नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्रावण महिन्यात कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी करा संकल्प..
आपण स्वामीची पूजा कशी करावी?, कोणता मंत्र म्हणावा? कोणती माळ जपाली पाहिजे. असा अनेक प्रकारच्या गोष्टींचे मार्गदर्शन स्वामींच्या पुस्तकात दिले आहे. आपण याचे आचरण केल्यास,
आपल्याला योग्य प्रकारे संतुलित जीवनशैली जगण्यासाठी उपयोग होईल. तसेच या ग्रंथात एक महत्त्वपूर्ण म्हणजे आदर्श जीवन आणि मृत्यू नंतर घडणाऱ्या गोष्टी विशेष सांगण्यात आले आहेत.
स्वामींच्या प्रत्येक व्यक्तीच्या दिनचर्येत काही गोष्टी समाविष्ट असणे आवश्यक आहे, असे स्वामी म्हणतात.त्यामुळे सकाळच्या वेळी दिवसाची सुरुवात या खास पाच गोष्टी पासून व्हावी असे स्वामी सांगत असतात.
स्नान हे मनुष्याच्या दिनचर्येचा महत्त्वाचा भाग मानला जातो. स्वामींच्या मते, प्रत्येकाने आपल्या दिवसाची सुरुवात स्नान करून करावे.कारण जो मनुष्य रोज सकाळी अगोदर दिवसाची सुरुवात आंघोळ करून करीत असतो. तो पवित्र होतो आणि त्याचा पूर्ण दिवस शुभ आणि ऊर्जायुक्त जातो.
प्रत्येकाला स्वतःच्या इच्छेनुसार दान केले पाहिजे.त्यामुळे अनेक धर्मग्रंथ आणि पुराणांमध्ये दानाचे महत्व सांगण्यात आले आहे. प्रत्येकाने आपल्या श्रद्धेप्रमाणे काही ना काही दान करणे आवश्यक आहे, असं केल्याने कधीच धनधान्य कमतरता येत नाही,तसेच आपल्या घरात सुख-समृद्धी सुरुवात होते.
हिंदू धर्माप्रमाणे प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरातील सुख शांती साठी दिनचर्येत हवन करण्याचा नियम बनवावा पाहिजे.दररोज हवन करणे शक्य नसेल,तर तुळशी समोर दिवा लावावा,कारण असे केल्याने मनुष्याला त्याच्या प्रत्येक कामात यश मिळते.
प्रत्येकाने आपल्या दिवसातील थोडासा वेळ मंत्र जपण्यासाठी दिला पाहिजे.त्यामध्ये तुम्ही कोणत्याही एका मंत्राचा जप करू शकता, परंतु श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता, पूर्ण श्रद्धा आणि विश्वासने केलेला जप कधीच व्यर्थ जात नाही. मनुष्याला केलेल्या जपाचे शुभ फळ अवश्य मिळते.
आपल्या देवांची पूजा करणे, हे हिंदू धर्मातील संस्कार आहे. रोज सकाळी स्नान करून देवाची पूजा करावी आणि त्यांना नैवेद्य दाखवावा, असे केल्याने कुटुंबावर आलेले संकट आपोआप दूर होते.
त्यामुळे देवाची पूजा करावी. अशा या आहेत ,त्या पाच गोष्टी याशिवाय आपल्याला शक्य असल्यास,सकाळी उठल्यावर हात जोडुन प्रातःस्मरण म्हणावे – कराग्रे वसते लक्ष्मी | करमध्ये सरस्वती || करमुल्ये तु गोविंदं | प्रभाते करदर्शनं ||
यामुळे आपल्या हाताच्या अग्रभागी लक्ष्मीचा वास असतो, मध्ये सरस्वतीचा आणि मुळाशी गोविंदाचा वास असतो. त्यामुळे सकाळी हाताचे दर्शन घ्यावे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments