नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,सकाळी उठल्या उठल्या काय केले पाहिजे म्हणजे आपले जीवन सकारात्मक होईल शास्त्रात सुख व दुःखाला सकारात्मक व नकारात्मक ऊर्जेशी जोडले गेले आहे. म्हणून जेव्हा आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते .
तेव्हा आपल्याला सुख व समृद्धी मिळते तर जेव्हा आपल्याला नकारात्मक ऊर्जा मिळते तेव्हा जीवनात निराशा दुःख संकट येतात. पण सकारात्मक ऊर्जा कशी मिळवायची जर आपण देवाची पूजा आराधना केली तर आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते.
जर आपण देवांची पूजन करणे सोडून दिले तर आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा राहत नाही नेहमी नकारात्मक घटना घडतात व्यवसायात नोकरीत नुकसान होते पैशांची आवक थांबते, पण हे हळूहळू घडते म्हणून आपल्याला लगेच लक्षात येत नाही.
आपण सकाळी उठल्यावर सर्वात आधी काय करतो पूजा कशी करतात. कोणत्या मंत्राचा जप करतो या सर्व गोष्टींचा प्रभाव आपल्या दिवसभराच्या कामात जाणवतोय. आज आपण सकाळी उठल्यावर नेमके काय करावे हे जाणून घेणार आहोत.
कदाचित तुम्हाला तुमच्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींनी सांगितले असेल की सकाळी उठल्या उठल्या दोन्ही हात जोडून देवाला नमस्कार करावा आणि नंतर हात उघडून आपल्या तळहाताकडे लक्षपूर्वक बचाने पण ते असे का सांगत असतील.
याचे खरे कारण हे आहे की प्रत्येक व्यक्तीमध्ये ऊर्जा भरलेली आहे. सकाळी उठल्यानंतर आपले शरीर स्थिर असते. ते दुसन्या व्यक्तीच्या ऊर्जेच्या प्रभावात खूप लवकर येऊ शकते.
जर अशा वेळी एखादी नकारात्मक व्यक्ती आपल्या आसपास असेल. तर तोच प्रभाव आपल्यावर पडतो म्हणून उठल्यानंतर सर्वात आधी आपल्या इष्ट देवांची ध्यान करावे व आपले तर हात एकमेकांना जोडून हाता चंद्रकोर बनवायी व तळहाताकडे बघावे, यामुळे तुमच्या मध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल.
आता तुम्हाला वाटेल की, सकाळी सकाळी हात बघितल्याने काय होणार आहे. यामुळे हातावरील रेषा बदलणार आहेत का हे आपले भाग्य बदलणार आहे.
आपल्या शास्त्रामध्ये असे सागितले आहे की, धनाची देवी लक्ष्मी विटांची देवी सरस्वती आणि सुख-समृद्धी प्रदान करणारे भगवान श्रीहरी विष्णू या तिघाचे एकत्रित -हास एकत्रित आपल्या तळहातावर असतो, म्हणून सकाळी सकाळी तळहाताचे दर्शन घेतले जाते.
सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण आपल्या कडे बघती तेव्हा या तीनही देवी- देवतांचे ध्यान करावे. सकाळी जेव्हा आपण आपल्या तळहाताचे दर्शन करतो याचा अर्थ आपण भगवताकडे आपल्या हातून चागली व पवित्र कार्य व्हावीत.
यासाठी शक्तींची अपेक्षा करतो जगातील कोणत्याही प्रकारची सुख वैभव धन विद्या हे सर्व आपल्याला आपल्या हाताने मुळेच मिळते म्हणून हे सर्व देणान्या देवी-देवताचे सकाळी हातात दर्शन करावे म्हणजे आपला दिवस चांगला जाईल व या तीनही देवीदेवताची आशीर्वाद आपल्याला मिळतील.
हातच कोणतेही कार्य करतात व आपले भाग्य बदलण्याची क्षमता ठेवतात. शास्त्रीय मान्यतेनुसार सकाळी उठल्यानंतर हातांचे दर्शन तर घ्यावेच, परंतु आपण सर्वात आधी कोणत्या वस्तूला स्पर्श करतो.
याचा ही आपल्या संपूर्ण दिवसावर प्रभाव पडतो. मग सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी कोणत्या वस्तूला स्पर्श करावा आपण उठलों की, लगेचच जमिनीवर पाय ठेवू नये. आपल्या भारतीय संस्कृतीत जमिनीला देवी मानले जाते.
म्हणून आपण तिला धरणीमाता म्हणतो. ती देवी असल्याने तिचा आदर करावा म्हणून सकाळी उठल्यानंतर लगेच जमिनीला पाय लावून जमिनींचा निराधार करू नये तर सर्वात आधी जमिनीला स्पर्श करून तो हात आपल्या कपाळाला लावून जमिनीला वंदन करादे मगच आपले पाय जमिनीवर टेकवावे.
असे केल्याने आपल्या मनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होती आणि आपण आपल्या कार्यात जास्तीत जास्त सकारात्मकता आणू शकतो. आणखी अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या केल्याने आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
जर सकाळी उठल्यानंतर किंवा घंटीचा आवाज कानावर पडल्यास आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो सकाळी आपल्याला नारळ शंख मोर हंस किंवा ताजी फुले नजरेस पडल्या समजावे की, आजचा दिवस आपल्याला शुभ जाणार आहे.
जर सकाळी घराबाहेर पडल्यानंतर आपल्याला एकादा सफाई कर्मचारी दिसल्यास खूप शुभ असते सकाळी उठल्यानंतर लगेचच आपले तोंड आरशात पाहू नये कारण आरशामध्ये रात्रभर निगेटिव ऊर्जा सामावलेली असते आणि तिचा प्रभाव आपल्यावर पडतो.
त्याबरोबरच स्नान झाल्यानंतर देवपूजा जरूर करावी. जर इतका वेळ नसेल तर निदान दिवा अगरबत्ती तर जरूर लावावी व देवांना नमस्कार करून मगच बाहेर पडावे. आपले देवघर नेहमी स्वच्छ असावी, यामुळे पूजा करताना ही प्रसन्न वाटते व आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते.
त्या बरोबरच स्वयंपाक करताना सर्वांत आधीची पोळी असेल की, गाईसाठी काढून ठेवावी यामुळे घरात बरकत येते व अन्नधान्याची कमतरता भासत नाही. स्नान झाल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे.
यामुळे आपला मान सन्मान वाढतो. आपल्या जीवनात ऊर्जा निर्माण होते त्या बरोबरच आपल्या डोळ्याचा दृष्टिदोष ही निघून जातो. सकाळी उठल्यानंतर लगेचच देवाची भजने किंवा गाणी लावावीत व ती ऐकता ऐकता आपली कामे करावेत म्हणजे आपल्या तोंडात भगवताचे नामस्मरण येत राहील..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments