17 जुलै 2023 सोमवती दीप आषाढ अमावस्या, दीप अमावस्या इथ लाव दिवा बोला मंत्र, सकाळी इच्छा पूर्ण चमत्कार..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, 17 जुलै 2023 सोमवती दीप आषाढ अमावस्या, दीप अमावस्या इथ लाव दिवा बोला मंत्र, सकाळी इच्छा पूर्ण चमत्कार..

हिंदू धर्मात ,नित्यनेमाने दररोज सकाळ-संध्याकाळी देवघरात तसेच माता तुळशी समोर दिवा लावण्याची परंपरा आहे. कारण दिव्याचे देवासमोरील महत्त्व हे अनन्यसाधारण आहे.

हे दिवे आपल्या आयुष्यातील अंधकार दूर करून ते प्रकाशमान करतात.यामुळे या दिव्याप्रती कृतज्ञता म्हणून दीप अमावस्या साजरी केले जाते. या दिवशी दिवे लावले जातात.

हा उत्सव, हिंदु धर्मात आषाढ महिन्यात येणारी अमावस्या म्हणजे आषाढी अमावस्या दिवशी केला जातो.तसेच याला दीप अमावस्या असेही म्हणतात. या दिवशी दिवा लावण्याची परंपरा आहे.

कारण दिवा आपल्याला सातत्याने कुठल्या ना कुठल्या रुपात प्रकाश देत असतो. या दिव्यांच्या प्रकाशानी संपूर्ण परिसर उजळून निघतो.या दिवशी घरातील सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ केले जातात. या दिव्यांची पुजा केली जाते.

तसेच आपल्या घरातील लहान मुलगा जो कुलदीपक आहे अथवा मुलगीला घराची पणती मानली जाते, त्यांनाही ओवाळले जाते. याशिवाय घरातील महिला या दिवशी कणीक आणि गुळाचे नवे दिवे करीत असतात.

दीप अमावस्याला आपण जर देवघरात दिवा लावून, हात जोडून हा मंत्र बोलल्यास, आपल्या घरात लक्ष्मीचा वास होईल, लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल तसेच लक्ष्मीची कृपाहोवून,लक्ष्मी तुमच्या घरात नांदेल.

या आषाढी अमावस्याच्या दिवशी आपल्या घरातील महिलानी पूर्ण श्रद्धेने घरातली सर्व जुने-नवीन दिवे धुऊन स्वच्छ करून त्यांना एका पाटावर ठेवून, त्यांना प्रज्वलित करावे.

मग त्याची आरती करून,त्याना नैवेद्द दाखवावा.परंतु त्यासोबतच आपल्याला एक शास्त्रीय उपाय करायचा आहे. हा उपाय आपण जेव्हा दिवे लावतो, त्या वेळेस हा एक प्रभावी मंत्राचा जप करून करावा.

दिवा लावताना, दिवा लावून झाल्यानंतर हा मंत्र फक्त एक वेळेस बोलायचे आहे.तसेच आपल्या घरातील महिला किंवा पुरुष कोणीही या मंत्र जप करू शकतो.

दिवे स्वच्छ करून,त्यांचे पूजन झाल्यावर तेव्हा हा मंत्र बोलायचा आहे,हा मंत्र काही की-

” शुभं करोति कल्याणम् आरोग्यम् धनसंपदा।, शत्रुबुद्धिविनाशाय दीपकाय नमोऽस्तु ते।।”

अशा अत्यंत सुंदर मंत्राचा जप करावा. तर दीप अमावस्याच्या दिवशी तुम्ही या मंत्र नक्की बोला,म्हणजे तुमची पूजा पूर्ण होईल. या दिवशी नैवेद्द आणि आरती करून,या शुभ मंत्राचा फक्त एकदा जप करा.

हा जप पूर्ण श्रद्धेने विश्वासाने केल्यास,तुमच्या घरावर लक्ष्मीची कृपा होऊन,घरात समृद्धी आणि बळकट येईल.

तसेच दीप अमावस्येनंतर श्रावण मासाला सुरूवात होते. हिंदू धर्मात हा पवित्र श्रावण मास व्रत वैकल्यांचा महिना मानला जातो. कारण या महिन्यात बरेच सण समारंभ साजरे केले जातात. नागपंचमी, रक्षाबंधन, गोपाळकाला, गौरी-गणपती हे सण येतात. श्रावण महिन्यानंतर सर्व सणांना सुरूवात होते.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!