नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, नवरात्री आधी घरी नक्की आणा कुलदेवीच्या सेवेसाठी महत्वाची वस्तु घरात सुख, समृद्धी, आरोग्य राहुन..
दरवर्षी आश्विन महिन्यातील शुक्ल पक्ष प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात होते.नवरात्रीमध्ये माता लक्ष्मी प्रत्येकाच्या घरामध्ये विराजमान होत असते,
परंतु यासाठी आपल्या नवरात्रीमध्ये माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायला पाहिजे. घरामध्ये साफ-सफाई करायला हवी आणि काही असे उपाय देखील करायला हवेत, ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात वास करेल.
त्यामुळे हिंदू धर्मातील वास्तुशास्त्रामध्ये, अशा काही वस्तू सांगितलेल्या आहेत, ज्या आपण जर आपल्या घरामध्ये आणल्या तरी यामुळे देवी माता आपल्यावर प्रसन्न होते, आपल्या घरामध्ये वास करेल,
आपलं घरावर ईश्वर कृपा करेल.त्यामुळेच ही नवरात्र सुरू होण्याआधी देवी माता आपल्या घरात विराजमान होण्यासाठी नवरात्र सुरू होण्याआधी आपल्या घरामध्ये या वस्तू नक्की आणल्या पाहिजेत.
ही नवरात्र सुरू होण्याआधी आपल्या घरात ज्या वस्तू आपल्या आणायचे आहे, त्यातील सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे, कमळाच्या फुलाचे चित्र किंवा सोने आणि चांदीचा शिक्का होय.
कारण कमळाचं फूल हे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे, माता लक्ष्मी कमळाच्या फुलावर विराजमान आहेत,असं कमळाचे चित्र आणून आपण आपल्या हॉलमध्ये किंवा जिथे सतत आपली नजर जाईल अशा ठिकाणी लावला,
तर यामुळे माता लक्ष्मी सुद्धा आपल्या घरा वास्तव्य करते. याचबरोबर आपल्या घरातील वातावरण प्रसन्न राहतं आणि तिथलं वातावरण प्रसन्न आणि आनंदी असतं, त्या घरांमध्ये माता लक्ष्मीचा आगमन होत असतं.
त्याचप्रमाणे सोने किंवा चांदीचा शिक्का जर आपण नवरात्रीच्या आधी आपल्या घरामध्ये आणला, तर या शिक्क्यावर माता लक्ष्मीचे चित्र असेल किंवा श्री गणेशायांचे चित्र असेल,
तर अतिउत्तम सोन्याचा किंवा चांदीचा शिक्का जर आपण आपल्या घरामध्ये आणला तर, यामुळे सुद्धा मात्र लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करते.याशिवाय पुढची वस्तू म्हणजे, केळीचे रोप होय.
केळीचे रोप जर आपण या नवरात्रीच्या आधी आपल्या घरामध्ये आणलं, आपल्या अंगणात हे रोप लावलं तर यामुळे सुद्धा माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते.
हे रोप लावल्यानंतर प्रत्येक गुरुवारी या रोपांची मनोभावे पूजा करायची आहे, यामुळे आपल्या घरामध्ये पैशाची कधीही कमतरता भासत नाही. पुढची वस्तू म्हणजे, धोत्र्याच्या झाडाचं मुळ.
धोत्र्याच्या झाडाचा मूळ जर आपण ही नवरात्र सुरू होण्याआधी आपल्या घरामध्ये आणलं आणि ते जर आपले तिजोरीमध्ये ठेवलं, तर यामुळे आपल्या घरामध्ये कधीही पैशाची चणचण भासणार नाही आणि कोणत्याही प्रकारची आर्थिक समस्या आपल्या जीवनात येणार नाही.
नवरात्र सुरू झाल्यानंतर हे धोत्र्याच्या झाडाचा मुळ आपल्या देवघरात ठेवून नऊ दिवस पूजा करायचे आहे,यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. पुढची वस्तू म्हणजे, वडाच्या झाडाचे पान होय.
वडाच्या झाडाचे पान तुम्हाला कुठेही सहज मिळेल वडाच पान, नवरात्र सुरू होण्याच्या एक दिवस आधी आपल्या घरात आणून ठेवलं
आणि नवरात्र सुरू होण्याच्या दिवशी वडाच्या पानावर कुंकवाचे साह्याने स्वस्तिक काढून आपल्या मंदिरात स्थापित केलं, तर यामुळे माता लक्ष्मी हमखास आपल्यावर प्रसन्न होते.
जेव्हा नवरात्रीमध्ये आपण माता लक्ष्मीची पूजा करणार आहोत तेव्हा हे वडाचं पान महालक्ष्मीला अर्पण करावं. यामुळे सुद्धा माता लक्ष्मी आपल्याला आशीर्वाद देते, आपल्या घरामध्ये सुख-समृद्धी नांदते. आपल्या घरामध्ये पैशाची कधीही कमतरता नाही.
तर या वस्तू पैकी कोणती एक वस्तू जरी तुम्ही नवरात्र सुरू होण्याआधी आपल्या घरात आणली, तर यामुळे नक्कीच माता लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरात होईल…
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments