नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, मीठ हे केवळ स्वयंपाकातील चवीकरिता किंवा औषधासाठी या मिठाचा वापर होतो असे नाही तर वास्तु शास्त्रानुसार व ज्योतिष शास्त्रानुसार एका मूठभर मिठाचा असाही उपयोग करता येतो की ज्यामुळे आपले घर सुखी समृद्धी होऊन आपली सर्व कामे मार्गी लागतात घरी धन वर्षा होते. धनसंपत्ती लाभते.
याचा उपयोग आपणाला माहितीच आहे की, फार पूर्वीपासून लहान मुलाबाळांची तसेच कुणाचीही दृष्ट काढण्यासाठी मिठाचा वापर केला जातो. तसेच घरातील विविध प्रकारची नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी देखील वास्तु शास्त्रानुसार व ज्योतिष शास्त्रानुसार मिठाचा वापर केला जातो.
त्यामुळे घरात मिठाचा वापर करण्याने नकारात्मक ऊर्जा तर निघून जातेच. याच बरोबर आपली सर्व अडलेली कामे सुरू होतात व घरात लक्ष्मी माता प्रसन्न होते. अनेक आजारपणे निघून जातात.काही वेळेला आपल्याला स्वतःला दृष्ट लागलेली असते ती आपल्याला माहीत नसते त्यामुळे आपल्याला अनेक अडचणी येत असतात.
आपली कामे मार्गी लागत नसतात कारण आपणालाही काही दृष्ट लोकांच्या नजरा किंवा अत्रुप्त आलत्म्याच्या नजरा लागलेले असतात. ते आपल्याला माहिती नसते.
त्यामुळे आपली कामे नकळतपणे खोळंबलेली असतात तर आपणही आपणही आपल्या हातामध्ये मिठाचा वापर करून आपली दृष्ट काढू शकतो. यामुळे नक्कीच आपली कामे मार्गी लागतात.
आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा बाहेर काढून टाकण्यासाठी मिठाचा वापर कसा करावा हे तुम्हाला आम्ही आता सांगतो. तर सुरुवातीला एक मुठभर मिठ घेऊन ते एका वाटीमध्ये किंवा काचेच्या भांड्यामध्ये घालावे आणि ते आपल्या घरातील कुठल्याही एका कोपरे मध्ये ठेवा आणि यानंतर हे मीठ कुठलेही एका शनिवारी वाहत्या पाण्यात सोडावे.
वाहत्या पाण्यामध्ये सोडणे शक्य नसल्यास हे मीठ आपल्या टॉयलेट मध्ये टाकावे.यामुळे काय होईल मित्रांनो तर हे मीठ आपणा सर्वांवर येणाऱ्या अडचणी वाईट दृष्ट नजरा थांबून ठेवेल. यामुळे आपल्या मार्गातील अडचणी दूर होतील.
याबाबत दुसरा उपाय म्हणजे, जर वरील प्रमाणे उपाय करणे आपणाला शक्य नसेल तर हेच मूठभर मीठ आपण फरशी पुसण्यासाठी ज्या बकेटमध्ये पाणी घेतो त्या बकेट मध्ये टाकावे.
आणि त्यानंतरच त्या पाण्याने फरशी पुसून काढावी यामुळेही घरातील वाईट गोष्टी निघून जातात सर्व कामे मार्गी लागतात. घरात सुख समृद्धी येते. कामे मार्गी लागल्याने घरात पैसा अडका चांगल्या पद्धतीने खेळतो. यामुळे घरात भरभराटी येते.
वरील पैकी कोणतीही म्हणजे दोन्ही कृती केल्याने घरातील सर्व कामे मार्गी लागतील भरभराटी होईल. तिसरा उपाय केल्याने कुठल्याही आजारी माणसाचे आजारपण निघून जाईल. यासाठी काय करावे?
तर मित्रांनो जो माणूस आजारी आहे खूप दिवसाचा आजार पण कमी होत नाही अशा माणसाच्या उजव्या हातामध्ये मूठभर मीठ काही काळासाठी धरून ठेवण्यास सांगावे. त्यानंतर हे मीठ टॉयलेटमध्ये टाकावी किंवा बेसनमध्ये टाकावे किंवा जर दोन्ही शक्य असल्यास एक या बकेट मध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हे मीठ टाकावे आणि संपूर्ण हातही त्यामध्ये धुवावा जेणेकरून हाताला मीठ चिकटलेले राहणार नाही.
असे केल्याने ही ही त्या माणसाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच त्याचे सकारात्मक विचार वाढतात होतो आजारातून लवकरात लवकर बरा होतो. चौथी कृती ही बाळाची दृष्ट काढणेसाठी आहे.
आपणाला माहिती आहे की फार पूर्वीपासून एखाद्या घरांमध्ये लहान मूल असेल आणि ते वारंवार रडत असेल किरकिर करत असेल तर त्याची दृष्ट काढली जाते दृष्ट काढताना मीठ घेऊन त्याच्या अंगावरून उतरून ते पाण्यामध्ये टाकले जाते काही वेळातच ते मूल शांत झाल्याचे आपणाला दिसून येते. मित्रांनो आपण माना अगर न माना पण या गोष्टी आपणाला माहित आहेत आपण सातत्याने पाहिलेले आहेत हे तरी मान्य आहे.
याचबरोबर, मीठ ठेवण्याची पद्धत आपल्या घरातील मीठ आपण नेहमी प्लास्टिकच्या बरणीमध्ये किंवा प्लास्टिक डब्यामध्ये किंवा प्लास्टिक पिशवीमध्ये ठेवतो. पण वास्तू शास्त्र व ज्योतिष शास्त्रानुसार हे पूर्णतः चुकीचे आहे.यामुळेदेखील घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा वाढीस लागते सकारात्मक कुठलेही काम होत नाही.
घरातील कर्त्या माणसाची कुठलीही काम लवकर पूर्ण होत नाही ते वारंवार रेंगाळत पडते. घरात तंटे वाढतात कलह निर्माण होतो. त्या घराची संपूर्ण प्रगती खुंटते. तर हे मीठ असे न ठेवता नेहमी हे मीठ एखाद्या कुठल्याही भांड्यामध्ये ठेवावे किंवा काचेच्या बरणीमध्ये ठेवावे. हे ज्योतिष शास्त्र व वास्तुशास्त्र नुसार अगदी योग्य आहे. यामुळे ही मोठ्या प्रमाणात घरातील बदल शक्य असतात.
हा मिठाचा उपाय जरी आपणाला साधा सोपा वाटत असला तरी याचे गुणधर्म फार मोठे आहेत हे आपण करून पाहिल्यानंतरच आपणाला लक्षात येतील.की मूठभर मिठाच्या या सर्व कृतीमुळे आपणाला किती फायदा होतो ते.
हे अतिशय साध्या पद्धतीचे तोटके उपाय असतात पण आपल्याला माहित नसतात.तर आपल्या घरची सुख समृद्धी शांती वाढविण्यासाठी तसेच घरावरील वाईट दृष्टी, अत्रुप्त दृष्टी पळवून लावण्यासाठी हा उपाय एकदा करून पहाच
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments