नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, गुरुपुष्यामृत योग केंद्रानुसार सेवा।जे नशिबात नाही तेही मिळेल, बक्कळ पैसा मिळेल..
हिंदू धर्म हा अत्यंत पुरातन आणि सनातनी धर्म मानला जातो. तसेच हिंदू धर्मात देवघराला फार महत्त्व दिले जाते, त्याचबरोबर घर लहान असो की मोठे परंतु प्रत्येक ठिकाणी देवघराची स्थापना केली जाते.
कारण संपूर्ण घरातील एक अशी जागा असते, जिथे सर्वात जास्त सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. काही व्यक्ती देव घर बनवताना काही चुका करतात किंवा देवघरात काही चुकीच्या वस्तू ठेवून देतात,
पण यामुळे आपल्या संपूर्ण जीवनावर नकारात्मक प्रभाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे देवघर नेहमी वास्तुशास्त्राप्रमाणे बनवावे.
त्यामुळे देवघरात संबंधित काही महत्त्वाचे नियम हिंदू शास्त्रामध्ये सांगितले आहेत. यामुळे जेव्हा तुम्ही घरात देवघर बनवाल, तेव्हा या गोष्टी लक्षात घेऊन आपण देवघर बनवले पाहिजे.
तसेच या शास्त्रानुसार आपण नेहमी देवघरात पांढरा किंवा पिवळा मार्बल असलेली फरशी बसवणे शुभ मानले जाते. याशिवाय आपले देवघरात शक्यतो लाकडाचे किंवा पांढऱ्या मार्बलचे असावे.
तसेच स्टील किंवा लोखंडाचे देवघर कधीच बनवून नये. तसेच देवघराच्या भिंतींना हलका नारंगी किंवा केसरिया, भगवा रंग लावला पाहिजे. याशिवाय आपल्या देवघरात अभिमंत्रित श्रीयंत्र नक्की ठेवले पाहिजे, हे श्रीयंत्र ठेवताना त्याची स्थिती योग्य असणे अत्यंत आवश्यक आहे.
कारण या श्रीयंत्राने घरात सकारात्मकता आणि श्रीचा वास असतो. तसेच आपल्या देवघरात देवघर साफ करण्यासाठी एक छोटा झाडू ठेवावा. देवघरात बसायला देवआसन नक्की असावे,
हे आसन आपल्याला कोणत्याही पूजेच्या दुकानात उपलब्ध होईल. तसेच देवघरात रोज नित्यनेमाने तेलाचा किंवा तुपाचा दिवा जरूर लावाला पाहिजे. देवघरात रोज एक सुगंधी अगरबत्ती आणि उदबत्ती नक्की लावाली पाहिजे.
याशिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे, देवघरात एकाच देवतेचा एकापेक्षा जास्त मूर्ती ठेवू नये, देवांचे आसन नेहमीच आपल्या आसनापेक्षा उंच असावे. देवघरात वरून कलश आपल्या कुलस्वामिनीच्या नावाने स्थापन करावा.
तसेच आपल्या देवघरात गणपती, अन्नपूर्णा व बाळकृष्ण तसेच श्रीयंत्र आणि आपल्या गुरूंची मूर्ती असावी. याउलट देवघरात जिवंत गुरूंची मूर्ती तसेच फोटो लावू नये. याशिवाय देवघरात मृत व्यक्तींचे फोटो, ठेवू नयेत,
देवघरात रोज कापूर जाळून, किमान एक मंत्राचा जप करावा. मग नंतर घंटा नक्की वाजवावी. आपल्या देवघरातील मुर्ती कधीच एका विटेपेक्षा जास्त उंच नसावी. तसेच देवघरात झोपणे टाळावे.
देवघरात देवाला सणावारी आपण जेवण करतो ती नैवेद्य म्हणून दाखवावे. याशिवाय देवघरात पूजा करतेवेळी भांडणे, ओरडणे किंवा अपशब्द बोलणे या गोष्टी टाळल्या पाहिजेत.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments