नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,श्री स्वामी समर्थ, स्वामी तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण करू दे आणि नेहमी तुम्हाला आनंदात सुखात आणि हसत खेळत ठेवते हीच स्वामी चरणी प्रार्थना. तुमच्या प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी आणि तुमचे अशक्यही काम शक्य करण्यासाठी गुरु पौर्णिमेपर्यंत एक छोटीशी करायची सेवा आज तुम्हाला सांगणार आहे.
गुरूंच्या उपकार यांनी आपले मन कृतज्ञतेने भरून येते, तेव्हा आपल्या तोंडून श्लोक बाहेर पडतो.” गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा”,”गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः”
आषाढ शुद्ध पौर्णिमा हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून स्वीकारला आहे, त्यानिमित्त महर्षी व्यासांनी वेदांचे 4 भाग, 6 शास्त्रे आणि 18 पुराणांची रचना करून मानवी जीवनाला संपन्न केले आहे.
या सर्वातून भगवंताचे गुणगान करून मनुष्याला जीवन जगण्याचे मार्गदर्शन केले आहे. भारतीय पूर्वसुरींनी व्यासांचे पूजन यादीने केल्यामुळे या दिवसाला व्यास पौर्णिमा अथवा गुरु पौर्णिमा म्हणतात.
गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर होय. जलाशयात पाणी आहे परंतु घटाने आणि घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही, त्याचप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही. हे सर्वांनी लक्षात ठेवावे.
गुरु म्हणजे अंधकार नाहीसा करून प्रकाशाचा वाटेकडे घेऊन जातात. 13 जुलै 2022 रोजी गुरु पौर्णिमा आहे. आपल्या सर्व स्वामींच्या लेकरांसाठी हा खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी, तुमच्या आयुष्यातील संकटांवर मात करण्यासाठी पौर्णिमेपर्यंत तुम्हाला 1 छोटीशी सेवा करायचे आहे.
आयुष्यात खूप संकटे असतील, तुम्हाला काही गोष्टी अशक्य वाटत असतील तर नक्कीच ही सेवा करण्यासाठी उद्या पुन्हा चालू करा.पण तुम्हाला ही सेवा संकल्प करून करायचे आहे.
संकल्प पासूनच सिद्धी होते. तुमच्या मनात जे काही इच्छा असेल त्या इच्छेला स्वामी समर्थ याचा संकल्प करायचा आहे आणि मग ही सेवा चालू करायचे आहे.
ही सेवा गुरु पौर्णिमेपर्यंत करायची आहे.
आपल्या सेवेची सुरुवात आपल्या आई-वडिलांच्या पाया पडून त्यांचा आशिर्वाद घेउन केली पाहिजेत, कारण आपले आई-वडील देखील आपले पहिले गुरू आहे. त्यांनी जन्माला घातलं म्हणून हा जन्म मिळाला हे जग आपण बघू शकलो.
आपण रोजच आई-वडिलांच्या पाया पडतो पण जे लोक पडत नसतील त्यांनी या सेवेची सुरुवात आपल्या आपल्या घरी येथे मोठी माणसं असतील किंवा जे मोठे व्यक्ती असतील त्यांचा आशीर्वाद घेऊनच या सेवेला सुरुवात करायची आहे.
सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला ठेवायचे आहे ती म्हणजे गुरुपौर्णिमा येईपर्यंत ही सेवा आपण संकल्प करून करणार आहोत.
मग तुम्हालाही सेवा स्वामी महाराजांच्या समोर बसूनच करावी लागेल. तसेच ही सेवा करताना तुम्हाला हे 2 नियम पाळावे लागतील. जर कोणी मांसाहार खात असेल तर सेवा पूर्ण होईपर्यंत तुम्हाला मांसाहार टाळावा लागेल.
याचबरोबर सेवा करताना महिलांना मासिक पाळी आली तर महिलांनी आपले 5 ते 6 दिवस झाल्यानंतर ही सेवा चालू केली तरी चालेल. गुरु पौर्णिमेपर्यंत ही सेवा संकल्प करून आपल्याला करायची आहे.
पहिली सेवा म्हणजे आपल्या स्वामींचं नामस्मरण होय. गुरुपौर्णिमा पर्यंत आपल्याला 11 माळी नामस्मरण करायचा आहे ते देखील रोजच्या रोज होय. ज्यांना 11माळी नामस्मरण जमत नाही, त्यांनी 3 माळी नामस्मरण केलं तरी चालेल पण सेवेला सुरुवात व्हायची आहे.
कारण सेवा केल्याशिवाय मेवा मिळत नाही. नंतर आपल्याला 11 वेळा तारक मंत्र घ्यायचा आहे, 11 वेळा तारक मंत्र तारक मंत्र देखील आपण 3 वेळा घेऊ शकतो आपल्या मनातील इच्छा किंवा कोणतीही इच्छा अशक्यही काम शक्य करण्यासाठी तुम्हाला तारक मंत्र अतिशय प्रभावी मंत्र आहे.
अनुभव हा येतो त्यामुळे आपण गुरु पौर्णिमेपर्यंत रोज 11 वेळा तारक मंत्र जप करावा. तारक मंत्र झाल्यानंतर आपल्याला स्वामी चरित्र सारामृत आची गुरुपौर्णिमा येईपर्यंत ते 7 अध्याय वाचायचे आहेत.
पण ज्यांना कामामुळे हे शक्य नाही त्यांनी 3 अध्याय वाचले तरी चालतील. स्वामी चरित्र सारामृत वाचून झाल्यानंतर आपल्याला 3 वेळा स्वामींचा स्तवन बोलायचं आहे. स्वामी स्तवन अगदी छोटासा आणि प्रभावशाली आहे.
हे स्वामींचा स्तवन बोलल्याने स्वामी कृपेने सर्व संकटे निघून जाते. आपल्या सर्वांच्याच घरी सुख-शांती आणि समृद्धी येईल आणि आरोग्यासह कशाचीही कमी आपल्याला राहणार नाही.
तर स्वामी भक्तांनो ही छोटीशी सेवा तुम्हाला गुरु पौर्णिमेपर्यंत करायचे आहे. विश्वास ठेवा की, अशक्य हे काम शक्य होतील या छोट्याशा सेवेने आपली छोटीशी सेवादेखील स्वामीं साठी खूप मोठी सेवा आहे.
त्यामुळे आजपासूनच ही सेवा करण्यास सुरुवात केली तरी हरकत नाही.”श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ”..
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments