जाते.त्यामुळे आपण या दिवशी आपल्या गुरूंना व्यासांचा अंश मानून ,त्यांची पूर्ण श्रद्धेने पूजा करावी.
याशिवाय या पवित्र दिवशी, गुरुपौर्णिमेचे व्रत करावे.यासाठी सकाळी स्नान करून,देवपूजा आटपून घ्या आणि एखाद्या पवित्र ठिकाणी बसून अभ्यास करावा,तसेच सफेद वस्त्र जमिनीवर अंथरून, पूर्व उत्तर किंवा दक्षिण उत्तर गंधाने बारावीचा ओढून व्यासपीठ तयार करावे.
यानंतर दाही दिशांना अक्षता टाकून, ब्रह्मा, व्यास, सुख ,गोविंदस्वामी आणि शंकराचार्याच्या नावाने मंत्र पूजा करावी आणि त्यानंतर आपले गुरू किंवा त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून, त्यांना दक्षिणा ठेवावा.याशिवाय
गुरुपौर्णिमेच्या दिवशी फक्त गुरुच नव्हे तर आपले आई-वडील तसेच मोठ्या भाऊ-बहिणींची पूजा करण्याची प्रथा आहे.
याशिवाय या दिवशी वस्त्र, फळ ,फुले व हार अर्पण करून गुरूंचा आशीर्वाद मिळवण्याचा पर्यंत केला पाहिजे,कारण गुरूच्या आशीर्वाद हा,विद्यार्थ्यांसाठी कल्याणकारी आणि ज्ञानवर्धन असतो.तसेच व्यासांनी रचलेल्या ग्रंथांचे वाचन करून,त्याच्या उपदेशाचे आपल्या जीवनात आचरण केले पाहिजे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments