नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, आपल्या देवघरात या अत्यंत पवित्र वस्तू।असायलाच हव्यात! याशिवाय देव्हारा अपूर्णच..
देवघर म्हणजे अशी जागा जी घरातील पावित्र्य राखण्यात मदत करते. घरात देवघराला अत्यंत महत्त्व आहे कारण ही जागा अशी आहे जिथे पूजा केल्याने आपल्या मनाला शांती प्राप्ती होते.
तसेच शरीरात सकारात्मकता ऊर्जा निर्माण होत असते.ही जागा अशी असते, जिथे आपण मनमोकळेपणाने देवाशी संवाद साधतो, आपल्या चुका स्वीकारतो आणि त्याची माफी देखील मागतो.
परंतू हे सर्व करताना त्याचा शत- प्रतिशत लाभ व्हावा यासाठी योग्य ठिकाणी देवघर असणे अत्यंत आवश्यक आहे.
प्रत्येकाच्या देवघरात एक पाण्याने भरलेला तांब्याची आपण रोज पूजा करत असतो.हा तांब्याच्या धातूपासून बनलेला तांब्या आपल्या देवघरामध्ये ठेवायला हवा.कारण प्रत्येक देवघरात एक तांब्याचा तांब्या आणि एक तांब्याचे ताट असणे गरजेचे आहे.
कारण देवपूजा करताना हा तांब्या भरून ठेवत असतो,तसेच याचा पाण्याने दुसऱ्या दिवशी आपण तांब्याच्या ताटात देवांना आंघोळ घालत असतो किंवा धुत असतो.त्यामध्ये असे म्हणतात की,
हा तांब्याचा धातू हा सूक्ष्म कीटकबरोबर आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जेला सुद्धा नष्ट करत असतो.त्यामुळे आपल्या घरात आणि देवघरात सकारात्मक विचार आणि ऊर्जा निर्माण होत असते.या मागील महत्वाचे कारण हे तांब्याचे धातू असतात.
अशा या तांब्याच्या भांड्याचा आपण देव स्वच्छ धुवत असतो. त्यावेळी ते स्वच्छ निघतात.मग आपली देव पूजा करून झाल्यानंतर पुन्हा हा तांब्याच्या धातूचा तांब्या पूर्णपणे भरून देवघरात ठेवायचे आहे.
मग दुसऱ्या दिवशी याच पाण्याचा वापर आपण संपूर्ण घरामध्ये तसेच घराच्या प्रत्येक कोपऱ्यात पाणी शिंपडायाचे आहे.
यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन, संपूर्ण घरात सकारात्मक ऊर्जा पसरण्यास मदत होते. याशिवाय त्या घरांमध्ये नेहमी आनंदी आणि चैतन्यपूर्ण वातावरण निर्माण होत असते.
या घरातील लोक हे सुखी आणि समाधानी असतात. व्यवसाय किंवा उद्योगात चांगल्या प्रकारे यश मिळू लागते.तसेच ज्या घरातील लोक शांती आणि समाधान असतात, त्या घरावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो.यासह या घरावर धनाची पैशाची प्राप्ती त्यांना चांगल्या प्रकारे होत असते.
त्यामुळे देवपूजा करताना ह्या ताब्यातल्या पाण्यानेच आपण देव धुवून पूजले तर अशा प्रकारे हा तांबे आपल्या जीवनामध्ये मोठे बदल घडवू शकतो.तसेच आपल्या घरातील सर्व प्रकारच्या दोष किंवा वास्तुदोष दूर करण्याचे काम, हा तांब्या करीत असतो.
त्यामुळे देवपूजा करताना आपली घरात हा तांब्याचा तांब्या आणि तांब्याचे भांडे असणे आवश्यक आहे.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.
Recent Comments