नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,पितृपक्षामध्ये शुभ कार्य करण्यास मनाई असते. नवीन कपडे घालणं, नव्या वस्तू खरेदी करणे इत्यादी गोष्टी देखील पितृपक्षात करू नयेत, असे मानले जाते. मात्र, पितृ पक्षाच्या या 15 दिवसांमध्ये अष्टमी हा दिवस शुभ मानला जातो.
पितृपक्षामध्ये येणाऱ्या अष्टमीला देवी लक्ष्मीचे वरदान प्राप्त आहे. या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. तसेच या दिवशी सोने खरेदी केल्याने ते आठ पट वाढते, अशीही धार्मिक श्रद्धा आहे.
लग्नाच्या खरेदीसाठी हा दिवस शुभ मानला जातो. या दिवशी हत्तीवर विराजमान लक्ष्मीची पूजा करणे लाभदायक ठरते.
पितृ पंधरवड्यात पितरांसाठी केले जाणारे सर्व विधी उजव्या खांद्यावर जानवं परिधान करून, तसंच दक्षिणेकडं तोंड करून केले जातात. तर्पण विधीत काळे तीळमिश्रित पाणी पितरांचं स्मरण करून त्यांना अर्पण केलं जातं.
श्राद्ध विधीत पितरांना अन्नदान करताना पंचबली काढले जातात. पंचबली म्हणजे गाय, कुत्रा, कावळा, देवता आणि चिमणीसाठी त्यातून अन्न वेगळं काढलं जातं. अशा पद्धतीनं भोजन आणि जल अर्पण केल्यानं पितरांना शांती लाभते.
श्राद्धविधीसाठी दूध, तांदूळ, साखर आणि तुपापासून पदार्थ बनवले जातात. कुशाच्या आसनावर बसून पंचबलींसाठी भोजन ठेवावं. त्यानंतर पितरांचं स्मरण करून खालील मंत्र तीन वेळा म्हणावा,
“ओम देवताभ्यः पितृभ्यश्र्च महायोगिभ्य एवच नमः”,
याचबरोबर, पितृपक्षात ही एक गोष्ट नक्की खरेदी करा त्यामुळे माता लक्ष्मीची असीम कृपा असल्यावर होईल. तर एक मिठाची पुडीही घरात नक्कीच आणावी व तिचा वापर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करावा.
यातील थोडेसे मीठ पाण्यात टाकून, त्या पाण्याने फरशी पुसावी, त्यामुळे घरातील सर्व नकारात्मकता निघून जाईल आणि घरातील दारिद्र्य नष्ट होईल. याचबरोबर हे मीठ थोडे थोडे काचेच्या बाटल्यांमध्ये ठेवून,
प्रत्येक रूममध्ये ती वाटी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्रभर ठेवावे आणि दुसर्या दिवशी सकाळी ते सर्व मीठ एकत्र करून पाण्यात टाकावे. यामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मकता ते मीठ शोषून घेईल व पाण्यात प्रवाहित होऊन जाईल.
पुढील वास्तू म्हणजे दक्षिणावर्ती शंख होय. जर देवघरात शंख असेल, तर या शुभ दिवशी दक्षिणावर्ती शंख खरेदी करून घरी आणावा व त्याची स्थापना करावी. शंख सुखसमृद्धी व शांतीचे प्रतीक आहे.
कोणत्याही शुभ दिवशी शंख घरात आणावा व पुजेवेळी शंख घरात वाजवावा, यामुळे घरात देवी लक्ष्मीचे आगमन होते आणि शंखाचा आवाज इतक्या दूर जातो, तितका अंतरातील जीव जंतू व कीटाणू नष्ट होतात.
देवी लक्ष्मी मातेला शंखध्वनी खूप आवडतो, म्हणून त्या ठिकाणी नियमितपणे शंख वाजवला जातो, लक्ष्मी कधीही जात नाही तेथेच वास्तव्य करते.
तसेच घरात धने नेहमी एका कोपऱ्यामध्ये ठेवावे आणि त्यांचे पूजन करावे. नंतर धने कुंडी किंवा अंगणात माती टाकून लावून द्यावेत, आपल्या घरात देवी लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांचे आगमन होईल.
याशिवाय चांदीची भांडी किंवा चांदीची नाणी खरेदी करणे ही खूप शुभ असते. असे मानले जाते की, याचबरोबर, श्रीयंत्र आणि लक्ष्मीयंत्र यांची खरेदी करणे, ही खूप शुभ असते.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments