नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, तारक मंत्र ज्या घरात रोज हा मंत्र ऐकला जातो, त्या घरात सुख, शांती व पैसाच पैसा येतो..
श्री स्वामी समर्थ, जर खरोखरच विश्वास केला तर प्रत्येक गोष्ट सोपी वाटते आणि विश्वास नाही केला सोपी गोष्ट सुद्धा कठीण वाटते, म्हणून स्वामींवर विश्वास ठेवावा. जर विश्वास असेल तरच सेवा करावी, तर त्यांना मानावे
आणि त्याची भक्ती करावी आणि विश्वास नसेल, तर काहीही केले नाही तरी चालते. ज्यांच्या स्वामींवर विश्वास आहे त्यांनी आज सांगितलेला उपाय करावा, त्यांना या मंत्राचा जप नक्की करावा आणि अनुभव घ्यावा.
आपल्या सगळ्यांमध्ये आपल्या घरात कोणी ना कोणी सतत आजारी असतेच. त्याला रोग आणि पिढा सतत चालू असते, कोणती ना कोणती व्याधी खूप त्रास देतच असते. ते सगळे उपाय उपचार करून सुद्धा काही होत नाही, त्रास कमी होत नाही,
अशा वेळेस काय करावे. तर अशा वेळेस तर रोगमुक्ती मंत्र तुम्ही बोलावा. जर विश्वास नसेल तर हे काम अजिबात करू नये. याचा असा बिलकुल पण नाही की, तुम्ही डॉक्टरची ट्रिटमेंट घेऊ नका, औषध घेऊ नका.
कारण कधी-कधी काही वेळेला डॉक्टरानी दिलेले औषध आपल्या शरीरावर काम करत नाही. औषध घेऊन सुद्धा आजार बरा होत नाही, म्हणून या मंत्राचा जप आपण करावा.
आपण रोज हा जप केला तर औषधाचे उपयोग आपल्यावर होईल. आपले मन एकाग्र होईल आणि वेदना कमी होतील म्हणून आपल्यावर जो उपचार सुरू आहे तो सुरू असताना त्या मंत्राचा जप करावा.
ते बोलतात ना खूप मेहनत केली तरी देवाची साथ लागते. कारण काही वेळा ठीक होण्यासाठी दवा सोबत दुवा सुद्धा लागते. तसेच या उपायाचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल. तर हा मंत्र तुम्ही सुद्धा नीट ऐका आणि तुम्ही एका कागदावर लिहून ठेवा आणि रोज याचा जप करा. तर तो मंत्र काही असा आहे की,
अकाल मृत्यु हरणम्, सर्व व्याधी विनाशम्, सनम श्री गुरु श्री स्वामी समर्थ, तिर्थ जठरे धार याम यः, तर हा मंत्र फक्त 11 किंवा 21 वेळेस बोलले तरी चालते आणि तुमची शक्ती असेल की तुम्ही 108 वेळेस त्याच्या संपूर्ण एक माळ जप करू शकता तर तुम्ही नक्की करायला हवे,
पण जर जमत नसेल तर 21 किंवा 11 वेळेस बोलले तरी चालते. मग मंत्र बोलताना देवासमोर अगरबत्ती लावावी आणि पाणी ठेवावे. मग त्यानंतर हा मंत्र बोलावा. तसेच मंत्र बोलून झाल्यावर तुम्ही एक वेळेस तारक मंत्र बोलले तर खूप चांगले होईल.
त्यानंतर अगरबत्तीची रक्षा तुम्हीच कपाळी लावा आणि घरातल्या सगळ्यांना लावाव, याचबरोबर ग्लासमध्ये पाणी सगळ्यांनी थोडे थोडे प्यावे, मात्र घरात कोणी खुप आजारी असल्यास तर त्याला सगळे पाणी प्यायला द्यावे.
पण बरेच लोम अगरबत्तीची रक्षा पाण्यात पडून येतात त्यानंतर ते पाणी पितात. पण असं कधीही करू नका, कारण आजकाल अगरबत्ती येतात त्या केमिकलयुक्त असतात म्हणून अगरबत्ती रक्षा पाण्यात टाकून कधी पाणी असच दिलं तरी मंत्राची शक्ती त्या पाण्यात उतरते, म्हणून रक्षा टाकून पाणी प्यायचे नाही.
त्यामुळे रक्षा कपाळावर लावावा आणि मग पाणी तुम्ही पिवू शकता. त या मंत्राचा जप पूर्ण श्रद्धेने आत्मविश्वासाने करा आणि देवाची साथ सोडू नका. ते नक्कीच तुमच्या वेदना, तुमच्या आजार आणि काही समस्या असतील ते दूर करतील..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज याला आताच लाईक करा.
Recent Comments