देवाला नारळ का फोडवा?,नारळ फोडल्याने काय होते?, काय सांगते धर्मशास्त्र…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक शुभ कार्यात मंगल प्रसंगी, पुजनांमध्ये नारळाचा वापर केला जातो. नारळाचा कलश स्थापन केला जातो. तेव्हा नारळ फोडले तर काही वेळा यज्ञात अर्पण केले जाते.

आपल्या घरात काही पूजा असो वा वास्तू प्रवेश करणे असो किंवा लग्नकार्य असो किंवा एखाद्या नवीन वस्तूंची खरेदी केली असेल, नवीन व्यवसायाची सुरुवात करायची असेल अशा प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात नारळ फोडून केले जाते.

कारण नारळाला आपण शुद्ध आणि पवित्रतेचे प्रतीक मानतो. नारळ हे समृद्धी व सौभाग्याचे प्रतीक समजले जाते, परंतु आपल्याला हा प्रश्न पडला असेल की, प्रत्येक शुभ मंगल कार्याच्या वेळी नारळ फोडले जाते नारळ फोडल्याने काय होते??.

तर सर्वात आधी आपण जाणून घेऊयात नारळाचे उत्पत्ती कशी झाली.ज्यावेळी ब्रह्मदेव या सृष्टीची निर्मिती करीत होते, त्यावेळी विश्वामित्र ऋषी ही दुसर्‍या एका सृष्टीची निर्मिती करीत होते.

ब्रह्मदेवांनी घोडा बनवला तर विश्वामित्रांनी गाढव बनवले. ब्रह्मदेवांनी शेळी बनवली तर विश्वामित्रांनी मेंढी बनवली. तसेच ब्रह्मदेवांनी गाय निर्माण केली तर विश्वामित्रांनी म्हैस तयार केली.

मग असे करता करता ज्या वेळी ब्रम्हदेव मनुष्यप्राण्याची निर्मिती करायला लागले, त्यावेळी ऋषी विश्वामित्रांनी ही माणसाची निर्मिती करायला सुरुवात केली. त्यांनी कवठी बनवली, तिला जठा लावल्या आणि डोळे तयार केले, परंतु ब्रह्मदेवांनी तेथेच त्यांना थांबवले.

कारण 2 प्रकारचे मनुष्य प्राणी जर निर्माण झाले तर या सृष्टीत हाहाकार निर्माण होईल हे ब्रह्मदेव जाणून होते आणि विश्वामित्रांनी माणसाची निर्मिती थांबली. परंतु कवटी, जठा आणि डोळे असलेले मुख ऋषी यांनी तयार केले होते.

ते ब्रह्मदेवांनी एका झाडावर लावले आणि तेच नारळ म्हणून प्रचलित झाले. पुर्वीच्या काळी देवीदेवतां समोर नरबळी देण्याची पद्धत होती. वाजत गाजत बळी दिला जात असे त्या साठी व्यक्तीची मिरवणूक काढली जात असे

आणि भगवंतांच्या समोर त्याचा बळी देऊन त्याचे रक्त भगवंतांवर शिंपडले जात असे. परंतु ही पद्धत बंद झाल्यानंतर भगवंतांकडे नारळ फोडले जावू लागले. कारण ते ही मनुष्यप्राण्याची प्रतीक मानले जाते आणि नारळाचे पाणी भगवंतांवर शिंपडले जाते.

परंतु त्यातही अडथळे निर्माण झाले काही व्यक्ती हे मानायला तयार नव्हते कारण रक्त असते तर नारळाच्या पाण्याला कोणताही रंग नसतो, म्हणून त्यावर उपाय म्हणून देवाच्या मूर्तीवर शेंदूर लावून लाल केले जाऊ लागले आणि त्यावर नारळाचे पाणी शिंपडले जाऊ लागले.

अशा प्रकारे भगवंतांकडे नारळ फोडण्याची पद्धत रूढ झाली. नारळ वरून कडक आणि त्यातून सौम्य असते या मधील पाणी पवित्र मानले गेले आहे. याचा वरील भाग कडक आहे.

तो हे दर्शवतो की, कोणत्याही कार्याच्या यशाची प्राप्ती करण्यासाठी आपल्याला कठोर परीक्षण करावे लागणारच.नारळ गणपतीला अतिप्रिय आहे त्यासाठी त्यांना काहीही नवे कार्याच्या आधी नारळ फोडून त्यामधील पवित्र पाणी सर्वत्र शिंपडले जाते,

जेणेकरून नकारात्मक शक्तीचा ऱ्हास होतो. नारळ स्वतःच्या अहंकाराचे प्रतीक असते. नारळ शरीराचे प्रतीकात्मक असते. नारळ फोडणे म्हणजे आपण स्वतःला संपूर्ण विश्वात सम्रस केले आहे,

यावर असलेले 3 डोळे भगवान शंकरांचे जातात ज्यामुळे आपल्या सर्व इच्छा यांची पूर्तता होते. संस्कृतमध्ये नारळाला श्रीफळ असेही म्हणले जाते. श्रीचा अर्थ लक्ष्मी असे. पौराणिक मान्यता नुसार लक्ष्मी शिवाय कुठलेही शुभ कार्य होत नाही

आणि शुभकार्यात नारळाचा वापर केल्या जातो. नारळाच्या झाडाला संस्कृतमध्ये कल्पवृक्ष असेही म्हटले जाते. कारण कल्पवृक्षा सर्व मनोकामना पूर्ण करते.
पूजेनंतर नारळ फोडून त्याचा प्रसाद सर्वांना दिला जातो.

देवाला नारळ फोडले जाते कारण, नारळ फोडले नाही तर पुजा अपूर्ण मानली जाते. पूजा किंवा कोणतेही मंगल कार्य हे नारळाशिवाय पूर्ण होत नाही, याचा अर्थ म्हणजे भक्ताने स्वतःला देवाच्या चरणी अर्पण केले असा होतो.

नारळाच्या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात. ज्या घरात नारळाची असते घरात धन समृद्धी असते. सनातन धर्मात सर्व देवीदेवतांना नारळ अर्पण केले जाते किंवा असे म्हणतात की, कोणतेही पूजन आणि मंगल कार्य नारळाशिवाय पूर्ण होत नाही.

म्हणूनच नारळाला दुसरे नाव श्रीफळ असे पडले आहे. हिंदू धर्मात नारळाला सर्वात पवित्र फळ मानले गेले आहे, कारण या फळात ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रीत असल्याचे मानले जाते.

नारळ फोडल्यानंतर भक्तांच्या सर्व दुःखांचे निवारण होते असे सांगतात. नारळ फोडल्यानंतर भक्ताच्या मनाला शांतता मिळते. शुभ वेळी नारळ फोडण्याने, देवाशिवाय काही चांगल्या कामाच्या वेळी पण नारळ फोडले जाते.

देवाच्या प्रसादामध्ये नारळाचा उपयोग केला जातो, याशिवाय अनेक दिवस चालणाऱ्या व्रताच्या संकल्पाची सुरुवात आहे देवाला नारळ फोडून केली जाते. देवाला नारळ फोडण्याचा अर्थ म्हणजे भक्ताने स्वतःला देवाच्या चरणी अर्पण केले असा होतो.

असेही मानले जाते आधीच्या काळी चालणारी बळी देण्याच्या प्रथेला तोडण्यासाठी त्या जागी नारळ फोडण्याचे परंपरा सुरू करण्यात आली. तसेच धर्म आणि ज्योतिषशास्त्रात नारळाच्या झाडाला शुभ मानले जाते.

घरात नारळाचे झाड असल्याने वास्तुदोष नष्ट होतात. नारळाच्या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि कुंडीलीतील दोष दूर करण्यासाठी ही नारळाच्या झाडाची पूजा करण्याचा सल्ला दिला जातो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!