नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, आषाढी एकादशीला तुळशीपुढे बोला हे 2 शब्द इच्छा, मनोकामना चटकन पूर्ण होईल..
आपल्या हिंदु धर्मात तुळशीला खूप महत्त्वाचे स्थान आहे. कारण हिंदू धर्मातील काही धर्म ग्रंथामध्ये माता तुळशीची देवाबरोबर तुलना जाते.याशिवाय आयुर्वेदिक प्रमाणे तसेच विज्ञानामध्ये ही माता तुळशीचे महत्त्व सांगितले जाते. माता तुळशी आपल्याला ऑक्सिजन पुरवठा करण्याचे कामही करते.
म्हणून तुळशीचे खूप फायदे आपल्याला होत असल्याने ,प्रत्येक व्यक्ती आपल्या अंगणात माता तुळशीची स्थापना करतांना दिसत आहे.याशिवाय आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये तुळशीचे अनेक उपाय सांगितलेले आहेत ,त्यामुळे आपल्या असंख्य रोगांपासून आपण दूर राहू शकतो.
याबरोबरच ,आपल्या जीवनातील कितीतरी बाधापासून सुटका करू शकतो. माता तुळशीतुन कायम आसपासच्या वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण करत असते.तसेच तुळशीच्या आसपास असणाऱ्या व्यक्तींना ही ऊर्जा मिळत असते,
म्हणून दररोज सकाळी स्नानानंतर माता तुळशीला एक तांब्या शुद्ध जल अर्पण करण्याची ,हिंदू धर्मात एक प्रथा आहे.तसेच “ओम नमो भगवते वासुदेवाय” या मंत्राचा जप करता करता,माता तुळशीला 5 किंवा 7 ,आपल्याला शक्य असेल तितक्या प्रदक्षिणा घालाव्यात ,यामुळे ही सकारात्मक ऊर्जा आपल्याला प्राप्त होते.
आपल्या घरात जर काही वाईट किंवा अनिष्ट घटना घडणार असेल तर ,हे संकट माता तुळशीला स्वतःवर घेते आणि आपल्या परिवाराचे संरक्षण करते. आपल्या अंगणातील तुळशीची खूप काळजी घेऊनही,ती वाळत असल्यास,
तर आपल्यावर किंवा आपल्या कुटुंबातील सदस्य बुध ग्रहांची छाया असल्याचे दिसून येते. अशा वेळी ती तुळस काढून तिचे विसर्जन करून दुसरी तुळशीचे रोपटे लावावे.
दररोज रात्री झोपताना आपल्या उशीखाली तुळशीचे चार पाने ठेवून झोपावे किंवा जवळ घेऊन झोपावे.आपण हा प्रभावी उपाय सलग 43 दिवस केल्यास, या उपायाने काही धार्मिक फायदे होत असतात.
यामध्ये प्रामुख्याने जर आपल्याला रात्री व्यवस्थित झोप लागत नसल्यास, या पानांमधून निघणाऱ्या सकारात्मक ऊर्जेमुळे आपल्याला शांत झोप लागेल.
याशिवाय वाईट स्वप्न पडत नाहीत, एखाद्या गोष्टीचे दडपण असेल तर ते भीती व दडपणही नष्ट होईल,तसेच आपले दुर्भाग्य सौभाग्याच बद्दलण्यास मदत होईल.
आपण तुळशीच्या मुळाला घरी आणून, ती मुळ गंगेच्या पाण्याने स्वच्छ करून घ्यावे. मग यानंतर ती मुळी एका पिवळ्या कापडाला बांधून ती पिवळ्या दोऱ्याने आपल्या उजव्या हातात गुरुवारी बांधावी.
ही मुळी अभिमंत्रित करताना “ओम नमो भगवते वासुदेवाय” या मंत्राचा जप करावा, या उपायामुळे जीवनातील सर्व आर्थिक व भौतिक समस्या दूर होतील. कार्य सुरळीत विनाअडथळाची पूर्ण होते.
याचबरोबर आपल्याला कोणाची दृष्ट लागली असेल किंवा आपली तब्येत सतत बिघडत असेल ,व्यवसाय काही समस्या असतील ,तर घरातील कोणत्याही सदस्याला 7 काळी मिरी व सात तुळशीची पानाने आपल्या अंगावरून सात वेळा उतरवायला सांगावे.
हा उतारा करताना ओमचा अखंड जप करावा. त्यानंतर हे काळी मिरीचे दाणे चावून बाहेर टाकावेत व तुळशीची पाने खावावीत.
या उपायामुळे आपल्यावर काही करणीबाधा किंवा तंत्र मंत्रांचा प्रभाव असल्यास, ते सर्व निघून जाईल आणि आपल्या घरात सकारात्मकता ऊर्जा निर्माण होईल. याशिवाय आपल्या मुख्य दाराच्या दोन्ही बाजूला तुळस लावल्यास ,
आपल्या घरात धनाची वाढ होते ,पैसे येण्याचे मार्ग निर्माण होतात. नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.तसेच सकाळ-संध्याकाळ तुळशीपुढे शुद्ध तुपाचा दिवा लावला पाहिजे. यामुळे आपल्यावर देवी लक्ष्मीची कृपादृष्टी राहण्यास मदत होते.
आपल्या किचनच्या खिडकीत तुळशीची कुंडी ठेवल्यास, घरात नेहमी प्रेम व सामंजस्य होण्यास मदत होईल. दररोज घरातील सदस्यांनी तुळशीसमोर तिचे स्मरण करावे. तसेच लहान मुलांना दररोज तुळशीचे पाने खायला दिल्यास ,
त्यांची बुद्धिमत्ता तीव्र होते. पोटासंबंधी सर्व समस्या यामुळे नष्ट होतात. त्या बरोबरच स्वास्थ्य संबंधी फायदा होतो
यासह जर रविवार सोडून कोणत्याही दिवशी घराच्या पूर्वेकडे ठेवलेल्या तुळशीची चार-पाच खायला आपल्या मुलांना दिल्यास, मुलांमधील हट्टीपणा दूर होऊन मुले आपले म्हणणे ऐकतील.
याशिवाय जर मुलीचे लग्न जमत नसल्यास आग्नेय दिशेला तुळशीची कुंडी ठेवून तुळशीला त्या मुलीच दररोज एक तांब्या जल अर्पण करायला सांगावे,यामुळे लवकरच मुलीला योग्य वर मिळेल.
याशिवाय देवी-देवतांची कृपा ही आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर होते. तुळशीची माळ गळ्यात धारण केल्यास, आरोग्याशी संबंधित सर्व समस्या किंवा विकार होणार नाहीत आणि आपल्यावर वाईट दृष्ट शक्तीचा प्रभाव होणार नाही.
दररोज अशी माहिती पोस्ट मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.
Recent Comments