नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, जर तुम्हाला मुळव्याधीचा त्रास झाला असेल तर हा उपाय तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि परिणामकारक असा ठरणार आहे. मुळव्याध मुळापासून नष्ट करणारा हा उपाय आहे.
आयुष्यामध्ये कधी ना कधी आपल्याला मुळव्याधचा त्रास होत असतो याचे मुख्य कारण म्हणजे वेळेवर न जेवणे,पोट साफ न होणे या मुएक देखील मुळव्याधचा त्रास होऊ शकतो.
जर आपल्या शरीरामध्ये उष्णता मोठ्या प्रमाणावर असेल तर अशा वेळीसुद्धा मुळव्याधाचा त्रास आपल्याला होतो.
याशिवाय जर नियमित आपले पोट व्यवस्थित साफ होत नसल्यास, हे सगळे कारण सुद्धा मुळव्याध होण्यासाठी कारणीभूत ठरत असते.
त्याचबरोबर आपल्या आहारामध्ये फायबरचे प्रमाण कमी असले तर आपली पचनसंस्था व्यवस्थित कार्य करत नाही आणि परिणामी आपले पोट व्यवस्थित साफ होत नाही आणि म्हणूनच आपल्या आहारामध्ये फायबरचे प्रमाण असलेले पदार्थ समाविष्ट करणे अत्यंत गरजेचे आहे.
याशिवाय जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल किंवा वारंवार जुलाब होत असेल तसेच तुमची जीवन व आहारामध्ये काही अनावश्यक बदल झालेले असतील त्याच बरोबर अनेक ठिकाणी वारंवार बसून काम करत असतो किंवा बैठी शैलीमध्ये कामाचे स्वरूप असेल तर अशा प्रकारच्या व्यक्तींना मुळव्याधचा त्रास उद्भवत असतो.
अनेक वेळा पोट कार्य करत नसल्यामुळे सुद्धा आपल्या संडासच्या जागेवर अनेकदा प्रेशर निर्माण होत असतो आणि म्हणूनच अशा वेळी त्या जागेवर गाठ निर्माण होणे किंवा रक्तप्रवाह बाहेर येणे अशा अनेक समस्या उद्भवू लागतात.
ज्या व्यक्तींना मुळव्याधचा त्रास होतो त्या व्यक्तीला प्रचंड प्रमाणामध्ये वेदना सहन कराव्या लागतात अनेकदा तिथे त्याच प्रभावित जागेवर वारंवार खाज सुटू लागते, अनेकदा रक्त गळते, रक्तप्रवाह जास्त झाल्यामुळे व्यक्तीच्या शरीरातील रक्ताची मात्रा कमी होते.
त्यामुळे ही समस्या उद्भवण्याची कारण म्हणजे की आपली जी प्रभावीत जागा असते त्या जागेवरील ज्या नसा असतात त्या फुगीर होतात आणि अशा वेळी त्यांच्यावर प्रेशर निर्माण झाल्यामुळे या सगळ्या वेदना उद्भवू लागतात.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार पिकलेली केळी लागणार आहे. आपल्या सर्वांना केळीचे अनेक फायदे माहिती आहेत तसेच केळी मध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबरचे प्रमाण असते.
केळ्यामध्ये अन्य तंतुमय पदार्थ असतात आणि म्हणूनच अशा वेळी आपले पोट साफ होण्यास मदत होत असते.
हा उपाय करण्यासाठी आपल्या सुरुवातीला एक पिकलेले केळे घ्यायचे आहे आणि त्याचे मधोमध भाग करायचे आहे की असे मधोमध भाग केल्यानंतर आपल्याला तुरटीची पावडर लागणार आहे.
तुरटीला बहुउपयोगी मानले जाते, कारण आपल्या शरीरातील वेदना दूर करण्याचे कार्य सुद्धा तुरटी करत असते आणि म्हणूनच अशा वेळी केळ्याच्या तुकड्यावर तुरटीची पावडर टाकायची आहे व त्यानंतर आपल्याला कात हा तिसरा पदार्थ लागणार आहे.
कारण काताचे आयुर्वेदिक आणि गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरासाठी उपयुक्त ठरतात त्यानंतर आपल्याला केळी अर्धा ते एक तास झाकून ठेवायचे आहे.
काही काळ उलटून गेल्यानंतर आपल्याला सेवन करायचे आहे परंतु केळी सेवन केल्यानंतर आपल्याला कोणते पदार्थ सेवन करायचे नाही. पाणी सुद्धा आपल्याला प्यायचे नाही.
तसेच तुम्हाला कोणत्याही प्रकारचा मुळव्याध असेल तसेच प्रामुख्याने दोन प्रकारचे असतात एक रक्ती मुळव्याध आणि एक साधा मुळव्याध जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा मुळव्याध असेल तर त्या मुळव्याधमध्ये होणाऱ्या वेदना त्यापासून संरक्षण करण्याचे कार्य हा उपाय करणार आहे.
तसेच हा उपाय साधा सोपा आणि त्वरित करता येणारा असल्यामुळे आपल्या शरीरातील अनेक समस्या दूर करण्यासाठी हा उपाय अवश्य करा.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा.
Recent Comments