नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, प्रत्येकजण रंगांचा सण होळीची वाट पाहत आहे. देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा होळी 8 मार्चला तर धुलीवंदन 7 मार्चला होणार आहे. होलिका दहन फाल्गुन पौर्णिमेच्या संध्याकाळी केले जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे चैत्र प्रतिपदेला होळी खेळली जाते.
धुलीवंदन हे प्रदोष काळात फाल्गुन पौर्णिमेला होते. अशा स्थितीत यंदा होलिका दहन मंगळवार, 7 मार्च रोजी आहे. होळीचा सण होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाईल.
अशा परिस्थितीत यंदा होळीचा सण बुधवार, 8 मार्च रोजी साजरा होणार आहे. चैत्र कृष्ण प्रतिपदा तिथी 8 मार्च रोजी सायंकाळी 7.42 पर्यंत आहे.
पारंपारिक होळीचा सण साजरा करण्यासाठी गोवऱ्या आणि टीमक्या तसेच पूजा साहित्याने बाजारपेठ गजबजून जातात. घराच्या अंगणात किंवा चौकात एक मोठी होळी उभी करून सर्वजण या होळीची पूजा करतात. होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात आणि संध्याकाळ झाली की, होळी पेटवतात.
कारण वाईट वृत्ती अमंगल आणि नकारात्मक गोष्टी होळीच्या अग्नीमध्ये नष्ट व्हाव्यात असा त्यांचा उद्देश असतो.
अनेक ठिकाणी होळीचे दहन करताना त्यात 7 प्रकारची धान्ये आणि गव्हाच्या ओंब्या टाकल्या जातात. आपल्या शेतातील नवीन पीक अग्नी देवतेला अर्पण करणे, हा त्यामागचा हेतू असतो.
तसेच घरात सुख शांती समाधान नांदावे यासाठी देखील होळीत गव्हाच्या ओंब्या टाकल्या जातात. गव्हाच्या ओंब्या देवाला अर्पण केल्यास आपल्याला पूर्वजाचा आशीर्वाद मिळतो, अशी मान्यता आहे.
तसेच होळीच्या अग्नीत गव्हाच्या 7 ओब्या अर्पण करण्याची प्रथा आहे, कारण 7 हा अंक शुभ मानला जातो आणि सर्वच कार्यामध्ये 7 अंकाला खूपच महत्व आहे. भारतामधील शेतकरीवर्गात होळीच्या सणाला खास महत्त्व दिले जाते आणि इतिहास पाहिला तर या सणाचे आणि कृष्ण बलराम यांचे नाते दिसते.
होळीच्या दोन्ही देवतांचे स्मरण आणि पूजा केली जाते. या दिवशी हाताशी आलेल्या पिकाबद्दल देवाला धन्यवाद देण्याची आणि प्रार्थना करण्याची प्रथा आहे.
होळीनंतर दुसऱ्या दिवशी गव्हाच्या ओंब्या भाजण्याची परंपरा आहे. नवीन आलेली पिकं या दिवशी अग्नी देवतेला अर्पण करण्याची ही परंपरा आहे. याचबरोबर एका पौराणिक कथेनुसारभगवान विष्णू याचा भक्त प्रल्हाद यांला मारण्यासाठी हिरण्या कश्यपूणे होलिकेला सांगितले.
कारण होलिकेला वर होता की तिला अग्नी जाळू शकणार नाही. पण प्रल्हादाला जाळण्यासाठी तिने प्रल्हादाला आपल्या मांडीवर घेऊन अग्निकुंडात प्रवेश केला.
मात्र भगवान विष्णूच्या कृपेने भक्त प्रल्हाद तर वाचला, परंतु होलिकेचे दहन झाले, अशी आख्यायिका प्रचलित आहे. अशाच प्रकारे हिंदूंच्या इतर सणासारखे होलिका दहन हेदेखील वाईटावर चांगल्याचा विजय मिळवण्याचे प्रतिक आहे.कारण वाईट गोष्टीवर विजय मिळवणें हाच या सणाचा हेतू आहे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments