नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, आपल्या पृथ्वीवर अनेक असे जीव आहेत जे आपल्या संरक्षणासाठी चावतात. निसर्गानेच त्यांना अशा प्रकारे बनवले आहे की आपल्या छोटे असण्यामुळे आणि इतर प्राणी पक्ष्यांचे भक्ष्य बनू नये म्हणून ते असे करतात.
माणसाचा अनेकदा त्यांना अपाय करण्याचा प्रयत्न नसतो पण तरीदेखील तो यांच्या दंशला बळी पडतो. अनेकदा तर हे इतके घातक ठरतात की एखाद्याचा जीव देखील जाण्याचं संभव असतो,
विंचू माहिती नाही असा एकही माणूस महाराष्ट्रात सापडणार नाही तसेच विंचू चावलेला नाही असे एकही घर कदाचित ग्रामीण महाराष्ट्रात सापडणार नाही, शहराची गोष्ट वेगळी.
विंचू म्हटले की आपली नांगी उभी करून एखाद्याला ती मारण्यासाठी तयार असलेल्या विंचवाचे चित्रा उभे राहील. हा विंचू साधारणपाने दमट आणि अंधार्या जागी असतो. याचमुळे कोकणातले आणि घाटावरचे विंचू त्यांच्या चाव्यासाठी कुप्रसिद्ध आहेत.
आज आम्ही तुम्हाला विंचू चावल्यानंतर ज्या वेदना होतात, किंवा आपल्या शरीरामध्ये मुंग्या आल्या सारख्या वाटत असतील. तर या वेदना संपुष्टात आणण्यासाठी म्हणजे त्यांचे विष उतरवण्यासाठी उपाय सांगणार आहोत व
तो उपाय केल्याने तुम्हाला त्या वेदनांनपासून नक्की आराम मिळेल, तर चला या विषयी अधिक माहिती जाणून घेऊ. प्रथम विंचू चावल्यावर काय होते ? ते जाणून घेऊया…
एखाद्या वेळी एखाद्या ठिकाणी तुम्ही जाता आणि अडचणीच्या ठिकाणी हात घालता आणि मग अचानक खूप वेदांनांनी हात मागे घेता. वेदना इतक्या भयानक असतात की आपल्याला लगेच कळते आपल्याला विंचू चावला आहे.
अर्थात जर तुम्ही डॉक्टरांकडे पोहचू शकत असाल तर पहिल्यांदा ते करावे. केवळ घरगुती उपायावर अवलंबून राहू नये. प्रथमोपचार म्हणून तुम्ही याचा नक्की उपयोग करू शकता.
तसे तर शहरांमध्ये विंचू चावण्याचे प्रमाण कमी असले तरी दमट, अंधाऱ्या जागी गोठ्यांजवळ विंचू असू शकतात. अशा ठिकाणी वावरताना तसेच शेतात काम करताना अपघाताने विंचू चावू शकतो.
विंचू चावतो तो तोंडाने नव्हे, तर त्याला एक नांगी असते. ती पोकळ असून त्यात विषाने भरलेली नळी असते. या नांगीने जखम होऊन त्यातून विष आपल्या शरीरात सोडले जाते. विंचवाचे विष सापाहून विषारी असते.
परंतु त्याचे प्रमाण कमी असल्याने सापाच्या विषाप्रमाणे त्याचे परिणाम दिसत नाहीत. विंचू चावल्यावर चावलेल्या जागी खूप आग होते. ती जागा लाल होते. काही वेळेस डोके दुखणे, चक्कर, मळमळ होणे, खूप घाम येणे, हातापायाला पेटके येणे, बेशुद्ध होणे अशी लक्षणे दिसून येतात.
विंचू चावल्यानंतर त्याचे विष उतरवण्यासाठीचा पहिला उपाय म्हणजे ‘चिंचुके होय. जी चिंच असते व त्या चिंचेमधील जो बी असतो त्याला चिंचुके म्हणतात. या चिंचुकेचे वरील जे टरफल ते काढून टाकायचे
आणि ते काढल्यानंतर जो पांढरा भाग आपल्याला दिसतो, तो दगडावरती चांगल्या प्रकारे घासून ज्या ठिकाणी विंचू चावला आहे. त्या ठिकाणी हा घासलेला पांढरा भाग धरून ठेवायचा.
आणि जोपर्यंत आपल्याला थोडे बरे वाटत नाही तोपर्यंत तो चिचुका तसाच धरून ठेवायचा. दुसरा उपाय आहे ‘तुरटी’, तर आपल्याला चिंचुके सापडले नाही तर तुम्ही तुरटी देखील वापरू शकता.
तुरटीचा खडा घेऊन ती गॅसवरती किंवा मेणबत्तीवरती धरून ठेवायचा जेणे करून तुरटी पाघळू लागेल. आणि तुरटी वितळू लागली की ज्या ठिकाणी विंचू चावला असेल त्या ठिकाणी ही तुरटी धरून ठेवायची आणि ही तुरटी त्या भागाला चिटकून बसेल,
नंतर जो पर्यंत त्या विंचवाचे विष निघून जात नाही, तोपर्यंत ही तुरटी तशीच धरून ठेवायची. ज्यावेळी सर्व विष उतरून जाईल त्यावेळी आपोआप तुरटी खाली पडणार.
मात्र काही वेळा मोठा विंचू म्हणजे इंगळी चावल्यास, त्या ठिकाणावर काळे निळे व्हायला सुरुवात होते
आणि याच ठिकाणावरुण पसरायला सुरुवात होते. आजच्या लेखामधे आपण माहिती जाणून घेणार आहोत, मग अशा वेळी आपण पुढील उपचार करायला पाहिजेत. ज्या व्यक्तिला विंचू चावला आहे .
त्याच्या पोटामधे खळबळ होण्यास सुरुवात होते. अनेकदा डोळ्यापुढे अंधारी यायला लागते.काही लोकांना विंचू चावल्यावर चक्कर देखील येण्याची शक्यता असते. हातापायाला गोळे यायला लागलेत असा भास देखील होतो.
विंचवानुसार त्याच्या चावण्याचापरिणाम असतो, कोकणातील विंचू अत्यंत वि.षारी कुप्रसिद्ध आहेत. तरीही कोणत्याही विंचवाचा धोका असतोच. मोठ्या विंचूला इंगळी असे म्हणतात. आता उपायावर येऊया, चावलेले शरीरामध्ये पसरत गेल्यास अनेक प्रकारचा धोका होऊ शकतो.
यासाठी तिसरा घरगुती उपाय तुम्ही करू शकता. उंबराच्या झाडाची दोन पाने घ्यावी आणि पानांना चांगले धुवून जिथे विंचू चावला त्या ठिकाणी बांधावे.
याशिवाय जर खूप जास्त त्रास होत असेल तर बोरच्या पानांची चांगली पेस्ट करून विंचू चावला तिथे लावावी. यामुळे वेदना फार कमी होतात..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments