नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, उन्हाळ्यात पाणी पिताना ह्या 4 चुका करू नका, नाहीतर गंभीर परिणाम होतील…
मानवी शरीराचा 70 टक्के भाग पाण्याने बनलेला आहे. यावरून पाण्याचे महत्त्व कळू शकते. आपल्या मेंदूला योग्यरित्या कार्य करण्यासाठी 80 टक्के पाण्याची आवश्यकता असते. तसेच आपल्या फुफ्फुसांना 90 टक्के, रक्त 83 टक्के, हाडे 30 टक्के आणि त्वचेला 64 टक्के पाण्याची आवश्यकता असते
पाणी म्हणजे जीवन असे म्हटले जाते. पाणी आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. म्हणूनच वैद्यकीय तज्ज्ञ दररोज पुरेसे पाणी पिण्याची शिफारस करतात. मात्र, आपल्यापैकी अनेकजण उन्हाळ्यात पाणी पिताना काही चुका वारंवार करतात.
जाणून घेऊया पाणी पिताना आपल्याकडून कोणत्या चुका होतात. पुरेसे पाणी प्यायल्याने चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते आणि केस आणि शरीराचे अवयवही निरोगी राहतात.
घाईघाईत नळाचे पाणी पिण्याची चूक करणेही महागात पडू शकते. कारण, या पाण्यात क्लोरीन आणि फ्लोराईडसारखे घातक विषारी घटक असू शकतात. ज्यामुळे आपण आजारी पडू शकतो.
त्याच वेळी, फिल्टर न केलेल्या जमिनीच्या पाण्यात आर्सेनिक असू शकते, ज्यामुळे कर्करोगही होऊ शकतो.
पाणी पिणं फायदेशीर असलं तरी जास्त वेळा पाणी पिणं योग्य नाही. काही ठराविक तासात काम पूर्ण केल्याप्रमाणे काहीजण पाणी पित असतात. वारंवार पाणी प्यायल्यामुळे रक्तातील सोडियमची पातळी असंतुलित होते, ज्यामुळे काही प्रकरणांमध्ये पोटात सूज देखील दिसू शकते.
पाणी पिण्याचे फायदे आहेत, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही अति पाणी प्यावे. साधारणपणे 2 ते 3 लिटर पाणी पिणे पुरेसे असते.
यापेक्षा जास्त पाणी प्यायल्याने शरीरातील मीठ म्हणजेच इलेक्ट्रोलाइट असंतुलित होते. कमी सोडियममुळे हायपोएट्रेमियाची समस्या उद्भवू शकते, जी काही वेळा प्राणघातक ठरू शकते.
जेवताना पाणी पिण्याची सवय असेल तर लगेच बंद करा. कारण, यामुळे छातीत जळजळ आणि अपचन होऊ शकते. वास्तविक,
जेवण करताना पाणी प्यायल्याने पोटात अन्न पचवणारे आम्ल पातळ होतात आणि अन्नाचे पचन व्यवस्थित होत नाही. जेवताना तहान लागली असेल तर तुम्ही 1-2 घोट पाणी पिऊ शकता.
अनेकवेळा आपल्याला असे वाटते की, शरीराला फक्त द्रवपदार्थाची गरज असते, मग ते पाणी असो वा थंड पेय, चहा, कॉफी किंवा सोडा. पण असे करणे ही चूक आहे. कारण कोणत्याही द्रवामध्ये पाण्यासारखे हायड्रेटिंग गुणधर्म नसतात.
याउलट चहा, कॉफी, सोडा, कोल्ड्रिंक्स तुमच्या शरीराला डिहायड्रेट करण्याचे आणि शरीरातील पाणी काढून टाकण्याचे काम करतात.
उन्हाळ्यात फ्रीजमध्ये ठेवलेले पाणी किंवा बर्फाचे पाणी प्यायल्याने खूप छान वाटतं. पण या आरामामुळे दीर्घ आजार होऊ शकतात.
कारण, अति थंड पाण्यामुळे शरीरातील व्हॅगस नर्व्हला इजा होऊ शकते, जी शरीरातील सर्वात लांब आणि महत्त्वाची नस आहे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments