नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, लक्ष्मीपूजन पुजाविधी, शुभ वेळ उपाय आणि नियम…
दिव्याचा सण म्हणजे दिवाळी होय. धनाची देवी लक्ष्मीच्या आगमनाचा दिवस म्हणजे दिवाळी होय. समुद्रमंथनाच्या वेळी जेव्हा माता लक्ष्मी प्रगट झाली तो दिवस म्हणजे दिवाळीचा दिवस होय.
याशिवाय, भगवान श्रीराम जेव्हा वनवासातून परत आले तो दिवस म्हणजे दिवाळीचा दिवस. लक्ष्मी समुद्रमंथनातून प्रगट झाली त्याच्या दोन दिवसांपूर्वी म्हणजेच दोन दिवस अगोदर समुद्रमंथनातून धन्वंतरी देव प्रगट झाले हो,
ते त्याहातात अमृताचा कलश होता त्यामुळे या दिवशी भांडी खरेदी करण्याचे विधान आहे.
या चांगले आरोग्य आणि त्यासाठी आपण या दिवसापासूनच काही उपाय करायचे आहे. आपल्याला काही विशेष उपाय करायचे आहेत ज्यामुळे महालक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करून आणि घरात स्थायी निवास करेल.
अश्या काही गोष्टी आहेत असे जे आपण दिवाळीच्या दिवसांमध्ये दररोज करायला हवे.
याशिवाय आपल्या घरात जर काही वास्तुदोष असेल, तर तो वास्तुदोष दूर करण्यासाठी देखील आपण तुळशीचा वापर करू शकतो. हिंदू धर्मातील शास्त्रानुसार,जर दररोज आपण तुळशीच्या झाडाला जल अर्पण केल्यास,
या तुळशीचे पूजन केलं तर आपल्या घरात सुख-समृद्धी नांदते आणि आपली आर्थिक स्थिती देखील चांगली राहते. तसेच तुळस ही आरोग्यासाठी तर उत्तम आहेच. त्याचबरोबर तुळशीमुळे घरात भरभराटी देखील येते.
तुळस ही इतकी पवित्र आहे की, जेव्हा ग्रहण असल्यास त्या दिवशी अन्न शुद्ध राहण्यासाठी यामध्ये तुळशीपत्र ठेवले जातात, यामुळे ग्रहणाचा प्रभाव या जेवणावर किंवा पदार्थांवर पडत नाही आणि जेव्हा आपण श्री विष्णूंना नैवेद्य दाखवतात त्यामध्ये तुळशीचा पाला त्या नैवेद्यावर ठेवलं जातं.
याशिवाय मृत्युनंतर देखील मृतकाच्या मुखात तुळशीचे पान ठेवल्याने, त्या व्यक्तीला मोक्षाची प्राप्ती होते असं मानलं जातं. याशिवाय आपण या तुळशीचा पानाचा वापर आपण आपल्या यशप्राप्तीसाठी किंवा प्रचंड धनप्राप्तीसाठी
आणि आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी करू शकतो. यामध्ये प्रामुख्याने जर खूप प्रयत्न सुध्दा तुम्हाला व्यवसाय किंवा नोकरी मनाप्रमाणे यश मिळत असेल, तर आपण आज उपाय तुम्हाला गुरूवारच्या दिवशी करायचे आहे.
तसेच तुम्ही हा उपाय गुरुवारी करू शकता किंवा या दिवशी शक्य नसल्यास,तर इतर कोणत्याही शुभ दिवसाला देखील तुम्ही उपाय करू शकता.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला श्याम तुळस लागणार आहे. प्रामुख्याने दोन प्रकारच्या तुळशी असतात,त्यामध्ये काळ्या रंगाचे तुळशीला श्याम तुळस असे म्हणतात. तर या तुळशीचा आपल्याला या उपायासाठी वापर करायचा आहे.
मात्र लक्षात ठेवा की, रविवारी आणि एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र तोडू नये. त्यामुळे जर तुम्हाला एकादशीच्या दिवशी किंवा इतर कोणत्याही शुभ दिवशी हा उपाय करायचा असेल, तर एक दिवस आधीच तुळशीपत्र तोडायचे आहेत.
तुम्हाला हा उपाय करायचा आहे, त्या दिवशी सकाळी लवकर उठून सर्व कामे पूर्ण करून झाल्यानंतर, आपल्याला 5 तुळशीपत्र तोडायचे आहेत आणि ती 5 तुळशी पत्र आपण तोडताना “ओम नमो भगवते वासुदेवाय” या ममंत्राचा जप करायचा आहे.
मग तोडून झाल्यानंतर, आपल्याला हे तुळशीपत्र घेऊन देवघरासमोर बसायचा आहे आणि हेच तुळशीपत्र आपल्याला माता लक्ष्मी चरण जवळ ठेवायचे आहेत. माता लक्ष्मीला आपल्या मनातील जी काही इच्छा आहे
किंवा जी काही आपल्या समस्या आहेत, तेबोलायचे आहेत, त्यांचे निवारण होण्यासाठी माता लक्ष्मीजवळ आपल्याला प्रार्थना करायचे आहे आणि त्यानंतर ही तुळशीपत्र आपल्याला एका पिवळ्या रंगाच्या सुती वस्त्र बांधायचे आहेत.
मग त्यानंतर ही पुरचुंडी आपल्याला आपल्या घरातील तिजोरी ठेवायचे आहे.तसेच ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या दाग-दागिने किंवा मौल्यवान वस्तू ठेवता,
त्या ठिकाणी आपल्याला हेच तुळशीपत्र ठेवून द्यायचे. हा उपाय केल्याने तुमच्या व्यवसायात किंवा नोकरीत निश्चितच प्रगती होईल…
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments