नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, स्वामी तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात सुखात आणि हसत खेळत ठेऊ देत हीच स्वामी चरणी मनापासून प्रार्थना. श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन करून, रुपाली ताईंना आलेला श्री स्वामी समर्थ महाराजांचा अनुभव त्यांच्या शब्दात सांगत आहोत.
मी रूपाली, माझा विवाह 18 मे 2011 रोजी झाला , मी दोन वर्षांनी गर्भवती राहून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दुसऱ्या महिन्यात सोनोग्राफी केली व चौथ्या महिन्यात सोनोग्राफी मध्ये काही अडचणी दिसल्यामुळे डॉक्टरांनी अल्ट्रा क्रिटिकल सोनोग्राफी केली.
त्यात असे आढळले की बाळाच्या मेंदू मध्ये पाणी झाले आहे व ते मणक्यात असलेल्या गॅपमध्ये पाठीवर कमरेवर असलेल्या पिशवीत साचत आहे. सध्या जरी पिशवी लहान असली तरी नवव्या महिन्यापर्यंत मोठी होऊ शकते. त्यात काही मज्जातंतू आहे. सध्याच्या परिस्थितीत त्यावर काही उपाय करता येणार नाही.
बाळ जर वाचले तर जन्म झाल्यानंतर ऑपरेशन जरी केले तरी अपंग, हातपाय हलवू न शकणारे असे बाळ जन्माला येऊ शकते. डोक्याचा आकार हे निश्चित सांगू शकत नाही. आयुष्यभर बाळाला तुम्हाला तसेच सांभाळावे लागेल.
दहा ते बारा डॉक्टरांनी आम्हाला हा सल्ला दिला आणि नेहमीच नकारार्थी उत्तरे दिली. अर्थात गर्भपात करण्याचा सल्ला ते लोक आम्हाला देत होते परंतु सोनोग्राफी मध्ये पाहिलेले हात पाय हलवणारे बाळ आपण का मारायचे?
त्याचा काय गुन्हा? कोणता कारण स्वामी महाराजांच्या दरबारातले आपण सेवेकरी आहोत. चांगला वाईट भेदभाव कधीच केला नाही सगळे सारखेच. प्रेम ही आपली शिकवण. माझ्या बाळामध्ये व्यंग आहे म्हणून मी त्याचा जीव घ्यावा.
केवळ मला भावी जीवनात सुख मिळावे या आशेने हे मला करणे योग्य वाटत नव्हतं. कारण गुरुमाऊलींनी दिले तेच मी आत्मसात केलं आणि भ्रूणहत्या एक प्रकारची हिंसा आहे यामुळे पितृ दोष निर्माण होतो.
सेवेकरी म्हणून महाराजांच्या दरबारात कोणत्या तोंडाने उभे राहावे? खरंच मी आई होऊ शकते का? अशा प्रकारचे शंभर प्रश्न डोक्यात उभे राहिले होते.
महाराजांवर पूर्णता विश्वास ठेवून या बाळाला जन्म देण्याचा मी निर्धार केला त्याप्रमाणे मी माहेरी गेले. दरम्यान माझ्या पतीने एका सेवेकऱ्यांना आमची व्यथा सांगितली. तेव्हा सेवेकर्याने आम्हाला दिंडोरी ला परमपूज्य गुरुमाऊली कडे आधी जाऊन या आणि नंतर दवाखान्यात नाव नोंदणी करा.
असे चंद्रकांत दादांचे मत कळवले. दरम्यान आम्ही परत दवाखान्यात गेलो असता तेथील डॉक्टर आम्हाला म्हणाले एवढे चांगले बाळ तुम्हाला का मारायचे आहे? देवावर विश्वास ठेवा आणि या बाळाला जन्म द्या, मी पूर्ण जबाबदारी घेतो,
फक्त बाळाच्या जन्मानंतर बाळाच्या पाठीच्या गाठीचे ऑपरेशन करावे लागतील व त्यासाठी मुंबई ला जावे लागेल. आम्हाला ऐकून अतिशय आनंद झाला होता. कुठेतरी आशा पल्लवीत झाल्या होत्या. डॉक्टरांनी आमच्या हिमतिचे कौतुक केले.
त्यानंतर प्रश्न उत्तर विभागात आम्ही आमची समस्या मांडली. तेथील सेवेकर्यांनी आम्हाला थेट परमपूज्य गुरुमाऊली कडे नेले.
परम पुज्य गुरुमाऊलींनी माझ्या अवस्थेला न पाहता सांगितले की हे त्यांच्या अर्थातच स्वामी महाराजांच्या हातात असते. डॉक्टरांच्या मते हल्लीच्या डॉक्टर लोकांना
घाबरवन्या पलीकडे काहीच जमत नाही. तुम्ही घाबरू नका, असे काहीच होणार नाही परम पुज्य गुरुमाऊलींनी हा आशीर्वाद दिला व तेथील सेवेकऱ्यांना आणखीन काही विशेष सेवा आम्हाला देण्यात याव्यात असे सुचवले.
मी व माझ्या पतींनी पूर्ण नऊ महिन्या पर्यंत या सेवा केलेल्या. अखेर माझ्या बाळाच्या जन्माचा दिवस उजाडला. मी डॉक्टरांकडे ऍडमिट झालेली. डॉक्टरी सल्ल्यानुसार नॉर्मल डिलिव्हरी झाल्यास गाठ फुटून बाळाची फक्त तीस टक्के वाचण्याची शक्यता होती व ती शक्यता सिझेरियन केल्यास 70 टक्के होती.
त्यामुळे अर्थातच सिझेरियन करायचे ठरवले. दुस-या दिवशी सकाळी साडेसात वाजता मला कन्यारत्न प्राप्त झाले. त्याच दिवशी सायंकाळी तिला मुंबईला ऑपरेशन साठी नेण्यात आले. आम्ही रत्नागिरी वरून मुंबईला रात्री तीन वाजता पोहोचलो.
बाळाची सोनोग्राफी आणि एक्स-रे झाले. थंडीचे दिवस असल्याने बाळाला खूप त्रास होत होता. एक दिवसाच्या बाळाचे ऑपरेशन करायचे म्हटले तर भूल उतरली नाही तर काय होणार नाही, याही परिस्थितीत बाळ वाचण्याची शक्यता केवळ 11 टक्के आहे असे डॉक्टरांनी सांगितले.
त्यामुळे परत गावी जाऊन नऊ दिवसांनी परत या. तेथील डॉक्टर आम्हाला म्हणाली. नवव्या दिवशी बाळाच्या कमरेवर ची गाठ सफरचंदाच्या आकाराचे एवढी झाली होती. पाणी पाझरू लागले होते.
मग पुन्हा आम्ही मुंबईला आलो. बाळाला 24 तास आयसीयूमध्ये ठेवण्यात आले. बाळाबरोबर फक्त मीच होते. तेथे कोणालाही प्रवेश नव्हता. कारण बाळ थोडं फार ओले तरी राहिले तरी जंतुसंसर्ग होऊन थेट मेंदूपर्यंत पोहोचून बाळ दगावू शकते ही शक्यता डॉक्टरांनी वर्तवली होती.
ऑपरेशनची तारीख निश्चित झाली. डॉक्टरांनी काही गोष्टी आधीच सांगितल्या होत्या. त्यातील मज्जातंतू ऑपरेशन दरम्यान इजा होऊन तुटू शकतात त्यामुळे हात पाय हालचाल राहीलच असे नाही. ऑपरेशन झाल्यानंतर मेंदूत पाणी असल्यास ते देखील डोक्याचा ऑपरेशन करून काढावे लागेल.
परंतु आम्हाला या सर्व गोष्टींचे काहीच वाटले नाही. कारण आमच्या पाठीशी स्वामी होते. डॉक्टरांच्या प्रत्येक गोष्टीला आम्ही हो म्हणत गेलो आणि फायनली 100% ऑपरेशन यशस्वी झाले व त्या सर्व डॉक्टरांनी ज्या शक्यता वर्तवल्या होत्या त्या सगळ्या खोट्या ठरल्या होत्या.
केवळ परमपूज्य गुरुमाऊली यांच्या आशीर्वादाने हे शक्य झाले होते. स्वामी भक्तांनो माझ्या आयुष्यातील ही आनंदाची गोष्ट मला सांगायला मला खूप आनंद होत आहे की आज माझी मुलगी दीड वर्षाची झाली असून इतर मुलांपेक्षा दहा पावले पुढेच आहे.
मनापासून सेवा केली की स्वामी ही त्यांच्या भक्तांचा केसालाही धक्का लागू देत नाहीत. हे त्रिवार सत्य आहे. सर्वांनी स्वामी महाराजांची सेवा मनोभावे करावी. खरंच आपल्या पाठीशी नेहमी उभे असतात. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments