नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,श्री स्वामी समर्थ महाराजां हे श्री गुरुदेव दत्त याचे तिसरे रूप मानले जाते. तसेच स्वामींचीही महिमा खूप आहे,त्यामुळे आपण स्वामींच्या आवडत्या वस्तु आपल्या घरात ठेवल्या पाहिजेत.
त्या त्यांच्या आवडत्या वस्तु आपण आपल्या घरात ठेवल्यातर आपल्याला आर्थिक लाभ होईल तसेच सुख-समाधान मिळते.
श्री स्वामी समर्थ, स्वामी महाराज बोलतात मनाप्रमाणे घडत नाही म्हणून चिंता नसावी. कधी कधी मानवाची निर्णय चुकतात परंतु स्वामींचे निर्णय कधी चुकत नाही, म्हणून स्वामी महाराज म्हणतात ” भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे”.
जेव्हा आपण स्वामींच्या सानिध्यात येतो तेव्हा आपले निर्णय हे स्वामीची घेत असतात आणि मग ती कधी चुकीचे निर्णय नसतात. चुकीचे आपले विचार असतात पण मित्रांनो चांगले विचार करा.
स्वामींवर आणि स्वामींच्या सेवेवर विश्वास ठेवा सर्व काही स्वामी व्यवस्थित, सुरळीत आणि चांगलं करतील, जे सदैव आपल्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.त्यामुळे श्री स्वामी समर्थांची सेवा केली की, अनुभव येतात.
परंतु ती सेवा पूर्ण मनोभावाने श्रद्धेने आणि श्री स्वामी समर्थांवर विश्वास ठेवून केली, तर मग एका दिवसात, पाच दिवसात किंवा दहा दिवसात तसेच एका महिन्यात अनुभव नक्की येतात.
कारण श्री स्वामींची शक्ती ही महान आणि चमत्कारिक आहे. तुम्हाला सुद्धा श्री स्वामी समर्थांची शक्ती बघायचे असेल, त्यांची कृपा मिळवायचे असेल, त्यांना प्रसन्न करायचे असेल.
तुमच्या इच्छा पूर्ण करायचे असेल, तर तुम्ही सुद्धा श्री स्वामींची सेवा एकदा नक्की केली पाहिजे. याचबरोबर ही सेवा तुम्हाला तीन महिने करायची आहे, जर मध्ये काहीतरी समस्या आली, तर तुम्ही सेवा 1-2 दिवस चार पाच दिवस टाळू शकता, परंतु तीन महिने चुकता सेवा करायची आहे.
यामध्ये तुम्हाला फक्त दोन गोष्टी करायचे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे श्री स्वामी समर्थ यांच्या नामाचा मंत्र जप करायचा आहे आणि तोही 11 माळी करायचा आहे, तुम्हाला श्री स्वामी समर्थ यांचा नामाचा जप करायचा आहे.
मग जप झाल्यानंतर तुम्हाला “श्री स्वामी चरित्र सारामृत” या पारायणाचे या ग्रंथाचे क्रमशा 3 अध्याय रोज वाचायला आणि 3 महिन्यापर्यंत रोज 3-3 अध्याय वाचायचे आहेत.
असे एकूण 21 अध्याय असतात,7 दिवसात 3 अध्याय वाचले तर 7 दिवसांत ते पूर्ण होतात. पण 8 दिवसापासून पुन्हा नवीन 3-3 अध्याय सुरू करावे असे तुम्हाला 3 महिने ही सेवा करायची आहे.
मग 3 महिन्यानंतर स्वामी फक्त तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि श्री स्वामींचे शक्ती,श्री स्वामींचा अनुभव प्रचिती तुमच्या डोळ्यासमोर असेल,मात्र फक्त पूर्ण मनोभावाने श्री स्वामींवर विश्वास ठेवून ही सेवा अवश्य करा.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments