नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, पंचांगानुसार भगवान श्री कृष्णाची जन्मोत्सव हा भाद्रपद महिन्याच्या अष्टमी तिथीला केला जातो. त्यामुळे हा सण देशभरात ,विशेषतः मथुरा आणि वृंदावन मध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
तसेच या दिवशी निःसंतान जोडपी उपवास करतात. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी विशेष उपाय केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
मात्र यावेळी श्रावणातील सोमवारच्या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमीचा दुर्लभ संयोग आला आहे. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला होता.
हा दिवस संपूर्ण भारत आणि भारताबाहेर देखील मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा करण्याची प्रथा आहे.या सणाला महाराष्ट्रामध्ये गोकुळाष्टमी या नावाने साजरा केला जातो.या दिवशी अनेक जण दिवसभर उपवास करून, रात्री बारा वाजता कृष्णाच्या मूर्तीला स्नान अभिषेक घालून, मूर्ती पाळण्यामध्ये ठेवली जाते.
भगवान श्रीकृष्णाला दही ,लोणी आणि साखर या हे पदार्थ अत्यंत प्रिय असल्यामुळे, यांचा नैवेद्य दाखवला जातो आणि भगवान श्रीकृष्णाची पूजा-आरती केली जाते. याचबरोबर भगवान श्री कृष्णाचे पाळणे म्हटले जातात.
तसेच अशा या दिवशी अनेकजण काही उपाय देखील करतात, जेणेकरून धनप्राप्ती होईल किंवा आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल. आपल्या व्रताचे पूर्ण फळ आपल्याला मिळेल.
यातील पहिला उपाय म्हणजे, धनप्राप्तीसाठी किंवा आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी, धनवान बनण्यासाठी आपल्याला श्रीकृष्ण जन्माष्टमीला रात्री 12 वाजता, त्या वेळेला कृष्णाच्या मूर्तीला केशर मिश्रित दुधाने अभिषेक करावा.
त्यासाठी आपल्याला एका ताटामध्ये श्रीकृष्णाची मूर्ती किंवा श्रीकृष्णाचा फोटो,आपल्याला ठेऊन, त्या फोटोला किंवा मूर्तीला केशर मिश्रित दुधाने अभिषेक करायचा आहे आणि यावेळी “ओम नमो भगवते वासुदेवाय” किंवा “ओम कृष्णाय नमः” असे जप करावा.
हा अभिषेक करताना या मंत्राचे उच्चारण केले पाहिजे.यामुळे तुम्ही नक्कीच श्रीमंत होण्यासाठी ज्या अडचणी येत आहेत, त्या दूर होतील आणि तुमच्या प्रयत्नांना यश प्राप्त होईल. प्रत्येक कार्यात तुम्हाला सफलता मिळेल,तुमच्या घरामध्ये पैसा टिकून राहील.
त्यामुळे असा धनवान बनण्यासाठी, आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हा उपाय तुम्ही कृष्ण जन्माष्टमी नक्की केला पाहिजे.
दुसरा उपाय म्हणजे,आपल्याला जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाची पूजा करताना मनापासून आपल्याला प्रार्थना करायची आहे, आणि या वेळी आपल्याला पिवळ्या रंगाची फुले भगवान श्रीकृष्णांना अतिप्रिय असल्यामुळे, त्यांना मनोभावे अर्पण करायचे आहेत.
तसेच पूजा करताना आपण स्वतः देखील पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. पिवळा रंग हा भगवान श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय असल्यामुळे, या पूजेमध्ये पिवळ्या रंगाची फुलं किंवा मिठाई आणि पिवळ्या रंगाच्या वस्तूंचा वापर करू शकतो आणि त्यानंतर भगवान श्रीकृष्णच्या मूर्ती जवळ आपल्याला काही रुपये ठेवायचे आहेत.
मग पूजा झाल्यानंतर हे आपल्याला आपल्या हे पैसे ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या मौल्यवान वस्तू ठेवता,त्या ठिकाणी ठेवावे किंवा त्या ठिकाणी तिजोरीत सुद्धा तुम्ही हे पैसे ठेवू शकता,
यामुळे तुमच्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता तुम्हाला जाणवणार नाही, तसेच तुमचा खिसा कधीही रिकामा राहणार नाही. पैसा टिकून राहण्यासाठी हा सुद्धा उपाय तुम्ही कृष्ण जन्माष्टमी नक्की केला पाहिजे.
तिसरा उपाय म्हणजे, जन्माष्टमीच्या दिवशी तुमच्याकडे जर दक्षिणावर्ती शंख असेल तर या शंकामध्ये जल भरून, आपल्याला श्रीकृष्णांना अभिषेक करायचा आहे आणि या वेळी श्रीकृष्णांचे कोणतेही मंत्राचा जप करू शकता.
हा जप कमीत कमी 21 वेळा केला पाहिजे आणि दक्षिणावर्ती शंख यामध्ये जल भरून अभिषेक घालायचा आहे.
हे उपाय जरी साधे, सरळ असले,तरी या उपायाचा परिणाम मात्र खूप जलद गतीने दिसून येतो.यामुळे तुमच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सुधारणा होईल,तसेच घरात पैसा टिकून राहील
आणि पैशाची कोणतीही समस्या किंवा अडचण दूर होण्यास मदत होईल.मात्र हा उपाय तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने केला पाहिजे.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments