नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, दीवाळी पाडवा/बलिप्रतिपदा पती पत्नीच्या नात्यात गोडवा निर्माण होण्यासाठी करा हा प्रभावी उपाय..
यंदाच्या दिवाळीला सुरुवात झाली आहे. बाजारात सर्वत्र दिवाळीची धामधून दिसून येत आहे. विविध प्रकारचे आकाशकंदील लोकांनी घरासमोर लावले आहेत, तर दिव्यांनी आणि सजावटीच्या वस्तूंनी बाजारपेठा सजल्या आहेत.
फराळाचे पदार्थ आणि नवे कपडे घेण्यासाठी लोकांची बाजारात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. खरंतर दिवाळीची सुरुवात वसुबारसपासून होते. त्यानंतर मग नरकचतुर्दशी,
बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा असे दिवाळीतील महत्वाचे सण मोठ्या आनंदाने आणि उत्साहात साजरे केले जातात. आपल्या देशात दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
शिवाय तो खूप दिवस सुरू असतो. दिवाळी म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा, ऊर्जेचा आणि दिव्यांचा सण असल्याचं मानलं जातं.
यंदाची दिवाळी 9 नोव्हेंबरपासून सुरू झाली असून ती 15 नोव्हेंबरला भाऊबीज झाल्यानंतर समाप्त होणार आहे. दिवाळीतील इतर सणांपैकी एक असणारा दिवाळी पाडवा खूप महत्त्वाचा सण मानला जातो.
दिवाळी पाडव्याचं मुहूर्त साधून तुम्हीही तुमच्या जोडीदाराला असं काही गिफ्ट देऊ शकता. वर्षभर करून बघा. पुढच्या पाडव्यापर्यंत नक्कीच नातं अधिक उत्साही- आनंदी झालेलं जाणवेल.
दिवाळीचा पाडवा म्हणजे नवरा- बायकोच्या नात्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा दिवस. साडेतीन मुहर्तांपैकी एक असणारं हे एक मुहूर्त पती- पत्नीसाठीही नक्कीच खास असतं.
नवरा- बायको हे नातं तसं रोजचंच. नव्या नवलाईचे नऊ दिवस संपले की अनेक जणांना हे नातं कसं जुनं- जुनं आणि त्याच त्या पद्धतीचं रटाळ वाटू लागतं. काही जणांचं नातं मात्र लग्नानंतर २०- २५ वर्षे उलटून गेली तरीही नव- नवं फ्रेश वाटतं.
कामाचा ताण, आर्थिक गणितं, घरातल्या जबाबदाऱ्या या सगळ्या धांदलीत तुम्हालाही तुमचं नातं जुनाट, कुठे तरी हरवल्यासारखं वाटत असेल,
तर दिवाळी पाडव्याचं मुहूर्त साधून तुम्हीही तुमच्या जोडीदाराला असं काही गिफ्ट देऊ शकता. वर्षभर करून बघा. पुढच्या पाडव्यापर्यंत नक्कीच नातं अधिक उत्साही- आनंदी झालेलं जाणवेल.
नवरा- बायको म्हणून एकमेकांना असं गिफ्ट द्या..भरभरून कौतूकआपलं कौतूक केलेलं कुणाला आवडत नाही? कौतुकाचे काही शब्द ऐकण्यासाठी प्रत्येकजण उत्सूक असतो. मग तो कोणत्याही वयातला का असेना.
त्यामुळे एकट्यात आणि चारचौघातही आपल्या जोडीदाराच्या चांगल्या गोष्टींचे आवर्जून कौतूक करा. बघा जोडीदार कसा तुमच्यावर खुश होतो..
दोष देणं टाळा घरात काही प्रॉब्लेम झाला किंवा मुलांच्या बाबतीत काही झालं, तर लगेचच नवरा- बायको या गोष्टीचं खापर एकमेकांवर फोडण्यास तयार असतात. अशावेळी जोडीदाराएवढंच स्वत:लाही त्या घटनेसाठी जबाबदार समजा
आणि एकमेकांना दोष न देता दोघे मिळून त्या घटनेची जबाबदारी स्विकारा. यामुळे वाद कमी होतील आणि नातं अधिक परिपक्व होण्यास मदत होईल.
नात्यात तुलना नकोच सोशल मिडियामुळे प्रत्येक जणच स्वत:च्या वैयक्तिक आयुष्याची इतरांसोबत तुलना करत आहे.
अनेक संसारांसाठी ही गोष्ट खूप हानिकारक ठरतेय. त्यामुळे आपल्या जोडीदाराची कधीच कुणाची तुलना करू नका. यामुळे नातं खराब होण्यास वेळ लागणार नाही.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments