नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, हरितालिका व्रत करणे ज्यांना शक्य नाही त्यांनी फक्तं 1 काम करा, संपूर्ण व्रत केल्याचे पुण्य मिळेल..
हिंदू धर्मात हरतालिका हे भाद्रपद महिन्यात सर्वांत महत्त्वाचे व्रत मानले जाते. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला हरतालिका व्रत केलं जातं. असे मानले जाते की, स्त्रिया अखंड सौभाग्य
आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी हा उपवास करतात. हा उपवास सर्व उपवासामध्ये सर्वात कठीण परंतु श्रेष्ठ मानला गेला आहे.
या दिवशी कडक उपोषण करुन पाणीही पिऊ नये अशी रुढी आहे. या दिवशी मुली व सुवासिनी शिवलिंगे स्थापित करुन भक्तिपूर्वक पूजा करतात. अविवाहित मुली योग्य वर मिळवण्यासाठी हरतालिका व्रत ठेवतात.
तसेच विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे पूजन करतात ,सौभाग्य चांगले राहू म्हणून पूजन करतात.यासाठी विवाहित महिला आणि कुमारिका मुली या दिवशी हरतालिकाचे पूजन करीत असतात.
मात्र हे हरतालिकाचे पूजन योग्य मुहूर्तावर करणे आवश्यक आहे, कारण त्यामुळे आपल्याला कृपाशीर्वादा जलद गतीने प्राप्त होण्यास मदत होते.त्यामुळे हरतालिकाचे पूजन एका शुभ वेळेत म्हणजेच एका शुभ मुहूर्तामध्ये झाल्यास,
त्याचा आपल्याला दुप्पट-तिप्पट प्रकारे लाभ मिळत असतो, म्हणून महिलांनी किंवा मुलींनी हे पूजन ही पूजा हरतालिकाची पूजा शुभमुहूर्ता मध्येच केली गेली पाहिजे.
हिंदु पंचांगानुसार, काही हरतालिकाचे शुभ मुहूर्त सांगितले आहेत,ते मुहूर्त अत्यंत फलदायी मानले जात आहेत. तरी तुम्ही या शुभ वेळेतच हरतालिकाचे पूजन केले पाहिजे. जर तुम्ही हरतालिकाचे पूजन 18 सप्टेंबर सोमवारच्या दिवशी सकाळी करणार असाल,
तर हरतालिकाची पूजा करण्याची शुभ वेळ हा सकाळी 6 वाजून 3 मिनिटांनी सुरू होणार आहे ,ते सकाळी 8 वाजून 33 मिनिटांनी पर्यंत असणार आहेत.त्यामुळे तुम्हाला पूजेसाठी मिळणारा एकूण वेळ हा 2 तास 30 मिनिटांचा असणार आहेत.
याशिवाय जर तुम्ही हे पूजन प्रदोष काळात करणार असल्यास, तर या प्रदोष काळाची शुभ वेळ ही, संध्याकाळी 6 वाजून 33 मिनिटांनी पासून सुरू होईल, ते रात्री 08:51 पर्यंत असणार आहेत.हिंदु शास्त्रानुसार ही प्रदोष काळाची वेळ अत्यंत शुभ मानली जाते.
प्रदोष काळ संध्याकाळी 6.33 मिनिटांनी सुरू होऊन, तो 8:51 मिनिटांनी संपणार आहे. तर यावेळी सुद्धा तुम्ही पूजन करू शकतात किंवा सकाळी सुद्धा तुम्ही पूजन करू शकतात. या दोन शुभ मुहूर्तावर पुजा केल्यास, नक्की तुम्हाला लाभ होईल.
हे हरतालिकाचे व्रत केल्यामुळे, पतीला दीर्घायुष्य लाभते.तसेच असे सांगितले जाते की, हे व्रत केल्याने एखाद्याला योग्य वर मिळण्यास मदत होते. या उपवासाच्या प्रभावाने संतांप्राप्ती होते, म्हणून महिलांनी हरतालिकेच्या दिवशी व्रत अवश्य करावे आणि पूजन अवश्य करावे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments