नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,4 जुलै मोठा सोमवार आणि या दिवशी निर्माण झाला आहे शुभ महासंयोग. यानिमित्त आपण भगवान शिवशंकराची उपासना नक्की करा. कारण वर्षभरात भगवान शिवशंकराची उपासना करण्याचा सर्वोत्तम दिवस सर्वश्रेष्ठ दिवस म्हणजेच सोमवार होय.
या 2022 या सालात तब्बल 72 वर्षानंतर पंचग्राही योग बनत आहे आणि म्हणूनच या दिवशी शिवलिंगावर म्हणजेच महादेवाच्या पिंडीवर आपण काही वस्तू नक्की अर्पण करा.
या वस्तू महादेवाच्या पिंडीवर अर्पण केल्याने शिवलिंगावर अर्पण केल्याने इच्छांची पूर्तता नक्की होते. भगवान शिवशंकरांच्या पुजेचा दिवस, या दिवशी आपण शिवलिंगावर ती पहिली सर्वात महत्त्वाची वस्तू ती म्हणजे भस्म.
हे भस्म तुम्हाला पूजेच्या दुकानात नक्की मिळून जाईल. माता पार्वती सती स्वरूपात जळून भस्म झाल्या तेव्हा भगवान शिवशंकरांनी हेच भस्म मग स्वतःच्या माथी लावण्याची प्रचलित मान्यता आहे.
सोबतच भगवान शिवशंकर स्मशानात वास्तव्य करतात आणि मनुष्य लोकांस हा संदेश देतात की, मनुष्य जीवनाचा अंतिम सत्य मृत्यू हेच आहे.जी व्यक्ती भस्म शिवलिंगावर अर्पण करते.
त्या व्यक्तीच्या मनातील मनोकामनाची इच्छांची पूर्तता भगवान शिवशंकरच्या कृपेने नक्की होते. दुसरी वस्तू म्हणजे, रुईचे फूल होय. या रुईचे एखादा तरी फुल आपण भगवान शिवशंकरांनी म्हणजे त्या शिवलिंगावर अर्पण करा.
हिंदू धर्मशास्त्रानुसार रुईचे फुल शिवलिंगावर या दिवशी अर्पण केल्यास 1000 गोदाना इतका पुण्य त्या व्यक्तीच्या माथी जमा होतं.
हे फूल अर्पण करताना आपण आपल्या मनातील इच्छा नक्की व्यक्त करून दाखवा आणि या इच्छेची पूर्ती करण्याची प्रार्थना महादेवाच्या चरणी करा.
या रुईच्या वृक्षांमध्ये अगदी मुळापासून शेंड्यापर्यंत अनेक गुणधर्म, अनेक गुणकारी तत्व उपलब्ध आहे. तिसरी वस्तू आहे ती म्हणजे गोमातेचे दूध. अनेक जण दुधाने शिवलिंगाचा अभिषेक करण्यास प्राधान्य देतात.
आपण सुद्धा या दिवशी गोमातेच्या दुधाने अभिषेक नक्की घाला. या शिवलिंगाचा दुग्ध अभिषेक झाला. अशीही मान्यता आहे की दुधाने अभिषेक जी व्यक्ती घालते तिच्याही मनातून इच्छांची पूर्तता भगवान शिवशंकर नक्की करतात.
चौथीची वस्तू म्हणजे धोत्र्याचे फळ किंवा धोत्र्याचे फुल आपण अर्पण करा. हे फुल किंवा फळ जर या दिवशी शिवलिंगावर अर्पण केल्याने मनुष्य जीवनातील जे काही दुःख आहेत अडचणी आहेत.
संकटे आहेत समस्या आहेत त्यापासून त्या व्यक्तीस मुक्ती मिळते. आपल्या जीवनात ज्या प्रकारची गरज आहे, अशी आपली इच्छा त्याला अनुसरून आपल्या शिव शंकरांना प्रसन्न करून घेऊ शकता…
मग सर्वात महत्वाचा घटक म्हणजे, आपल्याला पिवळा चंदन लागणार आहे.कारण पिवळा चंदन भगवान शंकराना अतिप्रिय आहे. मग या वस्तु एकत्र घेऊन ठेवावे.मग यातील काळे तीळ 1 ते 2 तास भिजत ठेवा.
मग त्यानंतर त्यांना व्यवस्थित बारीक करून घ्यावे. अशा प्रकारे ते काळे तीळ वाटल्यानंतर,मग त्याच्यामध्ये पिवळा चंदन टाका.मग तांब्याभर पाणी घेऊन,त्यामध्ये गोमातेचे दोन-तीन चमचे दूध टाका.
तसेच पाच किंवा सात बेलपत्र आपल्या जवळ ठेवा आणि त्यानंतर भगवान शिव शंकराची पूजा प्रारंभ करावी. आपल्या घराचे शिवलिंगांची पाटावर त्याची स्थापना करा आणि या शिवलिंगाला आपल्या 3 बोटांनी हे पिवळे चंदन आणि काळ्या तिळाचे मिश्रण लावावे.
हे मिश्रण शिवलिंगाच्या बाजूने गोलाकार भागांवर लावावे.हे मिश्रण लावतांना पुरुषांनी “ओम नमः शिवाय,”ओम नमः शिवाय, तर महिलांनी ” नमः शिवाय, नमः शिवाय” चा पवित्र मंत्राचा जप करावा.
मग त्यानंतर आपण ती बेलपत्रे शिवलिंगावर अर्पण करायचे आहे. ही बेलपत्र पालथी घालावी, पाच किंवा सात बेलपत्र अर्पण करायचे आहेत.
मग शिवलिंगावर त्यानंतर तांब्याभर जल आणि गोमतेचे दूध याचे मिश्रण म्हणजे, दुध मिश्रित जल आपल्याला पूर्ण श्रद्धेने अर्पण करायचे आहे.
तेव्हासुद्धा ओम नमः शिवाय चा जप सातत्याने करा आणि सर्वात शेवटी आपण मनोमन प्रार्थना करा.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments