नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, श्रावण सोमवारचा व्रत आपण मनोभावाने आणि विश्वासाने करतो आणि आपल्या बऱ्याच मनोकामना देखील पूर्ण होतात. यावेळी श्रावण महिना खूप खास असणार आहे.
वास्तविक, यावेळी श्रावण पूर्ण दोन महिने चालेल. म्हणजेच यावेळी भाविकांना श्रावणातील 8 सोमवार भगवान शंकराची पूजा करण्यासाठी मिळणार आहेत. श्रावण महिना कधीपासून सुरू होत आहे आणि यावर्षी यादरम्यान कोणते शुभ योग आहेत ते जाणून घेऊया.
श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भगवान शंकराची पूजा केल्याने जीवनात सुख-समृद्धी येते असे म्हणतात. यासोबतच व्यक्तीच्या मनोकामनाही पूर्ण होतात. भगवान शंकराला श्रावण महिना अतिशय प्रिय आहे असे म्हणतात.
यावेळी श्रावण महिना जवळपास 2 महिने चालणार आहे. कारण यंदा अधिक मास असल्याने श्रावण महिना तब्बल 2 महिन्याचा राहील.
हिंदू पंचांगानुसार, यावेळी श्रावण महिना सुमारे 2 महिन्यांचा असणार आहे. श्रावण महिना 18 जुलै 2023 पासून सुरू होईल आणि 15 सप्टेंबर पर्यंत चालेल. म्हणजेच यावेळी एकूण 59 दिवस भाविकांना भगवान शंकराची आराधना करण्याची संधी मिळणार आहे.
19 वर्षांनंतर हा शुभ संयोग घडल्याचे सांगितले जात आहे. या वेळी 18 जुलै ते 16 ऑगस्ट दरम्यान मलमास असेल. म्हणजेच या वेळी श्रावणामध्ये भगवान शंकरासोबतच भगवान विष्णूचाही आशीर्वाद मिळणार आहे.
तर मित्रांनो पूर्ण श्रावण महिना तुम्हाला तुमच्या घरात ही एक वस्तू ठेवायची आहे आणि तिची रोज विधिवत पूजा करायची आहे. श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला या वस्तूचे पूजन करायचे आहे.
आता ही वस्तू कोणती आहे? तर मित्रांनो तुम्हाला पूजेच्या दुकानातून एक नवीन सुपारी आणायची आहे. घरात असलेली सुपारी वापरू नये.
तर तुम्हाला ती सुपारी आणून श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी ती सुपारी तुम्हाला देवघरात ठेवायची आहे. विधिवत त्या सुपारीचे हळद कुंकू अक्षदा लावून पूजा करायची व दिवा अगरबत्ती लावून त्यानंतर सम्पूर्ण श्रावण महिना त्या सुपारीचे पूजन करायचे आहे.
आणि आपले जे काही मागणे असेल ते मागणे मागायचे आहे. त्यानंतर तुमची जी काही सेवा असेल ती करायची आहे. महादेवाचा मंत्र किंवा जप असेल तो करायचा. पण ती सुपारी महिनाभर देवघरातच राहू द्यायची.
सकाळ पूजा करताना किंवा साफ सफाई करताना ती उचलावी आणि परत तिला तिच्या जागी ठेवावी. आणि श्रावण महिना सम्पल्यावर तुम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी त्या सुपारीचे वाहत्या पाण्यात विसर्जन करायचे आहे.
याने तुमच्या जीवनातील सगळी पीडा, दुःख, अडचणी, संकट बाधा निघून जातील. आणि मग तुमच्या घरात सुखसमृद्धी, आनंद, समाधान नांदेल. बरकत राहील यश तुम्हाला मिळू लागेल तर नक्की हा उपाय करून बघा..
श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व अतिशय वेगवेगळे आहेत. मात्र, यातील सर्वांत महत्त्वाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवार. या काळात महादेवाची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे.
विशेषत: श्रावण महिन्यातील सोमवारी केलेली पूजा आणि व्रत याचे तत्काळ फळ मिळते असे म्हणतात. भगवान शिव आणि माता पार्वती यांची एकत्र पूजा केल्याने सौभाग्य लाभते आणि आर्थिक समस्या दूर होतात अशी मान्यता आहे.
श्रावण महिना महादेव शंकराला प्रिय असण्यामागचे कारण म्हणजे या महिन्यात पार्वती देवीने शंकरांना प्राप्त करण्यासाठी मोठे तप केले होते, असे सांगितले जाते. श्रावणी सोमवारी केल्या जाणाऱ्या शिवपूजनात जलाभिषेक,
रुद्राभिषेकालाही विशेष महत्त्व असते. शिवपूजन करणे शक्य नसल्यास भक्तिभावाने केवळ एक बेलाचे पान शिवाला वाहिल्यास पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते, असे सांगितले जाते. तसेच श्रावणात शिव प्रतीकांपैकी एक असलेला रुद्राक्ष धारण करणे लाभदायक मानले जाते.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.
Recent Comments