नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, रोज सकाळी लवकर उठून स्वामींसमोर बसून हा एक मंत्र बोला..
श्री स्वामी समर्थ ! स्वामी सेवेत ही एक चूक कधीच करू नका , सेवेचा लाभ, सेवेच फळ तुम्हाला मिळणार नाही, मग तुम्ही कितीही सेवा केली , कितीही मंत्र जप केला, कितीही पारायण वाचन केले किंवा कितीही स्वामीच्या समोर बसला तरी त्याचा लाभ तुम्हाला मिळणार नाही.
एक चूक तुम्ही कधीच करू नका, काही लोक सकाळी सेवा करतात, दुपारी करतात, संध्याकाळी करतात जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही तेव्हा करता, ही सेवा घरात करतात, मठात करतात, तुम्ही कितीही सेवा करा, अर्धा तास, एक तास, दोन मिनिट , 5 मिनिट केली तरी चालेल पण चूक कधीच करू नका.
ही चूक आपल्याकडून तेव्हाच होते जेव्हा आपण देवघरा समोर बसतो, स्वामींच्या मूर्ती- स्वामी च्या फोटो समोर बसतो आणि चुक कोणती आहे तर बऱ्याच वेळेस जे भक्त असतात, सेवेकरी असतात ते स्वामींच्या समोर म्हणजे देवघरा समोर आहे त्या अवस्थेत जाऊन बसतात,
त्यांना स्वामींचा मंत्र जप करायचा असतो, किंवा काही वाचन करायचं असतं, तेव्हा ते कुठूनही बाहेरून येतात किंवा काहीही घरात करत असतात, जेवण करत असतात किंवा काही काम करत असतात.
तेव्हा त्यांना वाटतं की त्याला आता मंत्र जप करून काहीतरी वाचन करू , पारायण करू, स्तोत्र वाचन करू, स्वामींसमोर बसून संध्याकाळी, सकाळी, दुपारी तेव्हा ते डायरेक्ट जाऊन स्वामी समोर बसतात, दिवा – अगरबत्ती लावतात आणि मंत्र जप सुरू करतात.
त्यांची सेवा असते ती मनोभावाने ते करत असतात परंतु हीच त्यांच्याकडून सगळ्यात मोठी चूक होते की ते डायरेक्ट जाऊन बसतात, पण असं कधीच करू नका, तुम्हाला जेंव्हा केव्हाही स्वामी समोर बसायचे आहे.
देवघरासमोर बसायचे आहे तर तुम्हाला आधी पवित्र व्हावे लागेल आणि पवित्र आपण तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही सगळ्यात आधी हात पाय तोंड स्वच्छ धुऊन त्यानंतरच तुम्ही देवघरासमोर बसा. स्वामींच्या समोर बसा .
तुम्ही थोड्या वेळासाठी जरी बसलात तरी स्वामी सेवेचे नियम पाळूनच सेवा करावी. स्वामी समोर बसायचे असेल तर पुन्हा जाऊन तुम्ही हात पाय तोंड धुवा आणि मगच स्वामींच्या समोर बसा.
जर तुम्ही घरीच आहात, कुठे केला नाहीत तरी तुम्हाला हात पाय स्वच्छ धुवावेत, हा नियम स्वतःला लावून घ्यायचा आहे, तुम्हाला शुद्ध पवित्र होऊन स्वामींसमोर बसायचे आहे , पवित्र मनाने , स्वच्छ अंतकरणाने प्रार्थना करा यामुळे तुमचं मन पूर्णपणे शांत होईल.
स्वच्छतेने तुमचं मन अधिक प्रसन्न व एकाग्र राहते, सर्व मलिनता निघून जाते, नकारात्मक ऊर्जा निघून जाते, सर्वत्र सकारात्मक ऊर्जा भरल्याने तुमचं शरीर शुद्ध होते व मन सात्विक होते.
अशी स्वामिसेवा नक्कीच फळाला येते, यामुळे स्वामींची भक्ती दृढ होईल, स्वामी प्रसन्न होतील, स्वामींचे आशीर्वाद सदैव पाठीशी राहतील. त्यामुळे तुमचं जीवन नक्कीच सफल होईल, या काही छोट्या आळशी बनवणाऱ्या चुका असतात त्या आपल्याला भक्तीच्या फळापासून वंचीत ठेवत असतात.
त्यामुळे या चुका स्वामींची सेवा करणाऱ्यांनी नक्की लक्षात ठेवून टाळाव्यात.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments