नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, वैकुंठ चतुर्दशीला करा 14 दिव्यांचे दान, चमत्कारिक उपाय..
वैकुंठ चतुर्दशी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला येते. या दिवशी भगवान विष्णू आणि भोलेनाथ यांची पूजा केली जाते. बैकुंठ चतुर्दशीला हरि हर म्हणजेच श्री हरी आणि महादेवाची पूजा करण्याची परंपरा आहे.
जो कोणी बैकुंठ चतुर्दशीला भगवान विष्णूची पूजा करतो त्याला स्वर्ग प्राप्त होतो. आयुष्याच्या शेवटी त्याला भगवान विष्णूचे निवासस्थान असलेल्या वैकुंठामध्ये स्थान मिळते. वैकुंठ चतुर्दशीचा दिवस हा सामान्य स्त्री-पुरुषांसाठी विष्णूचा आशीर्वाद मिळविण्याचे सर्वोत्तम साधन आहे.
वैदिक कॅलेंडरनुसार, कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्दशी तिथी शनिवार, 25 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5:22 वाजता सुरू होईल. ही तारीख दुसऱ्या दिवशी, रविवार 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 3:53 पर्यंत वैध राहील.
उदयतिथीच्या मान्यतेनुसार या वर्षी बैकुंठ चतुर्दशी शनिवार 25 नोव्हेंबर रोजी आहे.
जो कोणी बैकुंठ चतुर्दशीला भगवान विष्णूंची आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पूजा करतो त्याला स्वर्ग प्राप्त होतो. मृत्यूनंतर आत्म्याला वैकुंठामध्ये स्थान मिळते. वैकुंठ चतुर्दशीला सर्वसामान्यांसाठी स्वर्गाचे दरवाजे खुले राहतात,
जेणेकरून त्यांना विष्णूच्या नामस्मरणानेच स्वर्ग प्राप्त होईल. नारदजींच्या विनंतीवरून भगवान विष्णूंनी जय आणि विजय यांना बैकुंठ चतुर्दशीला स्वर्गाचे दरवाजे उघडे ठेवण्याचा आदेश दिला. या पूजेला कणकेच्या दिव्यांचाही नैवेद्य दाखवला जातो. तसे करणे हे या परंपरेचा एक भाग आहे.
हा दिवा गुळाच्या पाण्यात बनवल्याने इतका चविष्ट बनतो, की नैवेद्य म्हणून तो जेवताना पानात वाढला जातो. मनुष्याला सण वार एकवेळ लक्षात राहणार नाहीत, परंतु पोटातून गेलेला मार्ग तो सहसा विसरत नाही.
कणकेचे दिवे या सणाची ओळख बनून प्रतिवर्षी आपल्याला या परंपरेची आठवण करून देतात. सर्वसामान्य घरातले लोकही या पदार्थाचा आस्वाद घेऊ शकतात, एवढा तो बनवणे सोपे आणि बिनखर्चिक आहे.
या दिव्यात साजूक तूप घालून खाल्ले असता त्याची चव आणखी छान लागते. हे दिवे आपल्याला एवढे आवडतात, तर ते खाऊन आपले पितर आणि अन्य सूक्ष्म जीव जिवाणू का बरे तृप्त होणार नाहीत? यासाठीच या अमावस्येला कणकेच्या दिव्यांचे प्रयोजन केले जाते.
पाव वाटी गूळ बुडेल एवढे पाणी घेऊन गूळ पूर्ण वितळवून घ्यावा. एक वाटी कणिक अर्थात गव्हाचे पीठ घेऊन त्यात चिमूटभर मीठ, दोन चमचे तूप कणकेत एकत्र करून गरज लागेल त्याप्रमाणे गुळाचे पाणी टप्प्याटप्प्याने घालून कणिक तिंबून घ्यावी.
त्याचे पुऱ्यांसाठी करतो तेवढे गोळे करून त्यांना दिवा, पणतीचा आकार द्यावा. एका चाळणीला तेलाचा किंवा तुपाचा हात लावून त्यात दिवे ठेवावे. एका मोठ्या पातेल्यात पाणी घेऊन त्यावर अलगद राहील अशा बेताने चाळणी ठेवावी
आणि वर ताट ठेवून पातेले झाकावे. हे दिवे इडली पात्रातही करता येतात. जवळपास 20 मिनिटे दिवे शिजू द्यावेत मग गॅस बंद करून दिवे थोडे गार झाल्यावर त्यात साजूक तूप घालून खावेत.
याशिवाय, 24 तास तेवत राहणारा दिवा ला नंदादीप असे म्हटले जाते. जर असा हा नंदादीप आपल्याला आपल्या देवघरामध्ये प्रचलित करायचा आहे.या दिव्याची ज्योत अखंड राहील याची आपण काळजी घेतली पाहिजे.
पहिली गोष्ट म्हणजे हा दिवा 24 तास जळत राहिला पाहिजे म्हणजे अखंड चालू राहिला हवा. जर हा दिवा वाऱ्याने विझला गेला तर मनामध्ये काही शंका आणू नका. तो दिवा पुन्हा प्रज्वलित करा आणि तो परत विझणार नाही याची काळजी घ्या.
हा दिवा लावत असताना आपल्याला तिळाच्या तेलाचा वापर करायचा आहे,त्यादिवशी दिव्याची वात कुठल्या दिशेला हवी शास्त्रानुसार उत्तर आणि पूर्वेकडे असल्यास त्याचे शुभ परिणाम आपल्याला लाभते.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments