वास्तुदोष पितृदोष दूर करण्यासाठी 12 मे मोहिनी एकादशीला करा कापुराशी संबंधित हा उपाय…..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला भगवान विष्णूंच्या मोहिनी स्वरुपाची पूजा केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, समुद्र मंथनातून प्राप्त झालेल्या अमृताला दानवांपासून वाचवण्यासाठी भगवान विष्णूंनी मोहिनीचे रुप धारण केले आणि दानवांकडून अमृत कलश घेऊन ते देवतांना दिले.

मान्यता आहे की, ज्या दिवशी ही घटना घडली, त्या दिवशी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथी होती. तेव्हापासून या एकादशीला मोहिनी एकादशी म्हणून ओळखले जाऊ लागले.

यावेळी मोहिनी एकादशीचा व्रत 12 मे 2022 रोजी केले जाईल. मान्यता आहे की, या एकादशीचे व्रत केल्याने सर्व प्रकारचे दु:ख दूर होतात आणि व्यक्ती मोहाच्या बंधनातून सुटून मोक्षच्या मार्गाने अग्रेसर होतात.

ज्योतिष तज्ञांच्या मते, जर आपण उपवास करु शकत नसाल, तर या दिवशी काही उपाय करुन आपण नारायण आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करु शकता. यामुळे घरात संपत्ती, सौभाग्य, आरोग्य, आनंद आणि शांती येते.

चला जाणून घेऊया त्या उपायांबद्दल –
मोहिनी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी गायीच्या तुपाचा दिवा तुळशीसमोर ठेवावा. त्यानंतर, ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः’ या मंत्राचा जप करुन तुळशीभोवती 11 वेळा परिक्रमा करा.

असे केल्याने घरात सुख-शांती राहाते आणि आनंद येतो. कर्जातून मुक्त होण्यासाठी गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने पिंपळाच्या झाडाला स्वतःचे स्वरुप सांगितलं आहे. म्हणून एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी द्या आणि तुपाचा दिवा लावा.

यानंतर, नारायण यांचे स्मरण करताना पिंपळाच्या झाडा भोवती सात वेळा परिक्रमा करा. यामुळे कर्जातून मुक्तता मिळते.

मोहनी एकादशीचे व्रत केल्याने उपवास करणार्‍याची सर्व पापे नष्ट होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात, असा समज आहे. तसेच, मोहिनी एकादशीच्या दिवशी काही सोपे उपाय करून तुम्ही तुमचे नशीब बलवान करू शकता, शुभता वाढवू शकता.

या दिवशी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय केल्यास त्यांच्यासोबतच माता लक्ष्मीची कृपाही प्राप्त होते, अशी धार्मिक मान्यता आहे.

मोहिनी एकादशीच्या दिवशी सकाळी भगवान विष्णूंना केशर दुधाचा अभिषेक करा, यामुळे तुमच्या जीवनात सुख-समृद्धी येईल. एकादशीच्या दिवशी सकाळी स्नान वगैरे करून श्रीमद भागवत कथेचे पठण केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात.

आर्थिक लाभासाठी मोहिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंसोबत माँ लक्ष्मीची पूजा करा, असे केल्याने तुम्हाला सौभाग्यही प्राप्त होईल.

एकादशीला दक्षिणावर्ती शंखाची पूजा केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी देखील प्रसन्न होते. यातून धनलाभ होतो. एकादशीला तुळशीच्या माळाने ओम नमो वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा.

असे करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. मोहिनी एकादशीच्या दिवशी तुम्ही भगवान विष्णूला पिवळे फूल अर्पण करा, असे केल्याने तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. तसेच मोहिनी एकादशीला पिवळ्या रंगाचे विशेष महत्त्व आहे,

या दिवशी भगवान विष्णूला पिवळे फळ, कपडे आणि धान्य अर्पण करावे. या सर्व गोष्टी नंतर दान करा.

मोहिनी एकादशीला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा. भगवान विष्णू पीपळात राहतात असे मानले जाते. असे केल्याने कर्जातून मुक्ती मिळते.

मोहिनी एकादशीला भगवान विष्णूला तुळशीमिश्रित खीर अर्पण करा. यामुळे घरात शांतता राहते. मोहिनी एकादशीला संध्याकाळी तुळशीसमोर गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि ‘ओम वासुदेवाय नमः’ असा जप करताना तुळशीची 11 प्रदक्षिणा करा.

यामुळे घरात सुख-शांती राहते आणि कोणताही त्रास होत नाही.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!