19 सप्टेंबर गणपती बसवतांना चौरंगा खाली ठेवा फक्त 1 कागद दिवसात तुमचं काम होईल..

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो,  19 सप्टेंबर गणपती बसवतांना चौरंगा खाली ठेवा फक्त 1 कागद दिवसात तुमचं काम होईल..

महादेव शिवशंकर आणि देवी पार्वतीचा पुत्र म्हणून ओळखला जाणारा गणपती सर्वांनाच हवाहवासा वाटतो. गणपती ही देवता शांत मानली जाते. कोणत्याही पूजेची सुरुवात गणपती पूजनाने केली जाते.

बुद्धीदाता, गणांचा अधिपती, प्रथमेश यांसारख्या विविध स्वरुपात गणपतीचे पूजन केले जाते. भाद्रपद चतुर्थी, माघ चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती आणि दर महिन्यात येणारी संकष्ट चतुर्थी हे गणपतीची उपासनेचे मुख्य सण-उत्सव.

विघ्नहर्ता, सुखकर्ता अशी ओळख असणाऱ्या गणपतीची दररोज कोट्यवधी कुटुंबात पूजा केली जाते.

लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सार्वजनिक केल्याचे सर्वश्रुत आहेच. मात्र, गणेशोत्सवाच्या काळात विविध रुपात गणपती पूजन केले जाते. गणपती एवढी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर केली जाणारी अन्य कोणतीही देवता आपल्याला दिसत नाही.

दरवर्षीच्या ट्रेंडप्रमाणे गणपती मूर्ती घडवल्या जातात आणि त्या पूजल्या जातात. गणपती कधी खंडेराय होतो, कधी साईबाबा होतो, कधी शिवाजी होतो, तर अगदी कधी बाहुबलीही होतो. अशी सर्वसामान्यांमध्ये मुरलेली देवता शोधून सापडणार नाही. सर्वधर्मियांमध्ये गणपतीविषयी आस्था, प्रेम, श्रद्धा असल्याचे दिसून येते.

अबालवृद्धांमध्ये जो भजला, पूजला, स्मरिला जातो, अशा या गणपतीची घरात स्थापना करताना कोणती काळजी घ्यावी? गणपतीची मूर्ती किंवा प्रतिमा घरामध्ये नेमकी कुठे स्थापन करावी? जाणून घेऊया..

ज्याच्या केवळ नावाने एक चैतन्य, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा संचारते, ती म्हणजे गणपती देवता. गणपती हाच सृष्टीचा निर्माण कर्ता असल्याचे मानले जाते. तोच ब्रह्म आहे, विष्णू आहे,

रुद्र आहे, इंद्र आहे, असे सांगितले जाते. गणपतीविषयी अनेक शास्त्रात, पुराणात विविध प्रकारचे उल्लेख आढळतात.

मात्र, महादेव आणि पार्वतीचा पुत्र म्हणून त्याची मुख्य ओळख सांगितली जाते. गणपती हा विघ्नहर्ता मानला जातो. घरामध्ये काही दोष असतील, तर गणपती कृपेने ते दूर होऊ शकतात.

वास्तुशास्त्र यावर भाष्य करते आणि प्रकाशही टाकते. ब्रह्मदेवाने वास्तुशास्त्र रचले आहे, अशी मान्यता आहे. वास्तु कशी असावी आणि कशी नसावी, यावर वास्तुशास्त्र भाष्य करते.

वास्तुदोषाकडे कानाडोळा किंवा डोळेझाक केल्याचे नकारात्मक परिणाम होऊ शकतात, असे सांगितले जाते. घरातील सदस्यांना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक आघाड्यांवर नुकसान सहन करावे लागू शकते. काहीवेळा वास्तुदोषामुळे घराची रचना बदलण्याचाही सल्ला दिला जातो.

मात्र, अनेक वास्तुदोष गणपती पूजन, नामस्मरण यांनी दूर होऊ शकतात, अशी मान्यता आहे. नवीन घर असो, कार्यालय असो, कारखाना असो किंवा खरेदी-विक्रीचे दालन असो,

वास्तुशास्त्राप्रमाणे अनेक गोष्टी पाहिल्या जातात. आवश्यक ते बदलही वास्तुमध्ये केले जातात. कोट्यवधी लोकांची यावर गाढ श्रद्धा असते. वास्तुशास्त्राप्रमाणे जीवनात वारंवार समस्या,

अडचणी येत असल्यास गणपतीची प्रतिमा घरात लावण्याचा सल्ला दिला जातो. गणेशाची प्रतिमा ही घरातील प्रवेशद्वाराबाहेर आणि आत अशा दोन्ही ठिकाणी समान जागी लावावी, असे सांगितले जाते.

यामुळे घरातील दोष दूर होतात आणि घरात सुख-समृद्धी येते, अशी मान्यता असल्याचे वास्तुशास्त्र सांगते.

एखाद्या वास्तुमध्ये काही दोष असला किंवा वास्तु बांधताना त्यात काही त्रुटी राहिल्या असतील, तर अशावेळी वास्तु रचनेत बदल करण्याचा सल्ला दिला जातो. वास्तुशास्त्रात वास्तुबाबत अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत.

मात्र, घरामध्ये विशिष्ट ठिकाणी असलेल्या वास्तुदोषासाठी वास्तुरचनेत बदल न करण्याचाही सल्ला दिला जातो. विशिष्ट ठिकाणचा वास्तुदोष दूर करण्यासाठी त्या ठिकाणी तूपमिश्रित शेंदूराचे स्वस्तिक काढावे,

असे सांगितले जाते. शेंदूर हा गणपतीला मानला गेल्यामुळे गणपतीचा आशिर्वाद कायम सोबत राहतो, अशी मान्यता आहे.

अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!