नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, हिंदू धर्मग्रंथांमध्ये पिंपळाचे झाड अतिशय आदरणीय मानले जाते. असे मानले जाते की, या झाडामध्ये भगवान विष्णूचे वास्तव्य आहे. गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने या झाडाला त्याचे स्वतःचे रूप असल्याचे वर्णन केले आहे.
हिंदू धर्मग्रंथानुसार, शनिवारी पिंपळाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा पेटवल्याने शनिच्या साडेसाती, प्रभाव आणि इतर परिणामांपासून मुक्तता मिळते. म्हणून शनिवारी शनिवारी होणारे त्रास टाळण्यासाठी लोक या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करतात.
तुमच्या घराच्या जवळपास जर पिंपळाचे झाड असेल, पिंपळवृक्ष असेल तर प्रत्येक शनिवारी एक छोटासा उपाय आपण आवर्जून करा, ज्यामुळे आपल्या घरात जे काही लोक असतील आजारपण असेल तर निघून जाईल
आणि घरातील लोकांना दीर्घायुष्य लाभेल. तसेच घरात सुख-समृद्धी म्हणजे धन-संपदा सुद्धा निर्माण होईल.
संपदा म्हणजे काय तर घर धनधान्याने भरुन जाईल. कारण पिंपळाच्या वृक्षांमध्ये ब्रम्हा-विष्णू-महेश त्रिदेव वास करतात. इतरही सर्व देवीदेवतांच्या पिंपळाच्या वृक्षांमध्ये वास आहे. पिंपळाची पूजा केल्याने,
शनिवारच्या दिवशी पिंपळ वृक्षाची पूजा केल्याने शनीची दशा त्रासदायक ठरत नाही. शनी दशाचा त्रास कमी होतो. पुरुष आणि स्त्रिया सुद्धा महिला सुद्धा पिंपळाची पूजा करू शकता,
मात्र त्यांनी शुद्धता आणि पवित्रता याची काळजी घ्यावी. त्यामुळे मासिक धर्माच्या वेळी या पाच दिवसात आपण ही पूजा करणे टाकावे. याशिवाय पिंपळाच्या वृक्षाखाली मलमूत्र विसर्जन करून पिंपळाचं झाड तोडणे या गोष्टीं अशुभ आहेत,
त्यामुळे जीवनात शुभ आणि नकारात्मक गोष्टी घडू लागतात. हा उपाय करण्यासाठी सायंकाळी आपण या पिंपळाच्या वृक्षाखाली एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. यामुळे तुमच्या घरातील रोगराई आणि आजारपण निघून निघून जाते.
आजारपण निघून आपल्या कुटुंबातील जितके सदस्य आहेत तितके जितके लोक आहेत या नावाने धागा या पिंपळाच्या खोडाला आपण नक्की डोरा आपण नक्की गुंडाळा. शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या पानाला स्पर्श करणं, पिंपळाच्या या झाडांना स्पर्श करणं या गोष्टी शुभ फलदायी असतात.
शनिवारच्या दिवशी या पिंपळाच्या पानावरती महादेवाची पिंडी म्हणजेच शिवलिंग ठेवून शिवलिंगाचा अभिषेक केल्यास मोठ्यात मोठ्या रोगातून मुक्ती मिळते. तसेच याशिवाय शनिवारच्या दिवशी
या पिंपळाच्या पानावर हनुमानाची मूर्ती किंवा तसाच ठेऊन जर आपण त्यांना सेंदुर लावल्यास आणि मंत्र बोलल्यास तर त्याने मोठ्यात मोठी संकटे संकटातून मुक्ती मिळते, असे हे उपाय आहेत..
याशिवाय, शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे. शनिदेवाला न्यायाची देवता मानतात. ज्या प्रमाणे माणूस काम करतो त्या प्रमाणे शनिदेव कर्मफळ देतो अशी मान्यता आहे.
जर शनी एखाद्यावर प्रसन्न असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनात कोणत्याही प्रकारची कमतरता येत नाही. दुसरीकडे, शनि जर एखाद्यावर कोपला तर तो त्याचा शारीरिक, आर्थिक आणि मानसिक अशा तिन्ही प्रकारे छळ करतो.
अशा व्यक्तीला जीवनात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु अशा संकटाच्या वेळी जर एखाद्या व्यक्तीने पिंपळाच्या झाडाची पूजा केली तर त्याच्या आयुष्यातील शनिशी संबंधित दुःख संपुष्टात येते.
ब्रह्मपुराणाच्या 118 व्या अध्यायात एका संदर्भाद्वारे सांगण्यात आले आहे की, स्वतः शनिदेवाने सांगितले होते की, जो कोणी शनिवारी पिंपळाची पूजा करेल, पिंपळाला स्पर्श करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.
त्याला शनिशी संबंधित त्रासांना कधीही सामोरे जावे लागणार नाही. अशा व्यक्तीच्या घरात लक्ष्मी वास करते आणि त्यांचे सर्व दुःख दूर होतात. येथे जाणून घ्या पिंपळाशी संबंधित काही उपाय नक्की करून पाहा जेणे करुन तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतील..
प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाच्या मुळास स्पर्श करून नमस्कार करावा आणि संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावून पिंपळाच्या झाडाची 5 किंवा 9 वेळा प्रदक्षिणा करावी.
असे केल्याने शनिशी संबंधित सर्व त्रास दूर होतात. कुटुंबात सुख-समृद्धी नांदते. श्रीकृष्णाने सांगितले आहे की पिंपळाच्या झाडामध्ये माझा वास आहे. शनिदेव भगवान श्रीकृष्णाला आपले प्रमुख देवता मानतात.
जर तुम्हाला तुमच्या कामात अडचणी येत असतील किंवा यश मिळत नसेल तर दुधात गूळ आणि पाणी मिसळून दर शनिवारी पिंपळात टाका. तुमची इच्छा असेल तर तुम्ही हे काम रोज करू शकता.।।ओम नमो नारायणा ।।
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments