नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,तांदूळाला पूजेत अक्षदा असे म्हणतात, अक्षदेचा अर्थ कधीच न संपणारी वस्तू होय. ज्योतिष आणि धर्मशास्त्रात तांदूळास धन धान्य सुख समृद्धी आणि वेभवाशी जोडले जाते.
धार्मिक मान्यतेनुसार लक्ष्मी मातेस तांदूळ प्रिय असल्याचं म्हटलं जातं. तसेच ज्योतिषशास्त्रात तांदूळाचा चंद्र आणि शुक्र ग्रहाशी संबंध असल्याचं म्हटलं जातं. अशा अनेक गुणधर्मामुळे तांदूळाला महत्व देण्यात आले आहे.
पूजा पाठ शिवाय अक्षदा इतर अनेक शुभ कार्यात देखील वापरली जाते. चला जाणून घेऊया तांदूळाचे महत्वाचे उपाय जे शुभ ठरतात.तसेच हिंदू धर्मात अमावस्या तिथीला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व दिले गेले आहे.
सोमवारी येणाऱ्या अमावस्याला सोमवती अमावस्या म्हणतात. यावेळी ही शुभ तिथी सोमवार, 30 मे रोजी आहे. या अमावास्येला पूर्वजांचे पूजन, पूजा आणि जल तीळ अर्पण केल्याने पुण्य प्राप्त होते, असे मानले जाते.
विवाहितांसाठी सोमवती अमावस्या व्रताचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी शिवपार्वतीची पूजा करून उपवास केल्याने आयुष्य दीर्घायुषी होऊन सौभाग्य प्राप्ती होते, असे म्हणतात.
वैवाहिक जीवनात स्नेह आणि सौहार्द वाढवण्यासाठी विवाहित जोडप्यांनीही अमावस्येचे व्रत पाळावे अशी मान्यता आहे.तसेच या दिवशी वट अमावस्या म्हणजेच वट अमावस्याही असते.
ग्रह आणि नक्षत्रानुसार वृषभ राशीत चालणारा बुधही या दिवशी मार्गक्रमण आणि दिवसभर सर्वार्थ सिद्धी योगासाठीही एक शुभ संयोग घडत आहे. या शुभ योगांमध्ये पितरांसाठी पवित्र नदीत स्नान, दान आणि पूजा करण्याचा नियम आहे.
त्यामुळे पौराणिक मान्यतेनुसार, सोमवारी अमावास्या सुरू होणे, भाग्यकारक मानले गेले आहे. या दिवशी स्नान, दान आणि पूजाविधीचे वेगळे महत्त्व असते, असे शास्त्र सांगते. तर या सोमवती अमावस्याला तांदळाचे काही विशेष उपाय केल्यास सर्व प्रकारच्या समस्या दूर होण्यास सुरुवात होईल..
तर या दिवशी सर्वात पहिला उपाय म्हणजे, तांदळाची आणि गुडाची खीर बनवून सूर्यदेवाला अर्पण करा आणि संपूर्ण कुंटुबाला तो प्रसादाच्या स्वरूपात द्या. असं केल्याने सूर्य ग्रह अनुकूल राहतो आणि तुम्हाला शुभ प्रभाव प्राप्त होतात.
सूर्य च्या बळकट होण्याने आपल्याला समाजात एक मानाचे स्थान प्राप्त होते. याचबरोबर, ही खीर खाल्याने लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्या सोबत असतो आणि शुक्र ग्रह देखील बळकट असतो.
शुक्रच्या बळकट होण्याने आपल्या जीवनातील धन आणि वैभवात वाढ होते आणि सुख समृद्धी नांदते. तांदळाची खीर सोमवती अमावस्यला खाल्याने वैवाहिक जीवनात किंवा प्रेमातील नात्यात सुख लाभते.
घराची स्वच्छता राखून घरातील महिलांनी आपल्या स्वच्छ हातांनी ही खीर बनवायला हवी.तसेच रोजच्या जेवणात तांदळाचा उपयोग अवश्य केला पाहिजे. यामुळे तुमचा चंद्र ग्रह मजबूत होईल.
चंद्र ग्रहाच्या बळकट होण्याने तुमचे स्वास्थ सुदृढ होते आणि आईसोबत अधीक चांगले संबंध प्रस्थापित होतात. रोजच्या जेवणात तांदळाचा वापर केल्यास धन संपत्तीत वृद्धी होते. बृहस्पतीचा दिवस श्रीविष्णूंना समर्पित आहे.
या दिवशी तांदूळात हळद मिसळून श्रीविष्णूंना नैवेद्य दाखवावा त्यामुळे ते प्रसन्न होतात. आणि यासोबतच गुरु च्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळते. हळदीचा प्रयोग तांदूळासोबत केल्याने ज्यांचा विवाह होत नाही आहे .
त्यांना शुभ परिणाम मिळतात आणि विवाहासाठी योग्य जोडीदाराची साथ लाभते. गुरुवारी हळद मिश्रीत तांदूळ दान केल्याने तुमच्या घरातील आर्थिक अडचणी दूर होतात.
सोमवती अमावस्येला शनी जयंतीचाही योगायोग आहे.
अशा परिस्थितीत या दिवशी भगवान शंकराची तसेच शनिदेवाची पूजा करणे फायदेशीर ठरेल. शनिदोषाने पीडित लोकांसाठी हे विशेष मानले जाते. या दिवशी शनिदेवाची पूजा करणे विशेष फलदायी मानले जाईल.
शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि ऊॅं प्रं प्रं प्रं: शनिश्चराय नमः आणि ऊॅं शनिश्चराय नमः या मंत्रांचा 108 वेळा जप करा.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments