नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो,श्री स्वामी समर्थ, आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजे या तिथीला आपण गुरुपौर्णिमा म्हणून गौरवितो. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे.
त्यांच्याएवढे श्रेष्ठ गुरुजी, आचार्य अद्याप झालेले नाहीत, अशी आपली श्रद्धा आहे. अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात कथन केले आहे. एवढेच नव्हे तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जात.
ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे, असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला. ज्ञानियांचा राजा म्हणून ज्याला मानतात, त्या ज्ञानदेवांनीसुध्दा ज्ञानेश्वरी लिहिताना ‘व्यासांचा मागोवा घेतू’ असे म्हणून सुरुवात केली.
व्यासपौर्णिमेच्या दिवशी ‘ओम नमोस्तुते व्यास, विशाल बुद्धे’ अशी प्रार्थना करून, त्यांना प्रथम वंदन करण्याचा प्रघात आहे, परंपरा आहे. आपल्या देशात रामायण-महाभारत काळापासून गुरु-शिष्य परंपरा चालत आली आहे.
आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो, त्याच विद्येच्या बळावर आपण सर्वांचा उद्धार करीत असतो. अशा या गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य होय. महर्षी व्यासांपासून अशी प्रथा रूढ झाली, ती आजमितीपर्यंत.
दत्तभक्तांसाठी हा पूण्यपावन दिवस ! या दिवशी शिष्य आपल्या गुरुची पंचोपचारे पूजा करतो. आपल्याला मिळालेल्या कृपादानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि पूढील वाटचालीसाठी आशिर्वाद घेतो.
वेगवेगळ्या पंथ व संप्रदाय हा इश्वरभक्तीकडे जाणारे मार्ग शोधणारे मुमुक्षु – पारमार्थिक या दिवशी भक्तीभावाने गुरुंचे पूजन करतात व गुरुदक्षिणा देऊन कृतज्ञता व्यक्त करतात.
तसेच गुरूंच्या उपकारांनी आपले मन कृतज्ञतेने भरून येते, तेव्हा आपल्या तोंडून श्लोक बाहेर पडतो – गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।,गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः॥
आषाढ शुद्ध पौर्णिमा हा दिवस ‘गुरुपौर्णिमा’ म्हणून स्वीकारला आहे. त्यानिमित्त महर्षी व्यासांनी वेदाचे चार भाग, सहा शास्त्रे, अठरा पुराणांच्या रचना करून मानवी जीवनाला संपन्न केले आहे.
या सर्वांतून भगवंताचे गुणगान, त्यांचे यशगान करीत मनुष्याला जीवन जगण्याचे मार्गदर्शन केले आहे. या अमोलिक कार्याची कृतज्ञता म्हणून भारतीय पूर्वसुरींनी व्यासांचे पूजन या दिनी केल्यामुळे या दिवसाला ‘व्यास पौर्णिमा’ अथवा ‘’गुरुपौर्णिमा’ असे म्हणतात.
13 जुलै बुधवारच्या दिवशी गुरुपौर्णिमा आहे. आज पासून गुरु पौर्णिमेपर्यंत 13 दिवस बाकी आहेत तरी या दिवसांमध्ये गुरुपौर्णिमा येईपर्यंत तुम्ही फक्त या मंत्राचा जप करा. एक माळ जप करा.
गुरुपौर्णिमा येईपर्यंत रोज करा. मग तो सकाळी करा किंवा संध्याकाळी करा किंवा दोन्ही वेळेस करा आजच करा. तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतील. आपण स्वामींचे सेवेकरी आहात.
गुरुपौर्णिमेच्या विशेष दिवस येत आहेत. स्वामींच्या विशेष दिवस तुम्ही स्वामींना प्रसन्न 13 दिवसांपर्यंत या मंत्राचा करा. स्वामी प्रसन्न होतील असा हा मंत्र कोणता आहे?.
यासाठी सगळ्यात आधी देवघरासमोर बसा.
अगरबत्ती दिवा लावायचा. स्वामींना दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आणि त्यानंतर माळेने या मंत्राचा जप करायचा आहे. तर हा विशेष मंत्र काही असा आहे की,“श्री स्वामी समर्थाय नमः”,“श्री स्वामी समर्थाय नमः”,
तर हा अगदी सोपा मंत्र आहे, या मंत्राचा एक माळ करावा. श्रद्धेने विश्वासाने मनोभावाने करावा. स्वामी सगळं काही देतील, गुरुपौर्णिमा येईपर्यंत गुरुपौर्णिमेच्या दिवशी सुद्धा त्या मंत्राचा जप करावा.
गुरुपौर्णिमा पूर्वी तुम्ही ही सेवा सुरू करू शकतात. दोन दिवस बाकी असतील तरी तुम्ही दोन दिवस त्या मंत्राचा जप करा. तुमच्या सगळ्या मनोकामना सगळ्या इच्छा पूर्ण होतील. स्वामी प्रसन्न होते.
अशाच प्रकारची चांगली माहिती वाचण्यासाठी आमचे पेज मराठी टोक्स याला आताच लाईक करा.
Recent Comments