नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,कोणाच्या घरी मुलगी जन्म घेते याचा खूप सुंदर उत्तर आज तुम्हाला मिळेल. असे म्हटल जाते की, मुलगी झाली आणि लक्ष्मी आली. ” पहिली बेटी, धनाची पेटी” भगवत सुद्धा सर्वांच्या घरी मुलींना पाठवत नाही.
जे नशीबवान असतात, मोठ्या मनाचे असतात त्यांच्या घरी भगवंत मुलीला पाठवतात. ज्याच्या सतत वाईट भावना असतात, ज्यांचे मन वाईट असते अशा लोकाच्या घरी भगवंत मुलींना कधीच पाठवत नाहीत.
ज्यांची दान करण्याची नीती असते अशाच व्यक्तींच्या घरी मुली जन्म घेतात व त्यामुळेच त्यांना कन्यादानाचे भाग्य प्राप्त होत असते. एकदा स्वामी वैष्णों देवीच्या दर्शनाला जात असताना त्याना वाटेत एक शेतकरी दिसला शेतकऱ्यासोबत दोन मुली होत्या.
त्यातील जी लहान होती तिला खांद्यावर बसले होते आणि मोठी त्याचा हात धरून त्या डोंगर चढत होते. स्वामी त्या शेतकन्याला म्हणाले बाबा कुठे चाललात?, त्यावर त्या शेतकन्याने म्हटल की, आम्ही देवी आईच्या दर्शनाला जात आहे.
त्यावर स्वामी म्हणाले की, तुम्हाला खाद्यावर जास्त भार होत असेल एक काम करा तुम्ही तिला माझ्या खाद्यावर द्या व मंदिराजवळ पोहोचलो की मी तुम्हाला तिला तुमच्या हवाली करेन. त्या वेळी त्या शेतकन्याने खूप सुंदर उत्तर दिले आहेत.
अहो स्वामी मुलगी कधी ही वडिलाच्या खांद्यावर भार नसते, उलट मुलगी जेव्हा वडिलाच्या खाद्यावर असते. तेव्हा वडिलांचा भार हलका करत असते. ज्या माणसाला मुलगी ओझे वाटते तो बाप असू शकत नाही.
एक मुलगा आपल्या आईवडिलांना दुखात बघू शकतो पण मूलगी कधीच बघु शकत नाही. आई-वडिलांना थोडे जरी दुःख झाले तरी मुलींचे हृदय लगेच कासावीस होते. जोपर्यंत मुलगी घरात असते तोपर्यंत ते बागडत असते.
परंतु एकदा का ती लग्न करून सासरी गेली की, आपण तिची फक्त वेळोवेळी आठवण करत राहतो. वडील कामावरून थकून भागून घरी आले तर लगेच वडिलांच्या हातात पाण्याचा ग्लास देईल. वडिलांची विचारपूस करेल.
काही हवे नको ते बघेल. वडील थोडे जरी चिंतेत दिसले तर लगेच त्यामागच कारण जाणून घेई.ल औषध पाणी वेळेवर करेल. म्हणून तर म्हणतात की, मुलगी म्हणजेच वडिलांची आईच असते.
ती अगदी आईसारखीच वडिलांची काळजी घेते. वेळ प्रसंगी रागवते व कधी लाडात येऊन बोलते चूक असेल तर चूक दाखवून देते सून कितीही चागली असली तरी मुलीची जागा कधीच घेऊ शकत नाही.
लग्न करून जरी मुलगी सासरी गेली तरी तिकडून 10 वेळा फोन करून वडिलांच्या गोळ्या औषधांची आठवण करून देईल. जर मुलीला खूप लांब दिले असेल आणि भेटणे शक्य नसेल तर ती आठवणीने व्याकूळ होते अशी कोणती स्त्री नाही जिला आपल्या आईवडिलांची आणि माहेरची आठवण येत नाही.
मुलगी जर सण उत्सवात माहेरी येणार नसेल तर आई- वडिलांच्या आसपासचे कोणी तिच्या गावाला जाणार असेल. तर आपल्या हाताने बनवलेले लाडू, चिवडा इत्यादी वस्तू पॅक करून त्या व्यक्तीकडे देते आणि जेव्हा तो व्यक्ती ती पिशवी घेऊन जातो आणि तिच्या हातात देतो.
तेव्हा त्या मुलीच्या आनंदाचे शब्दात वर्णन करावे. तेवढे थोडेच तिच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात व मुलीच्या हृदयात उपजतच प्रेम असते. आपण लहान मुलांच्या हातात बाहुली दिली.
तर तो तिचे केस उपटेल हात-पाय लोडेल, कपडे पडेल. परंतु तीच बाहुली जर आपण एखाद्या लहान मुलीच्या हातात दिली, तर ती बाहुलीला कपडे नेसवून तिचा मेकअप करेल आणि तिला थोपटवून झोपवेल.
यावरूनच तुम्हाला पटेल की मुलांच्या पेक्षा मुलीमध्ये किती माया असते आपण म्हणतो मुलींच्या सासरी जायचं क्षणी सर्वात जास्त आई रडते. परंतु शिवमहापुरानात अस सांगितलं आहे की, ज्यावेळी देवी पार्वतीची लग्नानंतर पाठवणी झाली.
त्यावेळी सर्वात जास्त हिमालय राज रडले होते. वडील असे सर्वासमोर रहत नाहीत ते गुपचूप घराच्या एका कोपन्यात बसून रडत असतात.
कारण ते मुलीला सासरी जाताना पाहू शकत नाहीत. आई मुलीच्या गळ्यात पडून रडते परंतु वडील अस करत नाही. ते आपण आतल्या आत रडत असतात. मुली फक्त प्रेमाच्या भुकेल्या असतात, त्यांना प्रॉपर्टी मधील काही नको असते.
त्यांना फक्त माहेरी आल्यानंतर माया व दोन गोड शब्दांची अपेक्षा असते. जितके सुख मुलाकडून मिळत नाहीत, इतकें सुख मुलीने फक्त मुलीचे तोंड बघूनच मिळत असते,
अशा या मुली ज्यांच्यात देण्याची निती असते. जे मोठ्या मनाचे असतात नशीबवान असतात. अशाच व्यक्तींच्या घरी मुली जन्म घेतात.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments